Sambhajinagar : कोट्यवधींच्या रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

railway
railwayTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दक्षिण मध्य रेल्वेने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा, करमाड, लाडगाव, सटाणा, झाल्टा, पोटुळ, लासुर येथील  मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याऐवजी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले खरे, परंतु चुकीच्या ‘डिझाईन’मुळे पावसाचे पाणी या मार्गात साचत असल्याने नागरिकांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

railway
गडकरीजी, कधी होणार 'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम?; नागरिकांचा जीव

दक्षिण मध्य रेल्वेने  मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आले आहेत.त्यापैकी टेंडरनामा प्रतिनिधीने भर पावसात  शेंद्रा, करमाड, लाडगाव, सटाणा, झाल्टा, पोटुळ, लासुर आदी भागातील अंडरपासची पाहणी केली असता रेल्वेच्या अधिकार्यांनी अंत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होत नाही. हे पाणी भुयारी मार्गाच्या मधोमध साचत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे भुयारी मार्गातून जाणे कठीण झाले आहे. राज्यात इतरत्रही असेच चित्र उद्भवले असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

railway
Sambhajinagar : जागेअभावी रखडले PM ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम

दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते छत्रपतीनगर व पोटुळ दरम्यान रेल्वेमार्गावर अनेक भुयारी मार्गाचे (अंडर पास) बांधकाम केले आहे. रेल्वे रुळ ओलांडून रस्ते कायमचे बंद केले आहेत. पण या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे भुयारी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा, करमाड, कुंभेफळ, लाडगाव, सटाणा, टाकळीशिंपी, झाल्टा  या मार्गावर बांधण्यात आलेल्या अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. पावसाळ्यात दरवर्षीच अशी स्थिती उद्भवत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्या-त्या भागातील ग्रामस्थ करत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत. तो संपूर्ण परिसर शेतवस्त्या, गावं यांच्याकडे जाणारा आहे. या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. त्यामुळे रेल्वेने भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com