Chhatrapati Sambhajinagar: सोहम मोटर्स ते एचपीसीएल रस्त्यावर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना त्रास

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालनारोड ते सोहम मोटर्स ते कासलीवाल सारापार्क रस्त्याच्या दुरावस्थचे दशावतार थांबायला नाव घेत नाहीत. आधी जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. त्याचे ठिकठिकाणी माती - मुरुमाचे ढीग तसेच ठेवण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी जोड रस्त्यांची तोडफोड केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत . त्यात महानगरपालिकेची मलनिःसारण वाहिनी फोडल्याने नागरिकांच्या त्रासात भर पाडली.

Sambhajinagar
Nashik : सिटीलिंक बसेसेवेची संपातून सुटका होणार; दुसरा पुरवठादार पुरविणार वाहक

यासंदर्भात 'टेंडरनामा'ने सातत्याने वाचा फोडल्यानंतर महानगरपालिकेचे वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र गत दोन महिन्यांपासून काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे. दरम्यान मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेले मुरुम आणि मातीचे ढिगारे रस्त्यावरच ठेवल्याने त्यामुळे नागरिकांना सिडको एन - दोनचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या जालनारोड ते सोहम मोटर्स ते एचपीसीएल क्वार्टर या एकमेव अरुंद रस्त्यावरून ये - जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गत दोन महिन्यांपासून त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महानगरपालिकेचे वार्ड अभियंता चौधरी यांना विचारणा केली असता मलनिःसारण वाहिनीचे कनेक्शन अद्याप जोडलेले नाही. जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून मलनिःसारण वाहिनी फुटल्याने संबंधित कंत्राटदाराकडून मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने नाली त्यानेच बुजवायला हवी, असे त्यांनी सांगितले.

मात्र सदर कामाची टेंडरनामा प्रतिनिधीने पाहणी केली असता मलनिःसारण वाहिनीचे कामच अर्धवट असल्याचे दिसले. सदर काम महानगरपालिकेच्या वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत बालाजी कंन्स्ट्रक्शन कंपनीचे शीतल पहाडे यांना दिले आहे. त्यांनी या कामासाठी दुसरा पोट कंत्राटदार लावला आहे. सदर कंत्राटदाराने अद्यान चेंबरला प्लास्टर देखील केलेले नाही.

Sambhajinagar
Pune : महावितरणने 'या' ग्राहकांना दिली 'गुड न्यूज'; आता तत्काळ...

याच मुख्य रस्त्यालगत बॅंका, शोरूम, कासलीवाल मार्केट, मोठी रुग्णालये असल्याने प्रत्येक दिवशी रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघात होत आहेत. वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. परिणामी रस्ता अरूंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मातीच्या ढिगाऱ्याला वाहनांच्या धडका बसत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. ढिगाऱ्याची माती रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. गत दोन महिन्यांपासून मुकुंदवाडी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट दरम्यान केवळ अर्धा किलोमीटरचे देखील काम नाही. इतक्या छोट्याशा कामासाठी १२ लाखाचे टेंडर काढून नेहमीच्याच मर्जीतल्या कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात येत आहे.

जेथे काम सुरू आहे, रस्ता खोदला आहे, जिथे माती व मुरुमाचे डोंगर उभे केले आहेत, तिथे कंत्राटदाराकडून वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. रिफ्लेक्टर, रेडियम कॅट ऑइज व बॅरिकेड्स लावलेले नाहीत. सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले नाहीत. परिणामी सदर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन रस्ता अपघातासाठी ब्लॅक स्पाॅट बनत चालला आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com