उस्मानाबाद (Osmanabad) : राज्य सरकारकडून आणि नगरपरिषदेच्या सर्वसाधारण निधीसह दलित वस्तीसुधार योजनेसह नाविन्यपूर्ण योजनेतील मंजूर निधीतून उस्मानाबाद नगर परिषद क्षेत्रांत दिड कोटींची विकासकामे सुरू करण्यात येणार आहे. या विकासकामांमध्ये एकूण दहा कामे नमूद केली आहेत. याकामासाठी अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडून वार्षिक करार पद्धतीने कामे करण्यासाठी मंगळवारी ५ एप्रिलला टेंडर देखील मागविण्यात आल्या आहेत.
यात श्री छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भोवती विद्युत रोषणाई करणे व गरजेनुसार इतर ठिकाणी विद्युत रोषणाई करणे व हायमास्ट लॅम्प व हॅलोजन लॅम्प भाड्याने लावने , नगर परिषद अंतर्गत येणार्या ठिकाणाचे गरजेनुसार पी.व्ही.सी. केसींग कॅपींग पट्टी लाईट फिटींग करणे, जनरेटर व ए.सी. दुरूस्ती व सर्विसींग तसेच विद्युतीकरणाची कामे करणे, शहर हद्दीत गरजेनुसार नवीन स्ट्रीट लाईट पोल उभे करणे , स्ट्रीट लाईट तार ओढणे, अस्तित्वातील पोल व तारा शिफ्ट करणे, नवीन समरसिबल पंप व त्यास लागणारे पूरक साहित्य पुरवठा करणे, स्ट्रीट लाईट पोलवर साहित्याची दुरूस्ती करून पोल वल चढ उतार करून चालू करून देणे व शहरातील पथदिवे चालू बंद करणे याशिवाय मनुष्यबळ पुरवठा व इतर कामे, शहरातील मुख्य चौकामधील एकूण पाच ठिकाणावरील सिंग्नलची वार्षिक देखभाल व दुरूस्ती स्वतःचे साहित्य वापरून करणे, हेडवर्क्स येथील उपळा बुस्टर , पंप हाऊस, रूईभर फिल्टर - पंप हाऊस , हातलादेवी पंप , उजणी पंप इत्यादी ठिकाणचे ४० ते ४०० एच.पी. मोटर रिवायडिंग व अनुषंगिक कामे करणे, पाणी पुरवठा योजना व शहरातील इतर ठिकाणचे नगर परिषदेचे ट्रान्सफार्मर व त्यावरील लाईन दुरूस्ती करणे , विविध इंधन विहिरींमध्ये अडकलेले बोअर स्पेशल कटर मशीनद्वारे काढणे आदी कामांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांच्या इशाऱ्यावर प्रशासकाने खेळलेली ही खेळी आता यशस्वी ठरणार का हे येत्या निवडणूकीतूनच समजणार आहे.
उस्मानाबाद नगरपरिषद क्षेत्रात दीड कोटींचे विद्युतीकरणाची विविध विकासकामांसाठी माजी नगर परिषद अध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असताना २२ डिसेंबर २०२१ रोजीच या कामांना मंजुरी दिली होती. मग ही विद्युतीकरणाची कामे हिवाळ्यात का सुरू का करण्यात आली नाहीत ? ऐन उन्हाळा पावसाळ्याच्या तोंडावरच का ? त्यासाठी राज्य सरकार व स्वतःचा निधी पडून असताना ऐन गरमीत या विद्युतीकरणांच्या विकासकामांच्या निविदा ५ एप्रिलला काढून ऐन उन्हाळ्यात कंत्राटरारांना चटका लावण्यासाठी केली जाणार आहेत का ? असाही सवाल उपस्थित होत आहे.