Sambhajinagar : चाळीशी उलटलेल्या इमारतीवरच बांधला दुसरा मजला; विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Smabhajinagar) : छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन - ६ परिसरातील संभाजी कॉलनीतील महानगरपालिकेच्या शाळेची इमारत द वर्ल्ड स्कूल या शाळेला भाडेतत्वावर देण्यात आलेली आहे. सदर इमारत ही ४० वर्षे जुनी आहे. मात्र, द वर्ल्ड स्कूल या भाडेकरू शाळा व्यवस्थापनाने या इमारतीवर नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, सदर मनपा शाळेची इमारत ही अत्यंत जीर्ण व शीर्ण झालेली असून, इमारतीस तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करून शाळेत प्ले ग्रुप ते इयत्ता १० वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Sambhajinagar
CM Eknath Shinde : मुंबईतील SRA च्या रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार 'बुस्टर'! काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

या इमारतीचा स्लॅब देखील कमकुवत असून स्लॅब कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना व धोकादायक इमारत असताना शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेची कुठलीही काळजी न घेता इमारतीवर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू केले आहे.

धोकादायक इमारतीच्या स्लॅबवर नवीन या बिल्डींगवरती बांधकाम साहित्य, पत्रे, बल्ल्या, विटा, सिमेंट आणून ठेवले आहे. बांधकाम सध्या पावसाळा सुरू असल्याने वादळ वाऱ्यामुळे इमारतीवर ठेवलेले बांधकाम साहित्य व पत्रे हे उडून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व परिसरातील नागरीकांच्या जिवीतास हानी किंवा अपघात होवून ईजा पोहोचू शकते.

Sambhajinagar
Sand Auction : वाळू धोरणाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; मंत्री विखे पाटीलच म्हणाले...

तसेच, सदर इमारत ही ४० वर्षांपुर्वीची असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीचा स्लॅब अतिरिक्त वजन झेलण्यास व स्लॅबवर नवीन बांधकाम करण्यास सक्षम आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. तसेच, द वर्ल्ड स्कूल प्रशासनाने बांधकाम करण्यासाठी नगरविकास, बांधकाम विभाग, मनपा, सिडको प्रशासनाची परवानगी घेतली आहे का, याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.

Sambhajinagar
Vedanta Foxconn, Airbus : प्रकल्प बाहेर जाण्याबाबत सामंतांनी सादर केली श्वेतपत्रिकाच; खरं कोण?

शाळेच्या इमारतीवर बांधकाम करण्यासाठी मनपाने ठराव मंजूर केला आहे का किंवा यासंदर्भात ना हरकत दिली आहे का, याची चौकशी करण्यात यावी. सद्यःस्थितीत चालू असलेले बांधकाम हे विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका पोहोचविणारे आहे. त्यामुळे हे बांधकाम तात्काळ थांबवून हजारो विद्यार्थ्यांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनिष नरवडे यांनी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना दिले निवेदनाद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com