तुमची 'लालपरी' कात टाकतेय! नव्याकोऱ्या ३,५०० गाड्यांची 'मेगाभरती'

MSRTC
MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्याची जीवनवाहिनी असणार्‍या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अर्थात 'एसटी'च्या ताफ्यात वर्षभरात 1000 इलेक्ट्रिकल, 2000 सीएनजी आणि 500 साध्या बसेस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दीडशे 'शिवाई' ई-बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीकडून 50 व ईव्ही ट्रान्स कंपनीकडून 100 ई-बसगाड्यांचा पुरवठा होणार आहे. तर 2000 नवीन सीएनजी बसगाड्या टेंडर प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात अशोक लेलँड आणि टाटा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत.

MSRTC
खूशखबर! पोलिस दलात तब्बल 15 हजार जागा भरणार; वाचा सविस्तर...

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्वमालकीच्या, भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा 15 हजार 877 बसगाड्या आहेत. त्यापैकी सुमारे 4500 बसगाड्या नादुरुस्त झाल्या असून, गेल्या तीन वर्षांत महामंडळाने एकही नवीन बस खरेदी केलेली नाही. त्यामुळे वर्षभरात साडेतीन हजार नवीन बसगाड्या घेतल्या जाणार आहेत.

लाल रंगाच्या साध्या 500 बसगाड्या आठ वर्षांसाठी भाडेतत्त्वाने घेण्याचा निर्णय 8 ते 10 महिन्यांपूर्वी झाला. त्यापैकी 320 बसगाड्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या कंपनीकडून दोन ते तीन महिन्यांत येण्यास सुरुवात होईल. या बसमध्ये 'टू बाय टू' आरामदायी (पूश बॅक) आसनव्यवस्था आणि आकर्षक रंगसंगती असेल. या बसचा चालक कंत्राटदाराचा व वाहक एसटी महामंडळाचा असेल.

MSRTC
'स्मार्ट' ठेकेदारांनो सावधान! रस्त्यांचा दर्जा सांभाळा, अन्यथा...

सध्या एसटीच्या ताफ्यात 12 हजार 828 साध्या बसगाड्या आहेत. या बसगाड्या 11 मीटर लांबीच्या असून, नवीन बसगाड्या 12 मीटर लांबीच्या असतील. त्याचप्रमाणे 2000 नवीन सीएनजी बसगाड्या टेंडर प्रक्रियेद्वारे खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात अशोक लेलँड आणि टाटा या कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. शिवाय जुन्या 1000 डिझेल बसचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्यात येणार आहे.

MSRTC
Aurangabad: ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघातांचा धोका

पहिल्या टप्प्यात 150 'शिवाई' बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, वर्षभरात त्यांची संख्या 1000 वर नेण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ईव्ही ट्रान्स कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 बसगाड्या पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या मार्गांवर; तर 100 बसगाड्या पुणे ते ठाणे, दादर, बोरिवली या मार्गांवर धावतील. एसटी आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. एसटी महामंडळ 1 जूनला 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून विजेवरील 'शिवाई' बसची पहिली फेरी नगर ते पुणे मार्गावर होईल. याच मार्गावर पहिली एसटी बस धावली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com