Sambhajinagar: अखेर तो दिवस आला; पीटलाईनच्या कामाला सुरवात

Pitline Sambhajinagar
Pitline SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) : अखेर छत्रपती संभाजीनगरच्या पीटलाइनचे काम गत आठवड्याभरापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ट्रॅक आणि प्लॅटफाॅर्म व तांत्रिक शेडसाठी रुंदीकरणाला अडथळा ठरणारी येथील मोठी लिंबाची ३० झाडे तोडण्यात येत आहेत. तसेच भूमिगत ड्रेनेज आणि पाइपलाइन, तसेच केबल शिफ्टींगचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. पीटलाइनसाठी २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले.

Pitline Sambhajinagar
Good News! वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सुटण्याची वेळ बदलली?

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू इंद्रजित थोरात यांच्या निर्मिती कंस्ट्रक्शन कंपनीला या प्रकल्पाचे काम मिळाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर पीटलाइन १६ बोगींऐवजी २४ बोगींसाठी करावी, अशी मागणी पुढे आली होती. मात्र १८ बोगींसाठी पीटलाइनचे काम होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तब्बल २० ते २५ वर्षानंतर प्रस्तावित पीटलाइनचे काम होत असल्याने मराठवाड्यात नव्या रेल्वेगाड्यांसाठीच ती उपयुक्त असणार आहे. पीटलाइनचे काम मुदतीत मार्गी लागावे, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे बारकाईने लक्ष असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशनवर १६ बोगींची पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २४ बोगींच्या पीटलाइनची मागणी पुढे आली. यावर १६ बोगींची पीटलाइनचा तोडगा काढण्यात आला व गत आठवड्यापासून निर्मिती कंस्ट्रक्शनमार्फत काम देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र टेंडरनामा प्रतिनिधीने सदर कामाचा स्पाॅटपंचनामा करत असताना पीटलाइनला अडथळा ठरणारा रेल्वे स्टेशनवरील मालधक्का अद्याप स्थलांतरित केला नसल्याने काम पुढे कसे करणार, असा प्रश्न विचारल्यानंतर करमाड , दौलताबाद, येथे त्यासाठी जागेचे सर्वेक्षण सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pitline Sambhajinagar
Nashik DPC : निधी पुनर्नियोजनात आमदारांपेक्षा ठेकेदारांवर कृपा?

यात जालन्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दिनागाव येथे ज्या प्रमाणे नुकताच मालधक्का करण्यात आला, त्याचप्रमाणे येथील मालधक्का स्थलांतरीत करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र मालधक्का लवकरात लवकर हटवला तरच पीटलाइनसाठी जागा होऊ शकते. त्यातून नव्या सुविधा देता येतील. मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, या संदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भूमीपूजनाच्या दिवशी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली होती. मात्र अद्याप मालधक्का स्थलांतरीत न केल्याने पीटलाइनच्या कामात मोठा अडथळा येऊ शकतो, अशी तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

२ जानेवारी २०२२ रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करताच छत्रपती संभाजीनगरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. दानवेंच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाण्याची पीटलाइन जालन्याला पळवल्याचा आरोप केल्याने छत्रपती संभाजीनगरातही पीटलाईन करण्याची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली होती.

Pitline Sambhajinagar
Nashik : 700 कोटींच्या बिलांसाठी 46 कोटींचा निधी; ठेकेदार संतप्त

अखेर दानवेंनी १७ मे २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगरात चिकलठाण्याऐवजी मुख्य रेल्वेस्थानकावरच १६ बोगींच्या पीटलाईनसाठीही २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु त्यापुढे चार महिन्याचा काळ लोटला असताना प्रत्यक्षात पीटलाइन उभारणीला गती मिळत नसल्याची ओरड झाली. अखेर २ ऑक्टोबर २०२२ पीटलाइनचे भूमीपूजनही केले होते.

छत्रपती संभाजीनगरातील ही प्रस्तावित पीटलाइन ४३० मीटर लांबीची आहे. यात दोन ट्रॅक आहेत. पहिल्या ट्रॅकवर रेल्वेची स्वच्छता व दुरूस्ती केल्यानंतर रेस्टसाठी शेजारीच दुसरा ट्रॅक केला जाणार आहे. पीटलाइनचे काम सुरू झाल्याने आता नव्या रेल्वे गाड्यांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे. लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची यामुळे दुरुस्ती आणि स्वच्छता होईल. तसेच शेंद्रा, बिडकीन, वाळूज, चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतीसाठी ती फायदेशीर ठरणार आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मराठवाड्यात नांदेड, पूर्णा येथेच पीटलाइनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरपासून पूर्णा पीटलाइनचे अंतर २०७ किलोमीटर आणि नांदेडचे अंतर २३७ किलोमीटर असल्याने एक्स्प्रेस गाड्यांची देखभाल दुरूस्ती व स्वच्छतेसाठी लांबचे अंतर गाठावे लागत असल्याने रेल्वेला मोठे खर्चिक नुकसान होत असे. शिवाय वेळही खूप जात असे. आता छत्रपती संभाजीनगरसह जालना येथील नव्या पीटलाइनचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो.

Pitline Sambhajinagar
1 April पासूनचे 'हे' बदल निट समजून घ्या, एप्रिल फूल बनू नका!

छत्रपती संभाजीनगर हे शहर मराठवाड्याची राजधानी असून दक्षिण आणि उत्तर तसेच पश्चिमेकडील सर्व महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडलेले आहे. मात्र, येथील स्थानकात पीटलाइनची सुविधा नव्हती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची येथे दुरुस्ती किंवा स्वच्छतेसाठी मोठी अडचण होत होती. परिणामी त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव रखडले होते. यासंदर्भात मराठवाडा रेल्वे विकास समिती तसेच रेल्वे प्रवासी सेनेची पीटलाइनसाठी जुनीच मागणी केली होती.आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने हावडा, बेगळूर, चेन्नईसह अन्य ठिकाणी रेल्वे सेवा सुरू होऊ शकते.

अशी होणार पीटलाइन

अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या पीटलाइनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबल्यानंतर रेल्वे तंत्रज्ञ ट्रॅकखाली जाऊन इंजिन तसेच डब्यांची पाहणी करू शकतील अशी व्यवस्था होणार आहे. काही बिघाड असेल तर त्याची दुरुस्ती करणे सहज शक्य होणार आहे. शिवाय पीटलाइनवर डबे धुणे तसेच स्वच्छतेची खास यंत्रणा उभारली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com