वा रे स्मार्ट सिटी! कॅनाट गार्डनला कोणी बनविले गोडाऊन?

bollards
bollardsTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : आधी बोलार्ड (Bollards Scam) खरेदीत घोटाळा केला. त्यानंतर शहरातील रस्त्यांवर ते गाडण्यात आले. मात्र आधीच अरूंद रस्ते, शहरात पार्किंगची कुठलीही सुविधा नाही, त्यात रस्त्याच्या बाजुने गाडलेल्या बोलार्डमुळे वाहने रस्त्यावर लागू लागली. यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होऊ लागला. शहरात अपघातांचे प्रमाण वाढले. याशिवाय पाच कोटी खर्च करून तयार केलेल्या सायकल ट्रॅकवर सायकल देखील कधी फिरली नाही. याउलट आधीच बेरंग झालेले बोलार्ड वाहनांच्या धुरामुळे काळे पडले. यामुळे स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश असलेले शहर अधिकच अ-स्मार्ट दिसू लागले आहे.

bollards
समृद्धीनंतर 'या' 388 किमी ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर

यावर सातत्याने 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांचे डोळे उघडले. मात्र बोलार्ड खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा केवळ फार्स ठरला. याऊलट बोलार्ड खरेदीच्या चौकशीच्या बाता करणाऱ्या महापालिका प्रशासकांच्या नाकावर टिच्चून स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी आता शहरातील सर्वच रस्त्यांवरील बोलार्डची कापाकापी सुरू केली आहे.

कॅनाट गार्डनचे केले गोडाऊन

याच कापाकापी अभियानात सिडकोतील कॅनाॅट मार्केट परिसरातील चारही बाजूने सायकल ट्रॅक व फूटपाथसाठी गाडलेले बोलार्डांची कापाकापी करून लगतच्या कॅनाॅट उद्यानातील हिरवळीवर गोडाऊन करण्यात आले. अर्थात आधी बोलार्ड खरेदीत घोटाळा केला. आता लावलेले बोलार्ड मुळापासून उपटून टाकण्याचा तर कुठे वरवर कापाकापीचा खेळ सुरू केला. बोलार्डची ही कापाकापी पाहून ही जनतेच्या खिशातील पैशाची कापाकापी होत असल्याने शहरात संतापाची लाट पसरली आहे. 

सायकल ट्रॅकमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे सबळ पुराव्यासह 'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. नवनियुक्त महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी वृत्तमालिकेची दखल घेत बोलार्ड घोटाळ्यात हात घातला. गत मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी अर्धवट तूटलेल्या, खिळे उघडे पडलेल्या, बेरंग झालेल्या या बोलार्डमुळे शहराचे विद्रूपीकरण तसेच वाहतुकीला अडथळा होत असल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

bollards
Pune: पैसे कमावण्यासाठी ठेकेदाराने चक्क रस्त्याचाच घेतलाय ताबा

दरम्यान त्यांनी बोलार्ड खरेदीचे टेंडर काढले होते काय, नेमके किती बोलार्ड खरेदी केले, ते कुठे लावण्यात आले, कुणाकडून खरेदी केले, सद्य: स्थितीत किती बोलार्ड शिल्लक आहेत, खराब झालेल्या बोलार्डचा दोष निवारण कालावधी किती, पुरवठादार खराब बोलार्ड काढून नवीन बसवून देणार काय, असे अनेक प्रश्न उपस्थित करत माहिती मागवली होती. मात्र जनतेच्या खिशाची कापाकापी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अद्याप बोलार्डची संचिका सापडत नसल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांना देखील आपण दिलेल्या चौकशीच्या आदेशाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. 

bollards
Pune: रेल्वेच्या डब्यात बसून जेवण करायचेय, मग ही बातमी वाचाच...

तत्कालीन महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांण्डेय यांच्या काळात स्मार्ट सिटी (Smart City) योजनेच्या माध्यमातून सायकल ट्रॅकच्या निर्मितीसाठी २० किलोमीटर रस्त्यांची निवड केली होती. यासाठी जेम पोर्टलवरील टेंडर प्रक्रियेद्वारे नाशिकच्या अजय बुर्हाडे यांच्या स्वान इलेक्ट्रो मेक या कंपनीकडून २ कोटी ३९ लाख ४० हजार रुपये खर्च करुन ३० हजार बाॅलार्ड्स (रबरी खांब) खरेदी केले होते.

यानंतर पुन्हा सायकल ट्रॅक व्यतिरिक्त फुटपाथ व वळणमार्गात लावन्यासाठी १५ हजार बोलार्ड नव्याने पुरवठाधारकाकडून मागविण्यात आले होते. त्यासाठी आत्तापर्यंत ४ कोटी ७ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी कार्पोरेशन मार्फत आत्तापर्यंत शहरातील विविध भागात ४२ हजार बाॅलार्डस लावण्यात आले आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने आता हे बोलार्ड काढण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com