औरंगाबाद शहराच्या पार्किंग पॉलिसीबद्दल तुमचे मत काय? उद्यापर्यंत..

Parking Policy
Parking PolicyTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या प्रयत्नांतून शहराची पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीबद्दल अभिप्राय आणि सूचना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीने नागरिकांना 20 जुलै 2022 पर्यंत मुभा दिली आहे. या कालावधीत नागरिक त्यांचे अभिप्राय hq@aurangabadsmartcity.in या ईमेल वर नोंदविता येणार आहेत. (Aurangabad Smart City Parking Policy)

Parking Policy
शिंदे मंत्री असताना नाही झाले, पण फडणवीस येताच निघाला मुहूर्त!

शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी काम करत आहेत. मुंबई महानरपालिकेचे पार्किंग सल्लागार मुंबई एनव्हायर्मेंटल सोशल नेटवर्क यांच्या मदतीने ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे. शहरातील वाहनांचा वापर, वाहन संख्या, शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे. ही पॉलिसी तयार करण्यासाठी शहरातील पार्किंगची परिस्थिती अभ्यासण्यात आली आहे. यासाठी मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांचा नेतृत्वाखाली टीम काम करत आहे. मुंबईतले वाहतूक तज्ञ तृप्ती अमृतवार आणि अशोक दातार हे काम करत आहेत. स्थानिक अर्बन रिसर्च फाउंडेशन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड पॉलिसी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा शहराची पार्किंग पॉलिसी तयार करण्यासाठी काम करत आहे.

Parking Policy
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मिनी विधानसभेच्या कामकाजाला खीळ;कारण

पॉलिसीमध्ये रस्त्यावरील पार्किंगवर (ऑन स्ट्रीट) विशेष भर देण्यात आला आहे. ऑन स्ट्रीट पार्किंग, ऑफ स्ट्रीट पार्किंग आणि मल्टीलेव्हल पार्किंग यांचा समावेश या पॉलिसी मध्ये करण्यात आला आहे. ऑन स्ट्रीट पार्किंग शहरात राबविण्यात आली तरच ऑफ स्ट्रीट पार्किंग आणि मल्टीलेव्हल पार्किंग यशस्वी होईल. या पॉलिसीमध्ये पार्किंग ऑपरेटर, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामे, पॉलिसी राबविण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे, त्याची कामे आणि जबाबदाऱ्या, नागरिकांचा सहभाग कसा वाढवता येईल, व्यवसायिक जागेवर पार्किंग पास, फुटपाथ, सायकलस्वारांसाठी असणाऱ्या सुविधा, पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी एरिया डिझाइन, नो पार्किंग आणि फ्री पार्किंग साठी गाईडलाईन्स, पार्किंग फीस, कालावधी, वेळ आणि दिवस इत्यादी गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या पार्किंग पॉलिसीमध्ये येत्या 20 वर्षांच्या अंदाजाचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पॉलिसीमध्ये शॉर्ट टर्म पार्किंग आणि लाँग टर्म पार्किंग या दोन गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. लाँग टर्म पार्किंग परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Parking Policy
औरंगाबाद-पैठण मार्गाचा डीपीआरच तयार नाही; खर्च आला 500 कोटींवर

ही पॉलिसी राबविण्यासाठी 6 पायलट जागा मनपातर्फे निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये निराला बाजार, उस्मानपुरा, कॅनॉट परिसर, अदालत रोड, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर या जागांचा समावेश आहे. पहिल्यांदा या जागांवर पॉलिसी बद्दल जागृती करण्यासाठी एक महिना फ्री पार्किंग सुविधा देण्यात येईल. दुसऱ्या महिन्यात पार्किंगसाठी फाईन लावण्याचे काम सुरू होईल. तिसऱ्या महिन्यात दंड घेणे सुरू करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांनी दिली.

शहरातील पार्किंग व्यवस्था व्यवस्थित असावी, नागरिकांना पार्किंगची शिस्त लागावी, पायी चालणे आणि सायकल चालवणे यांना प्रोत्साहन मिळावे, सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी ही पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आली आहे. शहराची पार्किंग पॉलिसी अधिक पारदर्शक करण्यासाठी नागरिकांनी आपले अभिप्राय आणि सूचना द्याव्यात, असे आवाहन औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com