Sambhajinagar : अखेर चिकलठाणा रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : सुरक्षित रेल्वे वाहतूक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर पाठोपाठ चिकलठाणा येथील जुना बीड बायपास मार्गावरील रेल्वे भुयारी मार्गाचे काम गत आठवड्यात सुरू करण्यात आले आहे.

Sambhajinagar
Nashik ZP : जिल्हा परिषदेत पुन्हा क्लब टेंडरचा घाट; 'बांधकाम'नंतर आता 'हा' विभाग सरसावला

३ नोव्हेंबर २०१९ मध्ये येथे भुयारी मार्ग करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. त्यानुसार काम देखील सुरू करण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराने सोळा आरसीसी बाॅक्स तयार करून काम थांबवले होते. या कामाला गती यावी यासाठी 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे येथील भुयारी मार्गाच्या प्रलंबित कामाबाबत रेल्वे अभियंत्यासह विभागीय व्यवस्थापकांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

शिवाजीनगर, चिकलठाणा पार्श्वभूमीवर आता सातारा, देवळाई, बीड बायपास आणि पैठणरोडवासीयांची छत्रपती संभाजीनगर शहराशी कनेक्टीव्ही वाढविण्यासाठी मुकुंदवाडी - बाळापूर, फुलेनगर तसेच छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरील रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली देखील भुयारी मार्गाची आवश्यकता आहे.

त्याच बरोबर बीड बायपास कमलनयन बजाज रुग्णालय ते निर्लेप ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ते देवगिरी महाविद्यालय या दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी निर्लेप ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ दरम्यान अडसर ठरणाऱ्या रेल्वे रूळावरून उड्डाणपूल उभारणीचे काम तातडीने झाल्यास संग्राम नगर व रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरील वाहतुकीचा लोड कमी होईल.

याचबरोबर सिडको जळगावरोड ते बीड बायपास ते कचनेर कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी जय भवानी नगर ते बीड बायपास अखंड उड्डाणपूल आणि पुढे खडीरोड देवळाई साईटेकडी रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण झाल्यास जालनोरोडची कोंडी फुटेल. यासाठी 'टेंडरनामा'चा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Sambhajinagar
Chhagan Bhujbal : हिवाळी अधिवेशनातून आली नाशिक जिल्ह्यासाठी गुड न्यूज!

छत्रपती संभाजीनगर रेल्वे अभियंता कार्यालयांतर्गत करमाड ते अंकाई पर्यंतचा भाग येतो. या भागात अनेक ठिकाणी आजही मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग तयार करण्यात आले. यात करमाड आणि शेंद्रा भागातील भुयारी मार्गाचा समावेश आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनहून मनमाडकडे जाताना रेल्वे गेट ५१ च्या पुढील रेल्वे क्रॉसिंगही बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आला.संग्रामनगर भुयारी मार्गाचा देखील प्रश्न मिटला.

रेल्वे वाहतुकीची गती वाढविण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कुंभेफळ आणि झाल्टा - सुंदरवाडी येथे भुयारी मार्ग तयार झाले. दरम्यान चिकलठाणा व शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम रखडले होते. यासंदर्भात टेंडरनामाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता दोन्ही भुयारी मार्गाची कामे सुरू झाली आहेत. चिकलठाणा रेल्वे हाॅल्ट स्टेशन जवळील जुना बीड बायपासवरील रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम चालू झाल्याने जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

Sambhajinagar
CM Eknath Shinde : राज्यात 'या' 17 ठिकाणी लवकरच सुरू होणार ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक

आता याच पार्श्वभूमीवर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर विमानतळाच्या भिंतीच्या बाजूला राजनगरकडे जाणाऱ्या बाळापूर तसेच उस्मानपुरा ते बीड बायपास ते एमआयटी ते सातारा या मार्गावर फुलेनगर व छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर रेल्वे उड्डाणपूलाखालील रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांना थांबावे लागते. अनेकदा अर्धा ते पाऊण तासापेक्षा अधिक काळ हा मार्ग बंद असतो. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कामाची गती वाढवावी

शिवाजीनगर भागात रेल्वे विभागाने भुयारी मार्ग उभारण्यासाठी तीस फुटांचा मोठा खड्डा तयार केला आहे. मात्र, येथे ड्रेनेजलाइन फुटल्याने कामाची गती मंदावली आहे. नाही म्हणायला रेल्वेने येथे बेड काॅंक्रिटचे काम केले आहे. सोबतच ड्रेनेजदुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र रेल्वे विभागामार्फत हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्यावर खड्याच्या शेजारीच पादचाऱ्यांना जाण्यासाठी चिंचोळी बोळ सोडण्यात आली आहे. दरम्यान पादचारी पत्र्यासमोर उभे राहून खड्याकडे पाहताना दिसतात दरम्यान येथे मोठ्या अपघाताची शक्यता बळावत आहे. कंत्राटदाराने सुरक्षेसाठी अर्धवट पत्रे ठोकले आहेत. मात्र खड्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षारक्षक तैनात करणे गरजेचे आहे. तसेच मंदावलेली कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com