Sambhajinagar : अधिकाऱ्यांची उदासीनता अन् कंत्राटदाराची बेफिकिरी; 'स्मार्ट'सिटीतील नागरिकांचा संताप

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर अर्धवट रस्ता पूर्ण केला. मात्र गत वीस दिवसांपासून रस्त्यावरच राडा रोडा ठेवल्याने निम्मा रस्ताच बंद केला. दुरुस्ती केल्यानंतरही कटकटगेट समोरच वाहत्या पाण्याचे तळे साचते. मात्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या (Smart City) अधिकाऱ्यांना येथील समस्यांबाबत थोडेही शहाणपण सूचत नाही.

एकीकडे (अ)स्मार्ट रस्त्याच्या कंत्राटदाराने क्षुल्लक कारणासाठी कटकटगेटची वाट अडवून ठेवली. पुढे कटकट गेटच्या दर्शनी भागात नाल्याची दुरूस्ती सुरू असल्याने तेथील कंत्राटदाराने देखील वाट अरुंद केल्याने मात्र प्रवाशांनी वाट काढावी कशी, असा सवाल 'टेंडरनामा'च्या पाहणीत उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Nashik : सिन्नर MIDC होणार नाशिकमधील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत; एकरी 52 लाखांचा दर

छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, दमडी महल व चंपाचौक ते कटकटगेट या सिडको-हडको टीव्हीसेंटरला जोडलेल्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाबाबत या भागातील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून या भागातील नागरिकांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रतिनिधीने पाहणी केली असता, गत काही महिन्यांपासून कटकटगेटच्या दिशेने उतारावर खड्डे तसेच ठेऊन रस्ता दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळत ठेवला होता.

Sambhajinagar
Sambhajinagar : संभाजीनगरकरांना रेल्वेने दिली Good News! पुढील 30 महिन्यांत...

यावर 'टेंडरनामा' वृत्त प्रकाशित करताच कंत्राटदाराने काम सुरू केले. कटकटगेटच्या उतारावर खड्डे बुजवले. कालावधीनुसार क्युरिंगही केली. परंतु रस्ता रुंदवल्यानंतर गत वीस दिवसांपासून राडारोडा आणि मातीचा बंधारा तसाच पडून आहे. ती उचलण्याची तसदी कंत्राटदाराकडून करण्यात आली नाही. या कारणावरून आसपासच्या व्यापारी, उद्योजक व नागरिक तसेच प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अखेर या भागातील नागरिकांनी पुन्हा 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन येथील व्यापारी व प्रवाशांशी संवाद साधला असता रस्त्याला अडथळा ठरणारा राडारोडा कंत्राटदाराने हटवला पाहिजे.

दरम्यान टाईम्स काॅलनी ते कटकटगेट जवळपास साडेचार कोटीतून तयार केलेला हा रस्ता देखील इतर रस्त्यांप्रमाणेच उखडलेला दिसला. संबंधित कंत्राटदाराने सुमार दर्जाचे काम केल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे या रस्त्याचे काम झाले नसल्याचा आक्षेप देखील या भागातील नागरिकांचा आहे.

Sambhajinagar
Pune : मोठी बातमी! 'या' कारणांमुळे घसरला पुणे विमातळाचा दर्जा?

काम सुरू होण्यापूर्वी सदर ठिकाणी कामाच्या माहितीचा फलक लावणे गरजेचे होते. याबाबत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारही नागरिकांनी केली होती. परंतु नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत काम केले गेले आहे. आपल्या भागात होत असलेल्या सिमेंट रस्त्यांबाबत व या कामाविषयी कोणतीच माहिती नव्हती.

अखेर काही सूज्ञ नागरिकांनी अंदाजपत्रक तपासल्यानंतर सुमार दर्जाचे काम होत असल्याचे लक्षात आले. नव्या व जुन्या शहराला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे गावातील हा महत्त्वाचा रस्ता समजला जातो. यामुळे इस्टिमेटप्रमाणे या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com