'या' ड्रीम सिटीत १८० हेक्टरवर साकारणार एरोसिटी; भूखंड विक्रीसाठी..

Aero City
Aero CityTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) भूसंपादनाचे काम मार्गी लागताच सिडकोने आता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या धर्तीवर १८० हेक्टरवर नवी मुंबईतही एरोसिटी अर्थात हवाई शहर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी १७ पंचतारांकित हॉटेल्स व आलिशान मॉल साकारण्यात येणार आहेत. विमान प्रवाशांचा प्रवास, खरेदी आणि निवास एकाच ठिकाणी असावा, या दृष्टीने या हवाई नगरीचे नियोजन केले आहे. या एरोसिटीमधील भूखंड विक्रीसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु होणार आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूचा शास्त्रोक्त व नियोजनबद्ध विकास व्हावा, या दृष्टीने सिडकोने मास्टर प्लान तयार आहे.

Aero City
सीएनजी वाहनचालकांनो व्हा निश्चिंत! पुण्यात ६ ठिकाणी होणार नवे पंप

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. येथे पहिल्या टेकऑफसाठी डिसेंबर २०२४ चा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या अडीच वर्षात विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे विमानतळाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सिडकोचा भर आहे. दळणवळणाच्या प्रभावी साधनांबरोबरच विमानतळ क्षेत्रात दिल्लीच्या धर्तीवर १८० हेक्टर जागेवर भव्य एरोसिटी अर्थात हवाई शहर उभारण्यात येणार असून त्यानुसार आराखडाही तयार केला आहे. नियोजित एरोसिटीमधील भूखंड विक्रीसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

Aero City
शिंदे सरकारचा ‘महाविकास’ला हाय व्होल्टेज झटका; ५ हजार कोटींची...

दिल्ली एरोसिटीतून अवघ्या काही मिनिटांत विमानतळ गाठता येते. दिल्ली मेट्रो या एरोसिटीला जोडली आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई मेट्रो नियोजित एरोसिटीला जोडण्याची योजना आहे. मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीला सज्ज झाला आहे. खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ हा मेट्रोचा तिसरा टप्पा असेल. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांची मुंबई विमानतळाशी संलग्नता वाढावी, यादृष्टीने न्हावा शेवा-शिवडी सागरी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

Aero City
पुणे जिल्ह्यातील प्रॉपर्टी कार्डमुळे भूमी अभिलेखला 'एवढा' महसूल

विशेष म्हणजे, या नियोजित हवाई शहरात सिडको कोणतेही बांधकाम करणार नाही. पंचतारांकित हॉटेलसाठी येथील भूखंडांची ऑक्शनद्वारे विक्री केली जाणार आहे. याठिकाणी १७ पंचतारांकित हॉटेल व आलिशान मॉल असणार आहेत. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु झाली असून लवकरच एरोसिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com