टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर प्रशासकांचा मोठा निर्णय; स्मशानभूमींचे रूपडे पालटणार

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील १०७ स्मशानभूमींच्या मरणासन्न अवस्थेवर टेंडरनामाने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. एकीकडे स्मशानभूमीवरच शोककळा पसरलेली असताना महापालिकेने सामान्यांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय म्हणजे स्मशानांच्या दुःखावर मीठ चोळण्याचाच प्रकार, यावर देखील टेंडरनामाने सडेतोड भूमिका मांडली होती. टेंडरनामाच्या या वृत्तमालिकेनंतर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुकुंदवाडीसह शहरातील काही स्मशानभूमींची पाहणी केली होती. त्यात स्मशानभूमींची मरणासन्न अवस्था लक्षात आल्यावर त्यांनी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक अंत्यसंस्कार होणाऱ्या १२ स्मशानांची निवड केली. यासाठी शहरातील वास्तुविशारद धिरज देशमुख यांची नेमणूक केली. त्यांनी १२ स्मशानांचे रूपडे पालटण्यासाठी अंदाजे ३० कोटीचे अंदाजपत्रक तयार केले.आता हा प्रस्ताव शिंदे सरकारकडे पाठवला जाणार आहे.

Sambhajinagar
Good News : 'ZP'च्या 19460 पदांसाठी मेगाभरती; 'या' कंपनीमार्फत प्रक्रिया राबविणार

शहरातील स्मशानांच्या मरणासन्न अवस्थेवर 'टेंडरनामा'ने सातत्याने प्रहार केला. कित्येक ठिकाणी बसण्यासाठी असलेले बाकडे तुटलेले आहेत. बहुतांश ठिकाणी हौद आहेत; पण त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि संध्याकाळी लावण्यासाठी लाइटही अस्तित्वात नाहीत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो. सद्यःस्थितीत पावसाळ्यात तर स्मशानभूमींची अवस्था आणखीच भयंकर झाली आहे. काही स्मशानभूमीत तर पाऊसामुळे गुडघ्याइतके पाणी साचले आहे. पुरेसा निधी नसल्याने मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी महानगरपालिका घेत नसल्यामुळे या स्मशानभूमी व दफनभूमींची अवस्था मरणासन्न झाली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

‘टेंडरनामा’ने सलग आठ दिवस  मिटमिटा, पडेगाव, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, टाऊन हॉल, बुढ्ढीलाइन, किलेअर्क, लोटाकारंजा, रोहिलागल्ली, मालजीपुरा (पुष्पनगरी), हर्सूल, फाजलपुरा, रवींद्रनगर, शहाबाजार, चंपा मशीद, रोशनगेट, कैलासनगर, जाफरगेट, सिडको एन-६, एन-११, सब्जीमंडी, सिल्लेखाना, क्रांती चौक, रमानगर, जालना रोड, गारखेडा, इंदिरानगर, प्रतापगडनगर, शहानूरवाडी, चिकलठाणा, मुकुंदवाडी, मसनतपूर, ब्रिजवाडी, नारेगाव, हमालवाडा, राहुलनगर, इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बनेवाडी, मकईगेट, घाटी परिसर, बायजीपुरा, जिन्सी, शहागंज, पाणचक्की, एसटी कॉलनी, रोजाबाग, पैठणगेट, सिल्कमिल कॉलनी, कोतवालपुरा, बारापुल्ला, कोकणवाडी, पदमपुरा, बागशेरजंग, बेगमपुरा, समर्थनगर आदी ठिकाणच्या सर्व समाज व धर्मीयांच्या एकूण १०७ स्मशानभूमींची अणि दफनभूमींची पाहणी करून माहिती घेतली होती.

Sambhajinagar
Uday Samant : ठाणे मेट्रोचे काम MMRDAला देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा

या सर्वच स्मशानभूमींच्या अनेक समस्या आहेत. तेथील कर्मचाऱ्यांनीही अडचणींचा पाढा वाचला. सर्व सोयींनी युक्त अशी एकही स्मशानभूमी शहरात नाही. मुकुंदवाडी स्मशानभूमीत स्मशानाच्या रस्त्यातच खिंडार मृत्यूला आमंत्रण देत आहे तर ब्रिजवाडी, नारेगाव, मसनतपूर येथे स्मशानभूमी उघड्यावरच आहेत. शहरातील अनेक स्मशानभूमींमध्ये साधी हातपाय धुण्याचीही व्यवस्था नाही. लाखो रुपये खर्चून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; पण जलवाहिनीच नसल्याने या टाक्या बाराही महिने कोरड्याठाक असतात. त्यात अनेक ठिकाणी तर कचरा साठलेला असतो. अनेक स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी बसायला बाकडेही नाहीत. बहुतांश ठिकाणीही बाकडे आणि श्रद्धांजली सभागृहे उद्ध्वस्त झाली आहेत. स्मशानांमधील दिवे वर्षानुवर्षे नादुरुस्त असल्याने रात्रीच्या वेळी कित्येकदा अंधारातच अंत्यविधी उरकले जातात. वाढलेले गाजरगवत आणि रानटी झाडांनी वेढलेल्या अनेक स्मशानभूमींची अवस्था भीतिदायक झालेली आहे. त्यातच अग्निदान शेडची संख्या कमी असल्याने एकाच वेळी अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येथे आल्यास त्यांना बराच वेळ रांगा लावून मग अंत्यविधी करावा लागतो.

Sambhajinagar
Mumbai : मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार; अजित पवार

प्रशासकांचा प्रस्ताव, आमदारांची टेंडरनामाला ग्वाही

‘टेडरनामा’ने या प्रश्नाला वाचा फोडली. महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. स्मशानांच्या मरणासन्न अवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारभाऱ्यांना 'तुम्ही देखील मरणार आहात' तुमचा देखील शेवटचा मुक्काम येथेच आहे,असे म्हणत कारभार्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. त्यावर तातडीने वास्तूविशारदाची नियुक्ती करून मुकुंदवाडी, सिडको एन-६, हडको एन-११, प्रतापगडनगर, सातारा, देवळाई, चिकलठाणा, रमानगर, हर्सुल, भावसिंगपुरा, कैलासनगर येथील स्मशानभूमींचे सर्वेक्षण करण्यात आले. येथील दुरूस्तीसाठी ३० कोटीचे अंदाजपत्रक देखील तयार करण्यात आले आहे. आता शिंदे सरकारकडे सविस्तर प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. यासंदर्भात पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील जी. श्रीकांत यांचे काम चांगले आहे. २४ तास जनतेसाठी स्वतःचा व्हाॅटसप क्रमांक देऊन समंस्या जाणून स्वतः पाहणी करून ते नागरिकांचे समाधान करत आहेत. त्यांनी स्मशानांचा प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही दिली. याशिवाय इतरही स्मशानांचा सविस्तर विकास आराखडा तयार करून त्यांचाही कायापालट केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना दिली 

शहरातील उद्योजकांनी पुढे यावे

शिंदे सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्याला मान्यता मिळेल तेव्हा मिळेल, तूर्तास काही स्मशानभूमींमध्ये आमदार-खासदार व स्थानिक नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीतून कामे केलेली आहेत. यातील ज्या ठिकाणी दुरवस्था असेल त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी उद्योजकांनीही सीएसआर फंडाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करावा. त्यासाठी महापालिकेने देखील शहरातील उद्योजक संघटना, माहेश्वरी समाज मंडळ, किराणा मर्च॔ट असोसिएशन , काॅन्ट्रेक्टर असोसिएशन व इतर सेवाभावी संस्थांची एकत्रित बैठक घेऊन प्रस्ताव मागवावेत. यातून  स्मशानभूमींत ज्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.हिंदू समाजात अस्थींना खूप महत्त्व असते. दशक्रिया विधी करण्याच्या वेळी अस्थींची पूजा करूनच जलदान विधी केला जातो. म्हणूनच त्यासाठी स्मशानभूमीत लॉकर असावे लागते त्यांची दुरूस्ती व खरेदी सीएसआर फंडातून केली जावी. यातून अंत्यविधीशेडचे पत्रे बदलने तसेच  व सामाजिक सभागृहे, स्वच्छतागृहे व पाणपोयांची देखभाल दुरूस्ती करणे सहज शक्य होईल.

स्मशानात फलक लावावेत

कुटुंबातील एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ नातेवाईकांना मदत करायची इच्छा असते. यासाठी मदतीचे आवाहन करणारे फलक लावल्यास वृक्षारोपण, विद्युतीकरण, स्वच्छतागृहे, पाणपोई व इतर कामांसाठी लोक मदत करतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com