सीएनजी पाईपलाईन बुजवण्यात कुचराई; अपघातांचा धोका

Aurangabad
AurangabadTendernama
Published on


औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या सात महिन्यांपासून जालनारोडवर केम्ब्रिज ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंत अहमदनगरच्या भारत गॅस रिसोर्सेस लि. कंपनीमार्फत भूमिगत सीएनजी गॅस पाईपलाईन अंथरण्याचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका केएसआयपीएल कंपनीला देण्यात आला आहे. सदर कामात आठ ते दहा फुटाची नाली खोदून त्यात पाईप टाकले जात आहेत. मात्र, पाइप टाकल्यावर ती बुजवताना ठेकेदाराकडून दर्जेदार साहित्य वापरण्यास कुचराई केली जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. परिणामी धोका वाढला आहे.

Aurangabad
औरंगाबाद की 'कचराबाद'! कोट्यवधींचा मलिदा कोण खातय?

नाली दबाई करताना खडी, दगड आणि मुरूम योग्यप्रकारे टाकून दबाई न केल्यामुळे जालना रोडच्या लगतचा पाईपलाईनवरील भाग खचला असून चार ते पाच फुटांपर्यंत खोल खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे जालना रोडवरील केम्ब्रिज ते शेंद्राफाट्यापर्यंत रस्ता शोल्डरमध्ये खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. जोरदार पावसात रोडच्या बाजूने पाणी वाहतांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.

औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या पाईपलाईनमुळे सर्वच पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. वाहनधारकांना तासन्तास लाईनीत उभा राहण्याच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे. त्यादृष्टीने हे काम देखील महत्त्वाचे होते. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाइन टाकल्यानंतर नाली बुजविण्याच्या कामासाठी लागणारे दर्जेदार खडी, दगड आणि मुरुमाचा वापर करून त्याची पुरेशी दबाई न केल्यामुळे औरंगाबाद-जालना महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

Aurangabad
औरंगाबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल; कारण...

पावसाळ्यात खोदकाम

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच जालनारोडचे नुतनीकरण करण्यात आले. यानंतर भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने सीएनजी पाईपलाइनसाठी खोदकाम काढले. त्यात पावसाळ्यात रस्ते किंवा शोल्डरचे खोदकाम थांबवावेत, असा सरकारी निर्णय झाला असताना कंपनी खोदकाम करत आहे. त्यात काळ्यामातीचा शोल्डर असलेल्या रस्त्याच्या कडा खचल्याने पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताचा धोका टळेल.

Aurangabad
पुणे महापालिकेचा दणका! रस्ता खोदणाऱ्या कंपनीला 9.5 लाखांचा...

काय म्हणतात अधिकारी?

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारचा हा उपक्रम संपूर्ण देशात सुरू आहे. त्यानुसार औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात देखील हे काम प्रगतीपथावर आहे. आम्ही पीडब्लूडीने आकारलेले रस्ता दुरुस्ती व निगराणी शुल्क, तसेच सुरक्षा अनामत रकमेसह परफोर्मंस गॅरंटी शुल्क भरले आहे. काम अद्याप संपलेले नाही. संबंधित ठेकेदाराला सूचना केलेल्या आहेत. काम पीडब्लूडीच्या मानकानुसार शोल्डर भराईची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच ठेकेदाराला पैसे देणार आहोत. पावसाळ्यात थोड्याफार प्रमाणात शोल्डर खचू शकतात. ते मला मान्य आहे. याबाबत तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या जातील.

- बालाजी कायंदे, प्रकल्प व्यवस्थापक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com