औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त कोणावर संतापले?

Astikkumar Pandey
Astikkumar PandeyTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : झाल्टा येथील एसटीपी प्लांटची (STP Plant) पाहणी करून शहरात येत असताना चिकलठाणा (Chikhalthana), संजयनगर (Sanjaynagar), मुकुंदवाडी (Mukundwadi) येथील जालना (Jalana) रस्त्यावर कचरा आढळून आल्याने रेड्डी कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे, तसेच स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

Astikkumar Pandey
आता 'गाव तिथे म्हाडा'; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा...

झाल्टा येथील महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांटची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पाण्डेय हे गेले होते. या प्लांटची पाहणी करून शहरात येत असताना चिकलठाणा, संजय नगर, मुकुंदवाडी या ठिकाणी जालना रस्त्याच्या कडेला घनकचरा पडलेला आढळून आल्याने हा कचरा तातडीने उचलून घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

Astikkumar Pandey
वाट पाहीन पण 'खड्ड्या'तूनच जाईन!

दरम्यान जालना रस्त्याच्याकडेला पडलेल्या या घनकचऱ्या संदर्भात रेड्डी कंपनीला दंडात्मक कारवाई करण्याचे व स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आणि जे दुकानदार जालना रस्त्यावर कचरा टाकतात त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकांनी दिले. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त सौरभ जोशी, श्रीमती सविता सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com