Sambhajinagar : 150 कोटींच्या चकचकीत रस्त्यांवर कोणी लावले ब्रेकर?

sambhajinagar
sambhajinagarTendernama
Published on

छ्त्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बांधकाम झालेल्या रस्त्यांवर रिलायन्स (Reliance) कंपनीच्या जिवो (JIO) नेटवर्कच्या नावाने तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत व महावितरणसह महानगरपालिकेकडून जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्यांलगत खूप मोठ्या प्रमाणावर खोदकाम चालू आहे.

यामध्ये रस्त्यांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. दुसरीकडे महानगरपालिका, एमएसआरडीसी व एमआयडीसीच्या माध्यमातून बांधकाम झालेल्या चकचकीत रस्त्यांवर देखील आता ब्रेकर लाऊन रस्ते फोडण्याचे काम सुरू असून याबाबत महानगरपालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका नागरिकांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

sambhajinagar
Malegaon : मालेगाव महापालिकेचे घंटागाडीचे 75 कोटींचे टेंडर का सापडले वादात?

शहरातील जकात नाका ते मदनी चौकाच्या दिशेने महावितरण कंपनीने केबल टाकण्यासाठी हत्तीमहल ते महानगरपालिका या रस्त्याचे आरपार खोदकाम केले. यासंदर्भात 'टेंडरनामा'कडे तक्रार प्राप्त होताच खोदकामाची चौकशी केली. दरम्यान महावितरण कंपनीने केबल टाकण्यासाठी रविवारी रात्री रस्ता खोदल्याचे नागरिकांनी सांगितले.

अद्याप या रस्त्यात खोदकाम सुरू आहे. यासाठी रस्त्यालगतच एक ते दीड फुटांपेक्षा जास्त खोल चारीचे खोदकाम केले जात आहे. हे काम करीत असताना रस्ता व रस्त्याच्या साइडपट्ट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई कोण करून देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे सिडको एन - पाच टाऊन सेंटर भागात जीएसटी कार्यालय ते शिवा नाश्तासेंटर समोर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून मोठा चर खोदून नाली तयार करण्यात आली आहे. सिडको एन - तीन भागात कामगार चौक ते हायकोर्ट मार्गावर देखील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या मधोमध चर खोदण्यात आला आहे. शहरातील दीडशे कोटीतून बांधकाम झालेल्या सर्वच रस्त्यांवर अशा पध्दतीने खोदकाम करण्यात आले आहे.

sambhajinagar
Mumbai : खारघर-तुर्भे लिंक रोडचा लवकरच नारळ; वाशी ते खारघर पोहचा दहाच मिनिटांत

एक तर वर्षानुवर्षे पक्के रस्ते शहरात होत नाहीत. असे असताना झालेल्या रस्त्याचे नुकसान करण्याचा सपाटा रिलायन्स जिवो, महावितरण, बीएसएनएल, महानगरपालिकेने लावला आहे. या कंत्राटदारांकडे खोदकाम करण्यासाठी लागणारे कोणतेही परवानगी पत्र नाही. परवानगी बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. एवढेच नाही तर संबंधित कंत्राटदार राजकीय दबावाचा वापर करण्याची भाषा करतात, तर काही ठिकाणी दंडेलशाहीचा उपयोग करून खोदकाम करत आहेत, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत.

या शिवाय सिडकोतील सिडको बसस्थानक ते हर्सुल टी पाॅईंट लगत  मागील चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमणात हरितपट्ट्यात झाडे लावली आहेत. ती झाडे जलवाहिनीसाठी तोडण्यात येत आहेत. यामुळे नागरिक मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत.

sambhajinagar
Mumbai : 'त्या' मोक्याच्या 29 एकर जागेचा विकास अदानीच करणार; 'एलॲण्डटी'ला टाकले मागे

संबंधित कंपन्यांनी खोदकाम करण्यासाठी परवानग्या घेतल्या आहेत का? हे खोदकाम करताना रस्त्याच्या साइडपट्ट्यांची झालेली नुकसान भरपाई कोण करून देणार? या बाबत नागरिक विचारणा करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका उद्यान व रस्ते बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कंगाल महानगरपालिकेच्या तिजोरीत दमडी नसल्याने राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातून २० रस्त्यांची कामे केली गेली. रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका व एमआयडीसीने सात रस्त्यांची कामे केली आहेत. निधी मंजुरीनंतर संबंधितांनी टेंडर प्रसिद्ध केले. कंत्राटदारामार्फत रस्ते चकाचक झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच रस्त्यांची तोडफोड पाहून छत्रपती संभाजीनगरकर हळहळ व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com