छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक विहिरींचा झाला 'कचरा'

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराचे शिल्पकार मलीक अंबर तसेच निजामकालीन व तत्कालीन नगर परिषद काळातील बनलेल्या सार्वजनिक विहिरी कचऱ्याने तुडुंब भरल्या असून सार्वजनिक विहिरी कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत. या गंभीर समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : महापालिका बांधतेय शेततळे; साडेसाळा लाखांचा खर्च

सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचे चटके मोठ्या प्रमाणात सोसावे लागत आहेत. पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. काही विहिरी चांगल्या स्थितीत आहेत. त्या विहिरींकडे लक्ष दिल्यास तेथील नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची झळ पोहोचणार नाही. ज्या विहिरीत अगोदर कचरा आहे, त्या विहिरीत नागरिक पुन्हा कचरा टाकतात. त्यासाठी विहिरींची सफाई केल्यास नागरिकसुद्धा पुन्हा कचरा टाकणार नाहीत. तुडुंब कचऱ्याने भरलेल्या विहिरींकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही तर त्या विहिरींचे रूपांतर कचऱ्याच्या कुडेदानमध्ये होईल. या विहिरींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना त्रास  होत आहे. तरीही नागरिक विहिरींचा उपयोग कचराकुंडी म्हणून करीत आहेत. काही विहिरींत पाणी असल्यामुळे त्या विहिरींची स्थिती चांगली आहे. यातील काही विहिरींवर महापालिकेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु विहिरींची देखभाल न केल्यामुळे त्या विहिरी कचरामय झाल्या आहेत. शहरातील सर्वच विहिरीची स्थिती चिंताग्रस्त झाली आहे. महापालिकेने या विहिरींकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानीक नागरिकांनी केला आहे.

Sambhajinagar
Mumbai : 'त्या' ऐतिहासिक कॉलनीच्या पुनर्विकासाला कोणामुळे लागला ब्रेक?

सालाबादप्रमाणे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते. त्याकरिता महापालिका प्रशासनाने काही उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेने आतापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. शहरातील विहिरींची साफसफाई झालेली नाही. सार्वजानिक विहिरींची सफाई झाली तर काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटू शकते. जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेली नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप ५० टक्के देखील पूर्ण झालेले नाही. ही योजना पूर्ण होईपर्यंत जुनी जलवाहीनी बदलण्यासाठी दोनशे कोटी खर्च करण्यात आले. पण पाण्याची समंस्या कायम आहे.भर  उन्हाळ्यात नागरिकांना आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळते. त्यावर उपाययोजना म्हणून सार्वजनिक विहिरी स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्या स्वच्छ केलेल्या विहिरींच्या पाण्याचा उपयोग नागरिकांना करता येईल, अन्यथा पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांचा सामना महापालिकेला  करावा लागेल. शहरातील विहिरीत कचऱ्याचे आगार झाल्याने त्या विहिरी बंद अवस्थेत आहेत. ज्या विहिरी चांगल्या स्थितीत आहेत, त्या मध्ये महानगरपालिकेच्या वतीने ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकली जात नाही. त्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. कधीच विहिरीच्या पाण्याची तपासणी केली जात नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करित आहेत. सालाबादप्रमाणे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता विहिरींची सफाई करण्यासाठी टेंडर काढुन दुष्काळाच्या समंस्येचे निवारण करता येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com