अरे बापरे! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मग्रारोहयोंतर्गत 206 कोटी 93 लाखांची कामे

Mnerga
MnergaTendernam
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह गंगापुर, खुलताबाद, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापुर आदी नऊ तालुक्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात मग्रारोहयो अंतर्गत वेगवेगळ्या यंत्रणामार्फत सिंचन विहीर, घरकुल, मोहगणी लागवड, शेततळे, गायगोठा शेड, मातोश्री पाणंद रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते, फळबाग, नाला सरळीकरण, बकरी शेड, बांबु लागवड, रस्ते, रस्ता रूंदीकरण, गाळ काढणे, गॅबीयन बंधारे, सार्वजनिक विहिरी, स्मशानभुमी शेड, साठवन तलाव आदी कामे ग्रामपंचायतीमार्फत तसेच फळबाग, कृषी विभागामार्फत तर तुती लागवड रेशीम विभागामार्फत तसेच रोपवाटीका मोहगणी लागवड सामाजिक वनीकरणामार्फत तसेच साठवन तलाव, गॅबियन बंधारा जिल्हापरिषद सिंचन विभागामार्फत व पेव्हर ब्लॉक जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत.

Mnerga
Sambhajinagar : चिकलठाणा विमानतळ धावपट्टी विस्तार; माजी केंद्रीय मंत्र्यांनी तातडीने लावली आढावा बैठक 

मग्रारोहयो अंतर्गत वर्ष २०२४-२५ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १ लाख ४३ हजार ४४४ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. असून त्यामध्ये ७० लाख १० हजार मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. १५ हजार ९६८ कुटुंबांनी १०० दिवसांपेक्षा जास्त मनुष्य दिवस काम केल्याचा दावा मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी रामदास दौंड यांनी केला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात आज रोजी ८ हजार ३०९ कामे सुरू आहेत. त्यावर ८५ हजार मजुर काम करत आहेत. यात अनेक कामांचा समावेश आहे. याकामांसाठी आत्तापर्यंत वर्षभरात २०६ कोटी ९३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Mnerga
Sambhajinagar : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आढावा बैठकीत काय म्हणाले माजी मंत्री?

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १३ कोटी ३१ लाख, गंगापूर तालुक्यात २८ कोटी ३८ लाख,कन्नड तालुक्यात २५ कोटी ३६ लाख, खुलताबाद तालुक्यात ५ कोटी ६५ लाख, पैठण तालुक्यात २९ कोटी ३० लाख, फुलंब्री तालुक्यात २० कोटी ४३ लाख, सिल्लोड तालुक्यात ३६ कोटी ३६ लाख, सोयगाव तालुक्यात ६ कोटी ३ लाख, वैजापूर तालुक्यात ४१ कोटी ७ लाख १ एप्रिल २०२४ ते ८ जुलै २०२४ दरम्यान तब्बल २०६ कोटी ९३ लाखाची कामे झाल्याचे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी रामदास दौंड यांनी खास टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com