औरंगाबादेत 'या' अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शशिकांत हदगल (Shashikant Hadgal) यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ सोलापूर ते धुळे (Solapur To Dhule) या रस्त्याच्या भूसंपादनामध्ये गंभीर स्वरुपाच्या अनियमितता केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील निलंबनाचे आदेश अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी दिले आहेत.

Aurangabad
'शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी जुन्याच प्रस्तावानुसार भूसंपादन करा'

या आदेशात शासनाचे अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी नमूद केले आहे की, औरंगाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शशिकांत हदगल यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९च्या नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबित राहतील.

Aurangabad
'शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना धारेवर धरणार'

निलंबन कालावधीत हदगल यांचे मुख्यालय औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. हदगल यांनी निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा करू नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com