Sambhajinagar : कार्यकारी अभियंत्यांकडून कानउघडणी होताच खड्डे भरण्याची लगीनघाई

road
roadTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : खड्डे बुजवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, कोट्यावधींचा खर्च तरीही छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जालना आणि जळगाव रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत कसे? यासाठी यासर्वच मार्गावरील खड्ड्यांचा शोध घेत राहुल इंगळे या सामाजिक व राजकीय चळवळीत अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्यांना सचित्र खरमरीत पत्र लिहिले. ही बाब कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या कानापर्यंत पोहोचली. त्यांनी तातडीने दखल घेत या सर्व मार्गावरील खड्डे बुजवण्यात दिरंगाई नको, उकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून संबंधित कंत्राटदाराकडून खड्डे भरून घ्या, अन्यथा कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करणार, असा इशाराच येरेकर यांनी उपविभागीय अभियंत्यांना दिला आहे.

road
Aditya Thackeray : पैसे देऊनही औषधांचा पुरवठा का नाही झाला? 700 कोटी गेले कुठे?

अखेर युद्धपातळीवर खड्ड्यांची बुजवाबुजवी

यानंतर सुतासारख्या सरळ झालेल्या अभियंत्यांनी जालना व जळगाव या दोन्ही मार्गावरील  खड्ड्यांचा शोध घेत युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची अंमलबजावणी सुरू केली. दरम्यान सदर रस्त्यांवर महापालिका आणि महावितरण कंपनीच्या खोदकामामुळे खड्डे पडल्याचे समोर येताच येरेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने महापालिका व महावितरण प्रशासनाला पत्र लिहिल्याचे समोर आले आहे.

road
Thane : झेडपीच्या प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच टेंडर; 73 कोटींचे बजेट

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी छत्रपती संभाजीनगरात वरुणराजाने आपली फारसी कृपादृष्टी दाखवली नाही. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याचे फारसे कारण नाही. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच जालना व जळगाव रस्त्यांचे जी-२० व यानंतर अडीच महिन्यांपूर्वी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त डागडूजी करण्यात आली होती. यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र याच मार्गांवर महापालिका आणि महावितरणच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगातून १५ कोटीच्या निधीतून रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब तसेच रोहीत्र व वीजतारा हस्तांतर करण्यात आल्या दरम्यान सदर ठेकेदाराला टेंडरमध्ये रस्ता दुरूस्तीची तरतूद असताना त्याने दुरूस्ती केली नाही. दुसरीकडे रस्त्यांची कामे झाल्यावर महापालिकेने विद्युत रोषणाई व वाहतूक तसेच सौदर्यबेटसाठी केबल टाकताना रस्ते उकरले. याशिवाय या दोन्ही मार्गावर महापालिकेची जलवाहिनी असल्याने लिकेज दुरूस्तीसाठी वारंवार खड्डे केले जातात. मात्र या पालिका व महावितरण निर्मित खड्ड्यांचे खापर सार्वजनिक बांधकाम विभागावर नेहमीच फोडले जाते. 

road
Mumbai : 90 एकरवरील वांद्रे शासकीय वसाहत पुनर्विकासाचे घोडे; 169 इमारती धोकादायक

महापालिका व महावितरण तसेच बीएसएनएल व काही खाजगी केबल नेटवर्क कंपन्यांमुळे या रस्त्यांची खड्ड्यांमुळे नेहमीच चाळण केली जाते. यासंदर्भात सिडकोतील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ता राहुल इंगळे यांनी या दोन्ही मार्गावर खड्डे पडल्याची तक्रारी दाखल केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी तातडीने दखल घेत यातील बहुतांशी खड्डे भरण्यात आले एवढेच नव्हेतर खड्डे दुरुस्तीचे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. यामध्ये निकृष्ट काम केल्यास रोख दंड, काळ्या यादीत टाकणे आणि पीडब्लुडीच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड दम येरेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com