७४ कोटींच्या कामावर साचले पाणी; जालनारोडवर नेहमीचीच

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : पावसाळ्यात जालना रस्त्यावर कुठेही पाणी साचू नये, साचलेल्या तळ्यामुळे रस्त्याचा सरफेस खराब होऊ नये यासाठी कॅम्ब्रीज नाका ते नगरनाका पर्यंत रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी सिमेंट काँक्रिटची भुमीगत गटार बांधली. यामुळे जालना रस्त्यावर कुठेही पाणी साचणार नाही असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग (एन एचएआय) प्राधिकरणातर्फे केला जात असला तरी किरकोळ पावसाने देखील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. यासंदर्भात एनएचएआयकडे विचारणा केली असता गटारांना होल मारले नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकाला विचारले असता गटारीला होल मारले आहेत. पावसाळ्यात ते स्वच्छ केले जातील असे त्याचे म्हणणे आहे. एकुणच ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांचाच या कामावर एकमेकात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Aurangabad
सावधान! चक्क डोंगर म्हातारा होतोय; २०० भूखंडांसाठी सिडकोकडून...

कॅम्ब्रीज चौक ते नगरनाक्यापर्यंत १४.५ किमीपर्यंत टेंडरनामा प्रतिनिधीने पाहणी केली असता जागोजागी रोडवर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. सालाबाद प्रमाणे जालनारोडवर तळ्यांनी त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांना या कामामुळे काहीसा दिलासा वाटला होता. पण नेहमीप्रमाणे किरकोळ पावसाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पितळ उघडे पडले व रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे आता पुढील पावसाळ्यात जालनारोडने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार हे मात्र निश्चित असल्याची चर्चा औरंगाबादेत सुरू झाली आहे. औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जालना रस्ता विस्तारीकरणासाठी केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी २०१७-१८ मध्ये जालनारोड दहापदरी तर कधी आठ पदरीच्या घोषणा केल्या. यासाठी कधी हजार कोटी तर कधी आठशे कोटींची मुक्ताफळे उधळली. मात्र भूसंपादनाचा तिढा सुटत नसल्यामुळे जालनारोड विस्तारीकरणाचे काम झाले नाही.

Aurangabad
कॅन्सर इन्स्टिट्यूटचे टेंडर रद्द; २० कोटींचा निधी सरकारने दिलाच...

अखेर त्यांनी १ जून २०१८ ला दीडशे कोटींची योजना तयार केल्याची घोषणा केली होती. त्यात जालना रस्त्याचे सहापदरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा विकास आराखडा देखील एनएचएआयकडे सादर केल्याचे ते म्हणाले होते. २०१८ पर्यंत कामाची टेंडर निघतील असे आश्वासन देखील दिले होते. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद न झाल्यामुळे १५० कोटी ऐवजी ७४ कोटी ८८ लाख रूपयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यात कॅम्ब्रीज चौक ते एअरपोर्ट तसेच नगरनाका ते महावीर चौक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका या १४.५ किमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने दिड मीटरची सिमेंट काॅक्रीटची गटार आणि त्यावर फुटपाथ तसेच रस्त्याच्या उर्वरित शोल्डरमध्ये पादचार्यांसाठी साडेतीन मीटरचा फुटपाथ व मुकुंदवाडी, आकाशवाणी तसेच जिल्हा न्यायालयासमोर पादचार्यांसाठी लोखंडी ओव्हर ब्रीज तसेच चिकलठाणा जिल्हा रूग्णालय ते एअरपोर्ट ओव्हरब्रीज आदी कामांचा समावेश होता. मात्र यापैकी चिकलठाणा जिल्हा रूग्णालय ते एअरपोर्ट ओव्हरब्रीज कामावर खा.जलील यांनी आक्षेप घेतल्याने ते काम रद्द करावे लागले. यात दोन्ही बाजुने पाचशे मीटर अंतराचे नवेकोरे उंच रस्ते तोडुन पुन्हा जुन्या सरफेसशी लेव्हल जुळवण्यासाठी नव्याने डांबरी रस्ते करण्यात आले. या फेरबदलात तीन कोटीचा चुराडा करण्यात आला.

Aurangabad
पुणे रेल्वे स्टेशनवरील अपुऱ्या सुविधांमुळे चार ठेकेदारांना दंड

हे आहेत जबाबदार

या कामांसाठी हैद्राबाद येथील सृष्टी काॅन्टेच प्रा. लि. या कंपनीचे अभिषेक यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंजुर झालेल्या ७४ कोटी ८८ लाखातून २.२१ कमी दराने त्याने टेंडर मान्य केल्याने ७३ कोटी २० लाख ४९ हजारात त्याला कामाचा ठेका देण्यात आला. त्याची रितसर वर्कऑर्डर दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी देण्यात आली होती.

पीएमसी असूनही का साचले तळे

या कामावर देखरेख करण्यासाठी जयपूरची सीईजी (कंन्सलटींग इंजीनियरिंग गृप) या कंपनीचे नरेंद्र पार्थसारथी यांची पीएमसी (प्रकल्प सल्लागार समिती) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी त्यांना जवळपास एक कोटी १६ लाख रुपये त्यांना मोजून दिले आहेत, असे असताना या कोट्यावधींच्या कामावर पाणी साचलेच कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जालना रस्त्याच्या सखल भागात पाणी वाहून जाण्यासासाठी जागा नसल्यामुळे या भागात दरवर्षी रस्त्यावर पाण्याचे डबके साचत असल्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असे. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल असल्याने वाहनधारक आणि पादचार्यांचे हाल होत असत. शिवाय डांबरी रस्त्याचा सरफेस देखील खराब होत असे. त्यावर उपाय म्हणून कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका १४.५ किमीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने दिड मीटरची भूमिगत सिमेंट काँक्रिटची गटार तयार केली गेली. पण किरकोळ पावसामुळे या गटारीलाच पाण्याचा विळखा पडला आहे. परिणामी रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे. पण याकडे अद्याप पीएमसी आणि ठेकेदारासह भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Aurangabad
कॅन्सर इन्स्टिट्यूटचे टेंडर रद्द; २० कोटींचा निधी सरकारने दिलाच...

काय म्हणाले होते प्रकल्प संचालक

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जालनारोडवर दर्जाहीन काम सुरू असल्याचे टेंडरनामाने निदर्शनास आणून दिल्यानंतर एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी या बाबींकडे दुर्लक्ष करत ठेकेदार पीएमसीने दिलेल्या डीपीआर प्रमाणेच काम करत आहे, कामात कुठेही हलगर्जीपणा नाही, पीएमसी देखील वेळोवेळी कामाची तपासणी करून अहवाल पाठवत आहे. हीच कहाणी अधीक्षक अभियंता एम. बी. पाटील, पीएमसीचे नरेंद्र पार्थसारथी तसेच सृष्टी काॅन्टेच प्रा.लि.चा ठेकेदार श्री अभिषेक याने एकाच सुरात मांडली होती. मग आता पाणी का साचले असा सवाल केला असता आता साऱ्यांनीच मौन पाळले आहे.

कुणाचा कुणाला पायपोस नाही

यासंदर्भात एनएचएआयचे कार्यकारी अभियंता एम. बी. पाटील यांना विचारले असता, अद्याप काम बाकी आहे गटारीला होल मारले नसल्याने पाणी साचल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे सृष्टी काॅन्टेच प्रा. लि. चे अभिषेक यांना विचारले असता गटारीला प्रत्येक दहा ते बारा मीटर अंतरावर होल मारलेले आहे. त्यात माती आणि कचरा साचल्याने ते दिसत नाही आम्ही दोन दिवसात होलची स्वच्छता करणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com