स्वाराती रुग्णालयास सरकारचा बुस्टर; 'या' कारणासाठी 15 कोटींचा निधी

Ambajogai
AmbajogaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 230 खाटांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करून आणखी काही वॉर्ड व सुविधा निर्माण करण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

Ambajogai
'नाथजल' : विक्रेत्यांकडून लूट सुरूच; 'एसटी'चे अधिकारी अजूनही झोपेत

स्वामी रामानंद तीर्थ हे बीड जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. येथील रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, कोणत्याही प्रकारच्या आजारावर इथे उपचार मिळावेत यासाठी आवश्यक यंत्र सामग्री व तज्ज्ञ डॉक्टर्स इथेच उपलब्ध व्हावेत, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संजय भाऊ दौंड हे प्रयत्नशील होते.

Ambajogai
गुंठेवारीबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय; तुकडेबंदी उठली?

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 3.0 टेसला एमआरआय ही अत्याधुनिक एमआरआय मशीन, तसेच अन्य विविध सामग्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून यापूर्वीच रुग्णालय प्रशासनास उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या 230 खाटांच्या इमारतीमध्ये वरती एक मजल्याचे बांधकाम करण्यात येणार असून तेथे आणखी 6 वॉर्ड, 4 ऑपरेशन थिएटर तसेच 4 विभाग उभारण्यात येणार आहेत, यासाठी 14 कोटी 99 लाख 39 हजार रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com