Sambhajinagar : महापालिका बांधतेय शेततळे; साडेसाळा लाखांचा खर्च

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका प्रशासनमार्फेत हर्सूल तलावाच्या पायथ्याशी स्मृती आणि जांभुळवनाच्या मधोमध शेततळे तयार केले जात आहे. आता हर्सूल तलावात गणेश विसर्जन न करता शेततळ्यात केले जाणार आहे. यामुळे तलावातील प्रदुषण थांबणार आहे. शिवाय परिसरातील जमीनी पाण्याची पातळी वाढुन जांभुळ वनातील आंब्याची बाग व जांभळाची बाग तसेच स्मृती वनातील फुलझाडांची निगा शेततळ्याच्या माध्यमातून ठेवता येणार आहे. यामुळे महापालिकेच्याआर्थिक विकासालादेखील गती मिळणार आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar Water Shortage : संभाजीनगर शहरावर कोसळणार जलसंकट; 'हे' आहे कारण?

सेंट्रल जेल ते जटवाडा मार्गावर‌ जळगावरोडपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर निजामकालीन हर्सूल तलाव आहे. कितीही मोठा पाऊस झाला तरी मार्च एप्रिल महिन्यात तलाव तळ गाठायला सुरूवात करतो. तलावाच्या बंधार्यालगतच महानगरपालिका उद्यान विभागाने जांभुळ आणि आंब्याच्या झाडांची मोठी वनराई निर्माण केली आहे.तसेच स्मृतीवन देखील विकसित केले आहे. शिवाय स्मृतीवनाचा देखील विकास आराखडा तयार केला आहे. स्मृतीवन व वनराईला पाण्यासाठी मुख्य आधार उशालाच असलेला हर्सूल तलावआहे. मात्र उन्हाळ्यात त्यात पाणी नसते आणि इतर १६ वार्डांना देखील जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा आधार घ्यावा लागतो. विहिरींचे पाणीदेखील उन्हाळ्यात आटते. त्यामुळे बागेतील फळझाडे आणि स्मृतीवनातील  हिरवळीवर त्याचा परिणाम होतो. ती वनराई व हिरवळ जिवंत ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शेततळे आखण्याचा निर्णय घेतला. यात गणेश विसर्जन शिवाय जमीनीत पाण्याची पातळी वाढुन फुलझाडे व फळझाडेही जगवता येतील.

Sambhajinagar
Mumbai : 'त्या' ऐतिहासिक कॉलनीच्या पुनर्विकासाला कोणामुळे लागला ब्रेक?

शेतळ्याचे रितसर ई-टेंडर काढून सदर काम हे शहरातील प्रसिद्ध मोहिते कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सोळा लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात येत आहेत. सदर शेततळ्याच्या चारही बाजूंनी दगडांची पिचिंग केली जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजूंनी तारफेंसिंग केली जाणार आहे. शेततळ्याची गोलाई ४४ मीटर असून दहा मीटर रूंदी आहे. १३० मीटर खोली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com