Sambhajinagar : जीव्हीपीआरचा हलगर्जीपणा; अपघाताचा नवा ब्लॅकस्पाॅट

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-टू प्रबोधनकार ठाकरेनगरात दिवसरात्र लहान-मोठ्या अपघाताचे सावट पसरलेले आहे. यामुळे एखाद्याचा बळी जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाजीनगरमधील शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर या ठेकेदाराने पाईप ठेवल्याने वाहनधारकांना फटका बसला आहे. तसेच वर्षभरापासून येथे वाहनधारकांच्या आपआपसात शाब्दिक चकमकी झडत आहेत. प्रकरण  हाणामाऱ्यांपर्यंत जात आहे. दरम्यान, पोलिसांचा देखील ताण वाढला असून, वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढत आहेत.

Sambhajinagar
Mumbai : अदानींकडील धारावीच्या टेंडरमध्ये पक्षपात; कोणी केला आरोप?

संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर देखील निर्ढावलेल्या ठेकेदाराला फरक पडत नाही. न्यायालयाने स्थापन केलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने हातापाया जोडूनही तो बघत नाही. नगर विकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे मुख्य अभियंत्यांनी या प्रकल्पाला २३ ऑगस्ट २०१९ रोजी तांत्रिक मान्यता दिली. या प्रकल्पात पुढील ३३ वर्षात ३३ लाख १७ हजार ५० अर्थात २०५२ पर्यंत इतक्या लोकसंख्येचा आकडा समोर ठेऊन सुरूवातीला अंदाजपत्रकीय रकमेनुसार  १६८०.५० कोटी इतक्या रकमेची ही योजना सर्वात कमी दराने भरल्याने १४३७.५० कोटीचा ही योजना दरवाढीचे कारण पुढे करत २७००.५० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. मे. जीव्हीपीआर या कंपनीला ४ फेब्रुवारी २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.

Sambhajinagar
Nashik : महापालिका मार्चमध्ये खरेदी करणार 25 इलेक्ट्रिक बसेस

याच योजनेअंतर्गत सिडको एन-२ येथे शिवाजी मैदानात ५९२ मीटर जमीन पातळीवर ७७ हजार ३१७ इतकी लोकसंख्या गृहीत धरून ३४.६५ लिटर क्षमतेचा २२ मीटर उंचीच्या जलकुंभ बांधण्याचे काम गत दोन वर्षांपासून अत्यंत कासवगतीने सुरू आहे. दरम्यान, याच जलकुंभाकडून जालनारोड सोहम मोटर्स ते कामगार चौक हा रहदारीचा मोठा रस्ता जातो. ठेकेदाराने एसटी काॅलनी ते महालक्ष्मी चौकाकडे वळसा घेणाऱ्या एल टाईप चौकातच रस्त्यालगत ६०० मी. डाय आकाराचे मोठ्या डक्ट आयर्न पाईपांची थप्पी लावली आहे. त्यामुळे रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रहदारीच्या या रस्त्यावर पाइपांमुळे वाहने एकमेकाला दिसण्यास अडथळा येत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, तब्बल वर्षभरापासून हा एल पट्टा अपघातासाठी ब्लॅक स्पाॅट झाल्याचे येथील सी सेक्टर व एसटी काॅलनीतील नागरिकांनी आरोप केला आहे. येथे दररोज वाहनधारकात धडका बसून भांडणे होत असल्याने दोन्ही बाजूला वाहतुक खोळंबत आहे. दरम्यान येथे मार्गावर मोठी शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांना देखील अपघाताचा मोठा धोका असल्याचे पालकांचेही मत आहे. यामुळे अगदी एल पट्ट्यातील चौकालगत ठेवलेले पाइप ठेकेदाराने इतरत्र हलवावेत, अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.

Sambhajinagar
Aurangabad : शिवाजीनगर भुयारी मार्ग; मुल्यांकनाला सरकारची मंजुरी

प्रशासनातील कारभारी डोळे असून अंध

येथील जलकुंभ कामाची पाहणी करण्यासाठी मजीप्राचे आणि प्रकल्प मॅनेजमेंट कमिटीचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी दररोज कामावर येतात. पाइप ठेवण्यासाठी चुकीची जागा निवडल्याने होत असलेले अपघात उघड्या डोळ्याने पाहतात. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथे मोठ्या अपघाताची शंक्यता असलेली तक्रार मजीप्रा विभागाकडे करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रशासनाने तक्रारीची दखल न घेल्याने अधिकारी व ठाकेदाराने अपघातासाठीच हे कृत्य केले आहे का, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com