Mumbai Metro 3 : आरे ते बीकेसी पहिल्या भूमिगत मेट्रोची ट्रायल रन सुरु

Mumbai Metro
Mumbai Metro Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो 3चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी मेट्रोची चाचणी सुरू झाली आहे. ही चाचणी पुढील 2 ते 3 आठवडे चालणार आहे.

Mumbai Metro
FASTag News : डोक्याला ताप... 'फास्टॅग'ही जाणार! आता टोल कसा भरायचा?

भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (आरडीएसओ) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली आहे. त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रवासी सेवा सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडे संपर्क साधेल. सीएमआरएसकडून परवानगी मिळाल्यानंतर, सुरक्षा नियम आणि ऑपरेटिंग मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित केल्यानंतरच व्यावसायिक कामकाज सुरू केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया जुलै अखेरीपर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

Mumbai Metro
Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

मुंबईकर या मार्गाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे, जी मुंबईकरांना अविस्मरणीय प्रवास देईल आणि रहदारीही कमी करेल. मुंबई मेट्रो लाईन-3 ही 'कुलाबा-वांद्रे-सिप्झ' अशी 33.5 किमीची भूमिगत मेट्रो आहे. यामध्ये 27 प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत, त्यापैकी 26 भूमिगत आणि 1 उन्नत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण होत आहे. आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, छशिमट आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, छशिमट आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी याठिकाणी पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com