Sambhajinagar : सांडपाणी वाहिनीच्या दुरावस्थेवर नागरिकांचे प्रश्न

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : साडेतीनशे कोटी रूपये खर्च करून भूमिगत गटार योजना राबवली. यानंतर देखील शहरातल्या ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा  वाजले आहेत. त्यात संभाजीनगरातील ज्योतीनगर या उच्चभ्रू भागातील नागरिकांनी थेट महापालिका प्रशासकांकडे बोट दाखवत आम्ही ड्रेनेजच्या घाण पाण्यातून लोटांगण घालायचे का? असा संतप्त सवाल केला आहे. प्रभाग अभियंत्यांकडे तक्रार करून देखील दुरूस्तीकडे कानाडोळा केला जातो. शहरात नको त्या कामाचे डिजिटल फलकाद्वारे जाहिरातबाजीतून कौतुक सुरू आहे. मात्र अंतर्गत गल्लीबोळात जेथे लोक राहतात त्या अत्यावश्यक सेवांच्या दुरूस्तीकडे प्रभाग अभियंता आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. आठ दिवसात दुरूस्ती केली नाहीतर ड्रेनेजच्या पाण्यात झोपून प्रशासनाचा निषेध केला जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Sambhajinagar
MMRDA : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार

कोराना परतल्याची धास्ती, रूग्णालयात गर्दी

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. एकीकडे कोरोना परतल्याची शहरात चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी रूग्ण दगावल्याची घटना देखील घडली आहे. शहर साथरोगाने फणफणल्याची साक्ष महापालिका व इतर सरकारी व खाजगी रूग्णालय देत आहेत. असे असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे

शुध्द हवेसाठी कोट्यावधीचा चुराडा मलनिस:रण वाहिन्यांचे काय?

दुसरीकडे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शहरातील Air quality मध्ये सुधारणा आणण्यासाठी तसेच स्वच्छता विषयक बाबींचा दर्जा उंचावण्यासाठी वित्तीय वर्षात सरकारकडून ४५ कोटीच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामधून प्रामुख्याने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील कारंजाचे नुतनीकरण व देखभाल दुरूस्ती, व्हर्टीकल गार्डन उभारणी, घन कचरा व्यवस्थापणात सुधारणा करणे आदी कामांचा माणस व्यक्त केला जात आहे. याआधी या कामांवर महापालिकेने कोट्यावधी रूपये खर्च केले. सोबतच याच निधीतून छत्रपती संभाजीनगरकरांना शुद्ध हवेसाठी स्मार्ट सिटीमार्फत प्रदुषण विरहित पर्यावरणपुरक ई-बसेस खरेदी करण्याची तयारी केली जात आहे. मात्र जुनाट मलनिःसारण वाहिन्यांकडे कानाडोळा केला जात आहे. शहरातले अनेक रस्ते ड्रेनेज आणि पिण्यापाण्याच्या विळख्यात सापडलेली आहेत. शहरातील ज्योतीनगर भागातील गल्ली क्रमांक - ४ चा सिमेंट रस्ता हा गटारगंगेत रूपांतर झाला आहे. याच भागातील हे घाण पाणी विश्वरूप चौकातून थेट दशमेशनगरातील डांबर शिल्लक नसलेल्या खड्डेमय रस्त्यातून वाहत अनेक खड्ड्यात तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे.

Sambhajinagar
Mumbai: कोस्टल रोडसाठी 'इतकीच' प्रतीक्षा; बीएमसीने मनुष्यबळ वाढवले

संपुर्ण शहरात दुर्गंधीची बोंबाबोंब

एवढेच नव्हे, तर शहरातल्या ९ झोनमधील ११५ वॉर्डापैकी अर्ध्याहून अधिक भागाला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा पडल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे. सातारा-देवळाई, बीडबायपास तसेच शहरातील गुंठेवारी भागासह एन-१ ते एन-१३ या भागात पावलोपावली हा त्रास पाचवीलाच पुजला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्थानिक पातळ्यांवर करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक आमदार, महापालिकेतील माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी तसेच पालिका प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीनगरकरांनी  एकत्र येऊन वज्रमुठ बांधण्याची गरज आहे.

Sambhajinagar
Nashik : जलजीवन मिशनचा 74 कोटी निधी परत जाण्यास जबाबदार कोण?

रोजचंच मढं त्याला कोण रडं

रेल्वेस्टेशन रोड-गोपाल टी चौकापासून एसएससी बोर्ड ते अहिल्याबाई होळकर चौकादरम्यान तसेच शहानुरवाडीतील जुनी एच. बी. एच काॅलनीच्या प्रवेशद्वारातच गेल्या तीन महिन्यांपासून ड्रेनेज व जलव्यवस्था असुरळीत असल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिक महापालिकेसमोर मंडप टाकून धरणे आंदोलने करतात, निषेध व्यक्त करतात. थेट ड्रेनेजच्या पाण्यामध्ये झोपून प्रशासनाचा निषेध देखील नोंदवल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वेस्टेशन येथील नव्या इमारतीकडे जाणारा रस्ता हा जवळपास ड्रेनेजच्या पाण्यामुळे पूर्ण व्यापला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: रस्त्यात येणारे 300 विद्युत खांब हटविणार; 15 कोटी..

रस्त्यांवर गटारगंगा रस्तेही खड्डेमय

रस्त्यांवर ड्रेनेजचे पाणी त्याचबरोबर इथल्या रस्त्याचे ही मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने शहानुरवाडी टिळकनगर ते जवाहरनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील चेतकघोडा चौकात  रस्ता पूर्ण बंद झाला आहे. परिणामी हा सर्व परिसर ड्रेनेजच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सातारा-देवळाईकरांना कामाकडे लक्ष द्या

शहरातील कोट्यावधींच्या भूमिगत गटार योजनेची वाट लावली. आता केंद्र सरकार पुरस्कृत अमृत-२.० योजनेंतर्गत सातारा देवळाईसाठी मलनि:सारण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारने २७५.६८ कोटीची योजना मंजुर केली आहे. या योजनेंतर्गत चालु आर्थिक वर्षात अनुदान प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने चालु आर्थिक वर्षात १२७ कोटीची जमा व खर्चाची तरतुद केलेली आहे. या योजनेकरीता महापालिका हिश्यापोटी ३० कोटीची तरतूद केलेली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच टेंडर काढुन कामे केली जातील. पण योजनेत शहराच्या भूमिगत गटार योजनेची वाट आणि त्यात अनियमितता करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. सदर काम ठेकेदारामार्फत सुरू करताच वर्क ऑर्डर, टेंडरकाॅपी, योजनेतील खोदकाम किती लांबी रूंदीचे आहे. योजनेत अंतर्गत आणि मुख्य पाइप किती व्यासाचे आहेत. किती किलोमीटरचा योजनेत समावेश आहे. बांधकामात कोणत्या दर्जाच्या सिमेंट विटा आणि रेती आहे. योजनेत मुख्य मेनहोल आणि अंतर्गत मेनहोलची गोलाई आणि खोली किती राहणार आहे. सांडपाणी कुठल्या एचटीपी पंपावर नेणार आहेत. त्या पाइपलाइनचा प्रवास आणि आकार याची इत्यंभूत माहिती येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडून घ्यावी. काम कोण करतंय, जबाबदार अधिकारी कोण, किती महिन्यात योजना पुर्ण करणार, योजनेचा खर्च किती, योजनेच्या डीपीआरसह प्रत्येक भागात फलक लावण्याचा आग्रह धरावा. लोक जागृत राहीले आणि सुरूवातीपासून यंत्रणेवर दबाब राहीला, तर काम चांगले होईल व काही वर्ष योजनेचा फायदा होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com