Sambhajinagar : बुस्टर योजनेचा दिलासा; जानेवारीपासून दिवसाआड पाणी

जुन्या पाणीपुरवठा योजनेचे नुतनीकरण जोमात
Aurangabad
AurangabadTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत शहराला दिलासा मिळावा म्हणून जुन्या ७०० मिमीची पाईपलाईन बदलण्याचे काम वेगात सुरू आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांना यंदा उन्हाळ्यापूर्वीच महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची आनंदाची बातमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापाड यांनी दिली आहे.

Aurangabad
EXCLUSIVE: शिंदेंच्या ठाण्यातच अनधिकृत बांधकामांना 200 ₹ Sq.Ft.रेट

१९७२ च्या काळात या शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीने १९७४ मध्ये अर्थात ५० वर्षापूर्वी शहराला किमान ४० एमएलडी पाणी मिळावे यासाठी ७०० मिमि व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यानंतर १९८२ मध्ये १४०० मिमि व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र या दोन्ही जलवाहिन्या जीर्णशिर्ण झाल्याने नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होईपर्यंत जुन्या योजनेतील ७०० मिमि जलवाहिन्या जागी ९०० मिमि जलवाहिनी टाकण्याचा निर्णय तत्कालीन विभागीय आयुक्त व नवीन पाणी पुरवठा योजना देखभाल समितीचे प्रमुख सुनिल केंद्रेकर यांनी घेतला होता. त्यांच्या निर्देशानुसार तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पांण्डेय यांच्या काळात पाणी पुरवठा विभागाकडून  या योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी १९३ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेसाठी निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला होता. त्यानंतर केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे टेंडर प्रक्रिया राबवून या कामाला सुरूवात करण्यात आली होती. 

Aurangabad
Sambhajinagar : 'यामुळे' प्रवाशांचा 18 किलोमीटरचा वळसा होणार बंद

शहरासाठी सध्या १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना देखील केंद्र शासनाच्या अमृत २ मध्ये गेली असून त्याचे बजेट २७४० कोटींपर्यंत गेले आहे. हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने १९३ कोटींतून जुनी ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून त्या ठिकाणी तातडीने ९०० मिलिमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगती पथावर सुरू आहे. मागील महिनाभरात पाच किमी पर्यंत जलवाहिनी टाकली आहे. नियोजनानुसार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत प्रकल्पातील इतर बाबींच्या समावेशासह  या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच शहरात ८० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने शहरात सहज एकदिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याचा दावा मजीप्राचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी सांगितले.

Aurangabad
Sambhajinagar : देवळाई चौकातील उड्डाणपुलाचीही उंची कमी असल्याने...

त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे बूस्टर योजनेचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना आगामी उन्हाळ्यात या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे न्यायालयीन लढाईमुळे देखील नवीन पाणी पुरवठा योजनेने वेग धरला आहे. या योजनेतील सर्वात मोठी २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी २० किमीपर्यंत टाकण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अकरा जलकुंभांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील गल्लीबोळात जलवाहिनीचे जाळे अंथरले जात आहे. टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com