Sambhajinagar : सिडको उड्डाणपुलाची धावपट्टी होणार गुळगुळीत; हे आहे कारण...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील सिडको येथील जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाची धावपट्टी गुळगुळीत करण्याचे काम एमएसआरडीसीच्या आदेशाने मुख्य कंत्राटदाराकडून सोमवारी (ता. ११) डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे.

Sambhajinagar
Nashik : इंडियाबुल्स सेझकडून 513 हेक्टर जमीन एमआयडीसीला परत मिळणार; 'हे' आहे कारण?

विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जुना सरफेस ६० एम.एम. पर्यंत काढून उड्डाणपुलाच्या १,१२३ मीटर लांबीचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. जुना सरफेस उकरण्यासाठी कंत्राटदारामार्फत खास जर्मन ब्रेंन्डेडची बेलिंग मशीन शहरात पहिल्यांदाच मुंबईहून भाडेतत्वावर आणली आहे. जुना सरफेस उखडून त्यावर नेहमीच्या उंचीतच काम होणार असल्याने कठड्याची उंची वाढणार नाही, तसेच या टिकाऊ कामामुळे पुढील दहा ते पंधरा वर्ष डांबरीकरणाची गरज पडणार नाही, असा दावा कंत्राटदार कंपनीमार्फत करण्यात येत आहे.

सिडकोतील छत्रपती संभाजीनगर - जालना या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी शासनाने ५६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत जळगाव टी पाॅईंट येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळावर (MSRDC) संपूर्ण बांधकामाची जबाबदारी टाकण्यात आली होती.

Sambhajinagar
Nashik : महापालिका सिंहस्थ आराखड्यासाठी सल्लागार संस्था नेमणार; कारण...

टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या मुंबईतील रंजन मिश्रा यांच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) प्रा. लि. कंपनीला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. २० जून २०१६ मध्ये त्यांनी प्रकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर ७ वर्षे पुलाच्या देखभाल दुरुस्तीची त्यांच्याकडे जबाबदारी होती.

टेंडरमधील अटी शर्तीनुसार उड्डाणपुलावरील धावपट्टी आणि पुलाखालचे जोड रस्त्यांचा दोषनिवारण कालावधी ७ वर्षांचा होता. २० डिसेंबर २०२३ मध्ये या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचा कालखंड संपत असल्याने कंत्राटदारामार्फत आता उड्डाणपुलावर अखेरची दुरूस्ती केली जात आहे. यानंतर सदर पुलाची पुढील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com