सिल्लोड बायपासचे 154 कोटींचे टेंडर कोणाला मिळणार?

Sillod
SillodTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चौपदरीकरणासाठी तीन महिन्यापूर्वी १५४ कोटीची मान्यता मिळालेल्या सिल्लोड बायपासचे टेंडर (Tender) नुकतेच अपलोड झाले असून, यासाठी नऊ कंत्राटदारांनी (Contractors) सहभाग नोंदवला आहे.

Sillod
Thane : 600 कोटींच्या रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मॅनेज

सिल्लोड गावातून सव्वासहा किलोमीटर रस्त्याचे ३० मीटर रुंदीत चौपदरीकरण केले जाणार आहे. यात तीन छोटे आणि ९ नळकांडी पुलांचा समावेश आहे. सोबत रस्ता दुभाजकात पथदिवे लावण्यात येणार असल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना दिली.

आता या रस्त्यात कोण किती टक्के कमी दराने टेंडर भरले, कुणाच्या नशीबात या रस्त्याचे नशीब उजळण्याचे भाग्य लाभते, यासह टेंडरमध्ये यशस्वी झालेला कंत्राटदार रस्त्याचा दर्जा कसा राखणार, याकडे 'टेंडरनामा'चे लक्ष असणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहा वर्षांपूर्वी सिल्लोड येथे केलेल्या घोषणेप्रमाणे छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार काम सुरू करण्यात आले होते. हा संपूर्ण रस्त सिमेंटचा काॅंक्रिटचा केला गेला. यामुळे आता या मार्गावरून वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र केवळ सिल्लोड गावातून जाणारा सव्वासहा किलोमीटरचा रस्ता काही तांत्रिक कारणाने रखडला होता. सद्य: स्थितीत हा रस्ता केवळ दोन पदरी आहे.

Sillod
Nashik : रोजगार हमी योजनेवर कुशल कामांचा 76 टक्के बोजा

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ही तीन राज्ये व मराठवाडा, विदर्भ व खान्देश या तीन प्रांतांना जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावरील सिल्लोड शहरातून जाणाऱ्या सव्वासहा किलोमीटर बायपासचे चौपदरीकरण व्हावे,अशी मागणी सिल्लोडचे आमदार व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांच्याकडे लावून धरली होती. त्यानंतर गडकरी यांनी सत्तार यांची मागणी मान्य केल्याने सद्य: स्थितीत दोन पदरी सिल्लोड बायपासला न्याय मिळाला आहे.

मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर व अजिंठा लेणी यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. केवळ सिल्लोड शहरातील अरुंद बायपास रस्त्यामुळे अपघाताची शंका कायम असल्याने रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे होते. सत्तार यांच्या मागणीनंतर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी गडकरी यांनी १५३ कोटी ७९ लाख रुपये मंजूर करत या दुपदरी डांबरी रस्त्याच्या सिमेंट काॅंक्रिटच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली होती. यामुळे आता ३० मीटर रुंदीत रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सिल्लोड बायपासवरील वाहतुकीची समस्या कायमची सुटणार आहे.

गडकरी यांनी प्रशासकीय व तांत्रिक तसेच वित्तीय मान्यतेला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला वेग येऊन त्याचे टेंडर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयीन स्तरावरून प्रसिध्द करण्यात आले होते. त्याला कंत्राटदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Sillod
Pune: 8 कोटींच्या बिलासाठी कोणता मंत्री टाकतोय दबाव?

या कामाठी तब्बल ९ कंत्राटदार सहभागी झाले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील सर्वांत वाहतुकीचा चक्काजाम करणाऱ्या हर्सूल गावातील रुंदीकरणाचाही तिढा सुटल्याने हर्सुल टी पॉइंट ते सिल्लोड बायपासचे सव्वासहा किमीचे अंतर वगळून शहर हद्दीच्या पुढे फर्दापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्द व जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा असा १४८ किमी चौपदरी सिमेंट रस्ता बांधण्यात आला आहे.

आता सिल्लोड बायपासचे देखीलचौपदरीकरण होणार असल्याने सलग अखंडीत चौपदरी रस्त्यातून वाहतूक सुसाट धावणार आहे. आता या महत्वाच्या टप्प्याच्या कामाची लाॅटरी कुणाला लागते, किती टक्के कमी दराने लागते व तो कामाचा दर्जा कसा राखणार याकडे 'टेंडरनामा'चे लक्ष असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com