Sambhajinagar : नियमांवर पांघरूण घालून कंत्राटदाराचे खोदकाम सुरूच; पाणीपुरवठा योजनेने...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. काही रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिकांना खिंडारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. अशातच सिडको भागातील जयभवानीनगर चौक ते कामगार चौक दरम्यान मजीप्राने जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केल्याने दोन वर्षांपूर्वीच बारा कोटी रूपये खर्च करून तयार झालेल्या या रस्त्याची अवस्था मातीमोल करून टाकली आहे. त्यामुळे एका बाजूने आता रस्ता असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. विशेषतः शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा खोदकाम न करता रात्रीच्या वेळी खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात यावी, असे स्पष्टपणे शहर वाहतूक शाखेने दिलेल्या परवानगीत नमुद असताना दिवसा खोदकामासाठी रस्त्याची एक बाजू बंद केली जात असल्याने एकाच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक विहिरींचा झाला 'कचरा'

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मजीप्रा आणि नवीन पाणीपुरवठा योजनेचा कंत्राटदार जीव्हीपीआर यांनी शहर वाहतुक शाखेने दिलेल्या परवान्याचे उल्लंघन करत दिवसा खोदकाम करून छत्रपती संभाजीनगरकरांच्या डोळ्यात धुळफेक सुरू करणे सुरूच ठेवले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर दिवसा खोदकाम करत असताना महानगरपालिका, वाहतुक शाखा मात्र सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. आधीच हा रस्ता मागील तीस वर्षांपासून उखडला होता. उखडलेला रस्ता दुरूस्तीसाठी नागरिकांना तीस वर्ष संघर्ष करावा लागला. २०१८ मध्ये सरकारी अनुदानातुन तब्बल बारा कोटी रूपये खर्च करून सिडको जळगाव टी पाॅईंट ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपर्यंत सिमेंट काॅक्रीटीचा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र आता जलवाहिनीच्या कारणासाठी रस्ता खोदण्यात येत असल्याने रस्त्याची अधिक वाट लागत आहे.शहरातील हा एकच नव्हे बहुतांश गुळगुळीत रस्ते जलवाहिनीसाठी खोदण्यात येत आहेत. मात्र अद्याप एकाही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाहीऐ. त्यामुळे आधीच प्रचंड रहदारी असलेले हे रस्ते  खोदकाम केल्याने अरुंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : जलतज्ज्ञांच्या उपायांकडे कोणी केला कानाडोळा; अंमलबजावणी...

सिडको जळगाव टी पाॅईंटकडून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन व सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या नागरी वसाहतींकडे प्रवेश करण्यासाठी हाच सोयीचा रस्ता असून, अनेक भागातील नागरिकांनादेखील याच रस्त्याने ये-जा करावी लागते. शहर बस, कामगार व शालेय बसेस तसेच अवजड वाहनेदेखील याच रस्त्याने जातात. या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी बाजारपेठ आहे. शिवाय सरकारी व निमसरकारी कार्यालये, बॅंका, एटीएम, हाॅटेल्स, मोठी रूग्णालये याच रस्त्यावर आहेत. आधी कामगार चौक ते सिडको उड्डाणपुलापर्यंत रस्ता खोदण्यात आला. जलवाहिनी टाकल्यानंतर दुरूस्ती न केल्याने अवकाळी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता खचल्याने वाहने चिखलात अडकुण पडत आहेत. त्यात पाणी साचत आहे.‌ त्यात आता जलवाहिनी टाकण्यासाठी कामगार चौक ते जयभवानीनगर ते विश्रांतीनगर ते शिवाजीनगर रस्ता खोदकाम केल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सकाळी शालेय विद्यार्थी, पालकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे संपूर्ण शहर परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. किमान दोन वर्ष तरी शहरात हे काम सुरू राहणार असल्याने नागरिकांना दोन वर्ष अशाच रस्त्यांवरून वाट काढावी लागेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com