Sambhajinagar : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील 'या' रस्त्यावर डांबरीकरण कधी करणार?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ ते हिरापुर ते वरूड फाटा या चार किलोमीटर १०० मीटरच्या डांबरी रस्त्याच्या कामात लोकप्रतिनिधी, अभियंते आणि कंत्राटदाराचा डांबरटपणा उघड झाला आहे. अतिशय दर्जाहीन झालेल्या या रस्त्याचे काम होऊन दोन वर्षाचा काळ लोटला. टेंडरमध्ये डांबरीकरणाचा उल्लेख असताना अद्याप डांबरीकरण केलेले नाही. "टेंडरनामा"ने या रस्त्याची पोलखोल करताच फुलंब्री मतदार संघाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेकडो गावकऱ्यांसह आंदोलनाचे हत्यार उपसले अन् कंत्राटदाराला हे काम करण्यास भाग पाडले. मात्र रस्त्याचे अर्धवट काम सोडून यंत्रणा पसार करणाऱ्या कंत्राटदाराला सवाल करण्यास बागडे यांना कधी वेळ मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
'मोदींना, मुंबई विकायची आहे'; 'या' नेत्याच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गोंधळ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली प्रमुख जिल्हा मार्ग-१८ ते हिरापुर ते वरूड फाटा या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. सुमारे ३० वर्षांनंतर खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या कामास ग्रामस्थांच्या मोठ्या पाठपुराव्यानंतर २०१९ - २० महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थाने एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसहाय्याने या रस्त्यासाठी पॅकेज क्र. ADE AUR. - १३ नुसार दोन कोटी १२ लाख रुपये मंजुर केले होते. सदर रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा पाच वर्ष कालावधीनुसार १४ लाख रूपये सुरक्षित अनामत रक्कम कंत्राटदाराकडून स्विकारण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला १९ जुन २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्याला १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्णत्वाची तारीख देण्यात आली होती. नगरच्या किरण पागोरे यांच्या मे. मनिषा इंन्फ्राकाॅम प्रा.लि. या कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र या कंत्राटदाराने थातुरमातुर काम करून रस्त्यावर खडीकरण करून डांबराचा अल्प वापर करुन अर्धवट काम सोडून यंत्रणा पसार केली.

Sambhajinagar
Sambhajinagar : राष्ट्रीय महामार्ग की ‘कचरा’मार्ग? 'या' ठिकाणी साठणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा

त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्याने हे काम थांबवले. त्यात दोन पावसाळ्यात आणि अवकाळी पावसाळ्यात अर्धवट तयार केलेला हा रस्ता ठिकठिकाणी उखडला जाऊन खड्डे पडले. गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या या रस्त्याच्या कामाची "टेंडरनामा"ने पोलखोल करताच फुलंब्री मतदार संघाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेकडो गावकर्यांसह आंदोलनाचे हत्यार उपसले होते.‌त्यानंतर‌ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार्यांची गाळण उडाली होती. त्यांनी कंत्राटदारामार्फत काम पुन्हा सुरू केले होते. मात्र कंत्राटदाराने होत असलेल्या रस्त्यावर दर्जाहिन डांबराचा नावालाच वापर करुन जाड खडीचा थर देत अंगठफोड रस्ता तयार करून ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळून गत दोन वर्षांपासून पोबारा केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीकडे तक्रारी केल्यानंतर प्रतिनिधीने सलग दोन दिवस या संपूर्ण रस्त्याचा लेखाजोखा काढला असता हा भ्रष्टाचाराचा रस्ता असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थ, कामगार व नौकरदारवर्ग, रूग्ण, रस्त्यालगतचे शेतकरी यांचा या रस्त्यावरून प्रवास जीवघेणा ठरला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले नाही. निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल गावकरी करताना दिसत आहेत. दरम्यान प्रतिनिधीने या रस्त्याचा लेखाजोगा काढला असता अंदाजपत्रकानुसार व  मानकानुसार  रस्त्याचे काम झालेले दिसत नाही. दुसरीकडे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Sambhajinagar
Mumbai : मराठी भाषा भवनचा सरकारला विसर पडलाय का? 260 कोटींची तरतूद धूळखात

असा आहे लेखाजोखा

या रस्त्याची लांबी ४ किलोमीटर १०० मीटर इतकी असून डांबरी रस्ता ३ किलोमीटर ९५० मीटर आहे. तर हिरापूर वाडी दरम्यान १५० मीटर लांबीचा काँक्रिट रस्ता आहे. दरम्यान संपुर्ण रस्त्याच्या लांबीत ७ मोरी बांधकाम आहेत. रस्त्याचे कटदाळ ३ ते ३.५ मीटर असून बाजूचे पंखे ६ मीटर आहेत. १.१.५ चे काही ठिकाणी शोल्डर आहेत. रस्ता बांधकामात २० मी.मी.जाड कारपेट सिलकोटसह ५० मी.मी.एमपीएम खडीचा थर, ७५ मी.मी.जाडग्रेड पाउणा खडीचा थर त्यानंतर डब्लुबीएम खडीचा थर.त्यात ७५ एम.एम.जाडग्रेड खडीचा थर व मातीकाम भराव ३.३० मीटर व साईड गटारचा उल्लेख आहे.प्रतिनिधीने रस्त्याचा नमुना व काटछेड नकाशा मिळवला असता त्यात भरावासाठी मातीकाम २९४५ घन मीटर १८९ ट्रक्स असा उल्लेख आहे. रस्त्यावर मातीकामाचा भराव झाल्यानंतर पाणी मारून रोलरने दबाई करणे आवश्यक असताना याकडे कानाडोळा केला आहे. जीएसबी आकारमानाचा खडीचा थर १४१.३ घन मीटर ९ ट्रक्स ओतून त्यावर पाणी मारून रोलरने दबाई करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डब्लु बी.एम.खडीकरण सेकंड ग्रेड आकारमानाचा खडीचा थर ९६८.९९ घनमीटरचे ६२ ट्रक दबाईसह खडी ७७५ घनमीटर ( ५ ट्रक) मुरुम १९४ घनमीटर १२ ट्रक शेड्युल बी मध्ये असा उल्लेख असताना इतक्या प्रमाणात काम झाले नसल्याचे दिसून येत नाही. डब्ल्यूबीएम खडीकरण करून पाणी मारून त्यावर खडीचा थर कमी प्रमाणात टाकल्याचे दिसून येत आहे.

एमपीएम ५० मी.मी.जाडीचा थर १२७८७ .५० चौरस मीटर डांबर २२.३८ मेट्रीक टन या प्रमाणात काम झालेले दिसत नाही.

पूर्व मिश्रित कारपेट २० मी.मी.जाडीचा थर १२७८७ .५० चौरस मीटर डांबर १८.६७ हे काम झालेले नाही.

सिलकोटचा १२७८७.५० चौरस मीटर डांबर १२.५३ मेट्रीक टन हे काम झालेले दिसत नाही

टॅककोटचा थर १२७८७.५० चौरस मीटर डांबर ३.२० मेट्रीक टन याकामाला बगल देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com