Aditya Thackeray : मुंबईतील 1 हजार एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात कोणी घातली?

Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महायुतीचे रिपोर्ट कार्ड (Report Card) प्रकाशित झाले आहे. खरंतर याचे नाव डिपोर्ट कार्ड (Deport Card) असायला हवे, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. जनतेला 15 लाख सांगून 1500 रुपये दिले, पुढे 15 रुपयांवर येतील, असा टोला त्यांनी लगावला.

Aditya Thackeray
राज्य सरकारने पुणे महापालिकेत समाविष्ट 32 गावांबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मविआचे सरकार आल्यावर नोकऱ्या देणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. कारण राज्यातील नोकऱ्यादेखील डिपोर्ट झाल्या आहेत. काल आचारसंहिता लागायच्या आत एक मोठा भूखंड अदानी समूहाला देण्यात आला. यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

धारावी पुनर्विकास योजनेबद्दल आम्ही बोलत आलो. धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानी समूहाला दिले. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानींना फुकटात दिली. कुर्ला, मढ, देवनार येथील जमीन अदानींना दिली. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातली, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

Aditya Thackeray
Tendernama Impact : 'वैद्यकीय शिक्षण'चा सुल्तानी निर्णय रद्द! 5 पट पठाणी शुल्क वसुलीचा वादग्रस्त निर्णय मागे

ते अरबी समुद्राचे नावदेखील अदानी समुद्र असे करून टाकतील. देवनार भूखंडात डम्पिंग ग्राऊंड, एनर्जी प्लांट आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धारावीतील दीड लाख परिवार अपात्र होणार. त्यांना तुम्ही जागा देणार नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर अदानी समूहाला जे अतिरिक्त दिले ते परत घेणार. टेंडर तुम्हाला जमत नसेल तर ते रद्द करा. महाराष्ट्र अदानी समूहाच्या घशात घालायला लागलो तर आपल्याला इथे रहायला जागा मिळणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

7 लाख स्केअर फूट बांधकाम केले तर अदानी समूह 1 लाख कोटी कमावेल. मुंबई विकून चालणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर अदानी समूहाला अधिकच दिलेले रद्द करणार, असे ते म्हणाले. ही देशाची प्रगती आहे की अदानी समूहाची प्रगती आहे, हे आपण पाहिले पाहिजे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com