Sambhajinagar : नगरनाका ते दौलताबाद टी पाॅईंटपर्यंतचा रस्ता होणार सुसाट; 200 कोटींचे टेंडरही निघाले

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नगरनाका - दौलताबाद टी पाॅइंट महामार्गाच्या चौपदरीकरणास तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकतेच टेंडर (Tender) काढण्यात आले आहे.

हा रस्ता चारपदरी सिमेंटचा करण्यात येणार असून दोन पदरी जोड रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टेंडरनामाशी बोलताना दिली. लवकरच रस्त्याचे भूसंपादन करून काम सुरू केले जाणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : बीड बायपास देवळाई चौक ते सोलापूर हायवे रस्ता बघा कुणामुळे रखडला?

जगप्रसिद्ध वेरूळ  लेणीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ही तीन राज्ये व मराठवाडा, विदर्भ व खान्देश या तीन प्रांतांना जोडणाऱ्या सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या नगरनाका ते दौलताबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासूनची मागणी सरकारने मान्य  केल्याने या भागाला न्याय मिळाला आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर व वेरूळ लेणी, पुढे दौलताबाद किल्ला, सुलीभंजन तसेच म्हैसमाळ व गवताळा अभयआरण्य तसेच चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेले कालीमातेचे मंदिर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्यातील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत आहे.

निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक मंदिर याच मार्गावर असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. 

Sambhajinagar
'SRA'तून मिळणाऱ्या घरांच्या विक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता घरविक्री...

नगरनाका ते दौलताबाद टी पाॅइंट अरुंद रस्त्यामुळे अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे होते. रस्त्याच्या कामासाठी काही दिवसांपूर्वीच टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. चारपदरी सिमेंट रस्ता व दोन पदरी डांबरी रस्त्याला शासनाकडून  मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता हा दहा किलोमीटरचा रस्ता सुसाट होणार आहे. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटणार आहे. 

आमदार शिरसाट यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला वेग येऊन त्यास मंजुरी देऊन टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नगरनाका ते दौलताबाद टी पाॅईंटपर्यंत २४ मीटर सिमेंट रस्ता व दोन्ही बाजुंना दोन मीटरचा डांबरी रस्ता व मध्यभागी दोन मीटरचा दुभाजक व त्यावर सुशोभीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासह भूसंपादन व रस्त्यातील विद्युत खांब व डीपी हटविने आदी कामांसाठी तब्बल दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com