शेंद्रा MIDC, ऑरिकला 'समृद्धी'ची जोड; भूसंपादनाचा तिढा सुटला

Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : दिल्ली - मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) शेंद्रा टप्प्यातून थेट समृद्धी महामार्गाला जाता यावे, यासाठी जयपूर (ता. औरंगाबाद) येथे इंटरलिंकचा भूसंपादनाचा तिढा सुटला असून यासाठी आवश्यक असणाऱ्या बनगाव, भांबर्डा व जयपूर या गावातील ४.०५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन लवकरच होणार आहे. शासनाने प्रति एकरी ६२ लाख रुपये जमिनीच्या दरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या इंटरलिंक मार्गाचा तीन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.

Samruddhi Mahamarg
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

तातडीने जमिनधारकांना मावेजा देण्यासाठी औरंगाबादच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात निधी वितरणाच्या हालचाली शासन दरबारी सुरू आहेत. यासाठी 'ऑरिक' व्यवस्थापनाने सातत्याने पाठपुरावा केल्याने शेंद्रा एमआयडीसी व डीएमआयसी तसेच परिसरातील नागरी वसाहतींना समृद्धी महामार्गाचा जोड मिळणार असल्याने आता उद्योजकांसह उद्योगनगरीत दाखल होणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-नागपूर अंतर कापणे आणखी सोपे जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने नागपूर-मुंबई समद्धी महामार्ग उभारण्यात आला आहे. आठ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर प्रवेशासाठी प्रत्येक जिल्ह्यात ठराविक ठिकाणी इंटरलिंक (जोडरस्ते) दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी तुळजापूर येथे एक इंटरलिंक झाल्याने जळगाव रोडहून तसेच परिसरातून येणाऱ्या वाहतुकीला समृद्धी महामार्गावर प्रवेश करता येत आहे.

Samruddhi Mahamarg
राज्यातील 'या' 10 जिल्ह्यातील रस्त्यांसाठी आशियाई बँकेशी करार

माळीवाडा परिसरात दुसरा इंटरलिंक दिल्याने वाळूज एमआयडीसी व परिसरातील वाहतुकीला फायदा झाला आहे. तिसरा इंटरलिंक करमाडजवळ प्रस्तावित केला होता. ज्यामुळे शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसी, चिकलठाणा परिसरापर्यंत झालेल्या नागरी वसाहतींना समृद्धी महामार्गाला जोडणे सोपे जाणार आहे. ऑरिक सिटीच्या मागे उत्तरेला जयपूर गावाजवळून सन २०१९ मध्ये इंटरलिंक प्रस्तावित केला होता. आता एमआयडीच्या मुख्यालयामार्फत त्याला नुक्तीच मंजुरी मिळाल्याने समृद्धीहून डीएमआयसीत येऊन डीएमआयसीने उभारलेल्या उड्डाणपुलाद्वारे जालना रस्त्यावर जाणे सोपे होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात तीन वर्षापूर्वीच एमआयडीसीने एमएसआरडीसीकडे ४३ कोटी रूपये जमा केले होते. या इंटरलिंक यासंदर्भात एमआयडीसी, डीएमआयसी आणि एमएसआरडीसी व्यवस्थापनांच्या अनेकदा बैठका झाल्या होत्या. दरम्यान एमएसआरडीसीने  इंटरलिंक देताना उड्डाणपूल वापरण्याची परवानगी दिलेली होती. आता सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण झाल्याने एमआयडीसीसह डीएमआयसीला इंटरलिंकद्वारे समृद्धी महामार्गावरील प्रवेश सोपा होणार आहे. एमएसआरडीसीकडे सादर केलेल्या प्रस्तावावर तत्कालीन मुख्य अभियंता बी. सालुंखे यांनी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यानेच आज हा मार्ग सुखकर झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Samruddhi Mahamarg
1026 कोटींचा सिन्नर-शिर्डी चौपदरी मार्ग अंतिम टप्प्यात

पाठपुराव्याला यश

समृद्धी महामार्गाला शेंद्रा व डीएमआयसीला इंटरलिंक होण्यासाठी स्थानिक पातळीवरून एमआयडीसी, डीएमआयडीसीने सातत्याने पाठपुरावा केल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता लवकरच उद्योगनगरीला समृध्दीची जोड मिळाल्याने उद्योग दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com