छ. संभाजीनगरमध्ये बीएसएनएलचे उघडे केबल डक्ट का ठरताहेत जीवघेणे?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गत चार महिन्यांपासून सिडको एन - ४ हायकोर्ट ते कामगार चौक या अंत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर बीएसएनएलच्या भूमिगत केबल डक्टचा ढापा तुटला आहे. थेट रस्त्यावर चार मीटर रूंद आणि दहा फूट खोल खड्डा पाहूनच छत्रपती संभाजीनगरकरांच्या अंगावर जणू काटा उभा राहत आहे.

Sambhajinagar
Nagpur : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नागपुरात सुरू होणार 'हे' नवे प्रकल्प

याच खड्ड्याच्या काही अंतरावर हायकोर्ट आहे. एका वर्तमानपत्राचे कार्यालय आहे. झेराॅक्स आणि कायद्याच्या पुस्तकांची विक्री करणारी मोठी दुकाने, चहा नाश्ता सेंटर व मोठी नामांकीत हाॅटेल्स आहेत. जालनारोड हाॅटेल रामा इंटरनॅशनल सिग्नल कडून वळताच कामगार चौकातून शेकडो वसाहतींना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. अर्थातच, रस्त्यालगतच हे भले मोठे डक्ट असल्याने रस्त्यावर चालताना पुढचे पाऊल टाकावे कुठे असा प्रश्न पडतो. डक्ट टाळून समोरून येणा-या वाहनाचा केव्हा ताबा सुटेल नेम नाही. जीव मुठीत धरून चालावे लागते, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी दिले.

यासंदर्भात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता शहरातील ज्या - ज्या भागात असे फुटके डक्ट आहेत त्यांचे आम्ही स्थापत्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर दुरुस्तीसाठी बजेटचा प्रस्ताव तयार करून त्याची मान्यता मिळाली की टेंडर काढले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र ही अत्यावश्यक बाब असल्याचे म्हणत तातडीने सर्वेक्षण करून स्थापत्य विभागामार्फत दुरुस्तीचे काम सुरू करणार असे एका अभियंत्यांनी सांगितले.

Sambhajinagar
Samruddhi Mahamarg : मुंबई - नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; 755 कोटी खर्चून 'समृद्धी'ला जोडणार

आधीच ड्रेनेज आणि जलवाहिनी दुरुस्तीसाठी, त्याचबरोबर खाजगी कंपन्यांनी  शहरातील कोट्यवधींचा नव्याकोऱ्या रस्त्यांची वाट लावली. त्यात बीएसएनएलच्या जीवघेण्या खड्ड्यांची शहरभर भर पडली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून बीएसएनएलचे केबल डक्टवरील ढापे तुटून डक्ट उघडे पडल्याने तयार झालेल्या खड्ड्यांचे कचराकोंडीत रूपांतर झाले आहे. लोकांना अक्षरश: कसरत लागावी लागत असून, यातून काहींना हातपाय गमावण्याची व मृत्यूची भीती वाटत आहे.

सिडकोतील अत्यंत रहदारीचा समजल्या जाणा-या हायकोर्ट ते कामगार चौक रोडला जोडणा-या रस्त्यालगत हे धोकादायक डक्ट टाळण्यासाठी अक्षरश: रस्ता शोधावा लागत आहे. हीच परिस्थिती शहरातील कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका रस्त्याची आहे. अनेक ठिकाणी केबल डक्ट रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंच झाल्याने वाहने धडकतात. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एपीआय क्वार्नर ते कलाग्राम मार्गावर देखील अशीच स्थिती आहे.

Sambhajinagar
Nashik : सिंहस्थात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभारणार क्राउड मॅनेजमेंट सिस्टिम

सिडको टाऊन सेंटर भागातील हाॅटेल रामगिरी ते जीएसटी कार्यालय मार्गावर देखील केबल डक्टवरील ढापा फुटून डक्ट उघडे पडल्याने रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ताळ्यावर आलेल्या बीएसएनएलकडून डक्टवर ढापे टाकल्याची तत्परता दाखवली जाते. मात्र हे काम तात्पुरते आणि निकृष्ट दर्जाचे ढापे कंत्राटदारांकडून टाकले जात असल्याने कुचकामी ठरते. पुन्हा काही दिवसांत डक्टवरील ढापे फुटून केबल डक्ट उघडे पडतात. पुन्हा काही महिन्यांत त्याच कंत्राटदाराकडून ही कामे केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com