Sambhajinagar : प्रशासक गरजले अन् ठेकेदार बदलले, पण...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : हाॅटेल दिपाली-कामगार चौक-जयभवानी नगर-मुकुंदवाडी रेल्वे हाॅल्ट स्टेशन रस्त्यावरील रस्ता दुभाजकाचे काम निकृष्ट व अपघाताला निमंत्रण देणारे ठरणारे असल्याचे सचित्र वृत्त 'टेंडरनामा'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय चांगलेच गरजले. त्यांनी तीव्र संताप व्यक्त करताच धास्तावलेल्या कारभाऱ्यांचे पथक दुभाजकाची पहाणी करण्यासाठी धडकले. कारभाऱ्यांनी वृत्ताचे दाखले देत ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर ठेकेदाराने सबठेकेदार बदलले. तथापी निकृष्ट काम करणाऱ्या सब ठेकेदारानंतर नव्याने आलेल्या सब ठेकेदाराने देखील आधीपेक्षा हे काम अतिशय निकृष्ट केले.

Sambhajinagar
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

'प्रशासक साहेब'आम्ही आहोत टेंडर प्रक्रियेचे पहारेकरी

दुभाजकाच्या या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर नवनियुक्त प्रशासक जी. श्रीकांत काय कारवाई करतात. याकडे आता 'टेंडरनामा'चे बारकाईने लक्ष आहे. कारण हे कोट्यावधी रूपयातून होत असलेले काम अधिकारी आणि ठेकेदाराच्या नव्हे, तर जनतेच्या पैशातून होत आहे. याच विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्यांवर 'टेंडरनामा" पहारेकरीची भुमिका निभावनारच आणि धडा शिकवणारच.

Sambhajinagar
CM Shinde:मुंबईत पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यास सर्वंकष धोरण

प्रशासक साहेब' या प्रश्नाची उत्तरे द्या

१.  कुणी खाल्ली या दुभाजकातील काळी माती आणि सिमेंट, लोखंड आणि कुणी पिले क्यूरीनचे पाणी?

२. कुणी टाकले दुभाजकात दगड आणि कचऱ्याचे ढीग?

३ . दगड आणि कचऱ्याने दुभाजकात झाडांची वाढ कशी होणार?

४   का पडले दुभाजकाला तडे? अनेक ठिकाणी गॅप का सोडण्यात आले?

मागील अडीच वर्षांपासून सिडको एन-२ एसटी काॅलनी आणि सिडको एन-३ या गजबजलेल्या दोन वार्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या हाॅटेल दिपाली ते कामगार चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या कामाचा रखडपणा चालला आहे. मध्यंतरी याच मार्गावरील दुभाजकाचे निकृष्ट काम होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांनी टेंडरनामाकडे केली होती. त्यानंतर प्रतिनिधीने शहानिशा केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यावर  टेंडरनामाने 'त्या' दुभाजकाच्या निकृष्ट कामाचा भांडाफोड केला होता.

Sambhajinagar
Sambhajinagar : महामार्गावरील 613 कोटीच्या दुरूस्तीनंतरही खड्डेच..

तत्कालिन प्रशासकांकडून दखल 

त्यावर तत्कालिन पालिका प्रशासक तथा नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता भागवतराव फड, राजीव संधा, उप अभियंता शशिकांत पाटील यांनी तातडीने दुभाजक बांधकामावर धाव घेत सब ठेकेदार दत्ता पोखरकर यांना काम बंद करण्याचे आदेशित केले होते. मात्र, वृत्तानंतर पोखरकर यांनी कामात सुधारणा केली असताना या रस्त्याचा मुळ ठेकेदार गुरूनानक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने त्याच्याकडून काम बंद करत ४२ मीटर पुढील अर्धवट स्थितीतील रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्याचे काम टोणगावकर आणि आरेफ पठाण  नामक कंत्राटदाराकडून सुरू केले होते. मात्र  शुक्रवारी 'टेंडरनामा' प्रतिनिधीनी एका स्थापत्य अभियंत्यासोबत याकामाची पाहणी केली असता या कामामुळे 'असून अडचण, नसून खोळंबा', अशी अवस्था झाली आहे.

छत्रपती शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन १९ जानेवारी २०२० रोजी  १५२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. या निधीतून २३ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. यात एमआयडीसी आणि 'एमएसआरडीसीसह महापालिकेला कामांचे वाटप करण्यात आले होते. यात पालिकेच्या माध्यमातून नऊ रस्त्यांची कामे करण्यात आली होती. या रस्त्यांच्या कामांसाठी ५० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. यापैकीच दिपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे काँक्रिटीकरणचा अद्याप रखडपणा सुरू आहे. यारस्त्यासाठी तब्बल अकरा कोटी रूपये खर्च केले  आहेत. कंत्राटदार जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात रस्ता बांधकामाचा ठेका देण्यात आला आहे.

Sambhajinagar
Nashik : महापालिकेच्या यांत्रिकी झाडू खरेदीला सरकारचा हिरवा कंदील

सोळाशे मीटर लांबी आणि १४ मीटर रूंद काँक्रिट रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि विद्युत डीपी तशाच ठेवल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. याचबरोबर दीडशे कोटीच्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाण्याचा निचरा करणाऱ्या भूमिगत पाईपांना बगल देत हाॅटेल दिपाली ते जयभवानी चौक या उतारावरील रस्त्याच्या फुटपाथलगत कन्व्हर्ट केल्याने त्यातून पाण्याचा निचरा न होता याऊलट वाहने अडखळत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजुने फुटपाथचे काम देखील अर्धवट आहे. विशेष म्हणजे या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्यांची लेव्हल न केल्याने जयभवानीनगर, विश्रांनीनगर, मायानगरातील सखल भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

रस्त्याचा असा रखडपणा असताना ठेकेदार कंपनीकडून हाॅटेल दिपाली ते कामगार चौक ते जरभवानीनगर ते मुकंदवाडी रेल्वे स्थानकपर्यत दुभाजकाचे काम घाईगरबडीत संपविण्यात आले. मात्र, ते काम निकृष्ट तसेच त्याची उंची, रुंदी व लांबीही कमी जास्त असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचे ठरणारे आहे. रस्ता ओलांडतानाही अपघात होऊ शकतात. आधीच्या ठेकेदाराने निकृष्ट काम केल्यानंतर रेंगाळलेले हे काम अखेर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले होते. परंतु, पुन्हा कामाचा दर्जा चांगला नसल्याने तसेच दुभाजकाचे पोट रस्त्याच्या दिशेने फुगवल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले. 

प्रशासकांचे मौन

या संदर्भात ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे छायाचित्र टेंडरनामा प्रतिनिधीने पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना पाठवले. त्यांना काही प्रश्न केले. मात्र त्यांनी यावर काही एक बोलण्यास नकार दिला. यानंतर प्रतिनिधीने दुरध्वनीवर संपर्क केला, असता त्यांनी स्वीय सहायकाकडे फोन देत बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले. परिणामी  त्यांची बाजु समजू शकली नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com