Sambhajinagar : कटकट गेटसाठी 50 लाखांची उधळपट्टी करून साध्य काय झाले?

 Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ऐतिहासिक कटकट गेट ही शहराची ओळख. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी हा दरवाजा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. दीड वर्षांपूर्वी या दरवाजाचे मोठा गवगवा करत सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र दरवाजाला झळाळी मिळालीच नाही. दरवाजा आकर्षणाचे केंद्र तर ठरलेच नाही, याऊलट कंत्राटदाराने निकृष्ट आणि अर्धवट काम केल्याने दरवाजाचे पार वाटोळे झाले आहे.

 Sambhajinagar
Nashik : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी 56 किमीचे दोन रिंगरोड

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक शहरात येतात. यातील काहीजण वेरूळ लेण्यांसह शहरातील बिबी-का मकबरा, पाणचक्की पाहून परतात. त्यांना ऐतिहासिक दरवाजांसह शहरातील इतर पर्यटनस्थळांपर्यंत कसे नेता येईल, यासाठी तत्कालिन महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ. विनायक निपुण यांनी प्रयत्न सुरू केले होते. यात शहरातील इतर ऐतिहासिक दरवाजांच्या दुरुस्तीसह कटकटगेट दरवाजाची दुरवस्था, पडझड झाल्याने याही दुरुस्ती करणे गरजेचे वाटले.

 Sambhajinagar
Nashik : अवघ्या 4 दिवसांत कोट्यवधींचा खर्च; आता हिशोबाची लगबग

त्यानुसार कटकटगेट दरवाजांच्या सौंदर्यीकरणाचे टेंडर काढण्यात आले; पण महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून हे कामे स्मार्ट सिटी योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या टेंडरलाही लॉकडाउनचा फटका बसला. अखेर दीड वर्षांपूर्वी कटकटगेटच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने ५० लाखाचा खर्च दाखवला. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट करण्यात आले.

 Sambhajinagar
मोठी बातमी! पुणे रिंगरोडसाठी टेंडर प्रक्रिया सुरु; कामाचे टप्पेही तयार

दरवाजाच्या भिंतींवर आणि सुशोभीकरणासाठी केलेल्या ताटव्यांमध्ये गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. दरवाजासमोरच चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. पडझड झालेल्या भागाचे अत्यंत निकृष्टपणे बांधकाम झाले असून, जुन्या पद्धतीचे रूप देण्यासाठी टाकलेल्या दगडांमध्ये भेगा पडलेल्या आहेत. भिंतींवर मारलेल्या रंगरंगोटीचे पोपडे निघून उखडलेले प्लाॅस्टर निकृष्ट काम झाल्याचा पुरावा देत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com