Sambhajinagar : 15 जुलैला सुरू होणार 'या' बहूचर्चित 265 कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गंगापूर-वैजापूर रस्त्याप्रमाणेच कायगाव-देवगाव रस्त्याचे देखील भाग्य उजळणार असून, जागतिक बँक प्रकल्पाच्या योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी सरकारने तब्बल साडेचारशे कोटींचा निधी मंजुर केला. त्यातुन १५ वर्षात व्याजेचा जो परतावा मिळणार त्या रकमेतील २६५ कोटीतून कायगाव - देवगाव हा संपूर्ण ४५ किलोमीटर लांबी आणि १० मीटर रूंदीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. दरम्यान गंगापूर, लासुर शहरात नदींवर आरसीसी पूलांचा देखील समावेश करण्यात आल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Mumbai Ahmedabad Bullet Train News : 'ते' 20 हजार हात दररोज घडवताहेत इतिहास!

कायगाव-गंगापूर, लासुर, देवगाव रंगारी हा रस्त्याच्या खाली संपूर्ण काळी माती आहे. त्यामुळे कितीही दर्जेदार काम केले तरी वर्दळीने रस्ते खराब होतात. यापुढे रस्ता खचू नये यासाठी या संपूर्ण लांबीत डांबरीकरण न करता सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बंब यांनी सांगितले. आता या रस्त्याचे कायगाव ते देवगाव रंगारीपर्यंत एक ते दिड फुट खोदकाम करण्यात येणार आहे. माती परिक्षण करुन संपूर्ण लांबीत अर्थ वर्क अबेटमेंट करण्यात येणार आहे. त्यावर उत्तम दर्जाचे खडी व मुरूम टाकुन मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर डीएलसी व पीक्युसीचा लेअर टाकण्यात येणार असल्याचे बंब यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी ५७ कोटीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र पुरेसा निधी नसल्याने अस्तित्वातील जुना रस्ता न खोदता माती परीक्षण न करता कंत्राटदाराने अस्तित्वातील जुन्या रस्त्यावरच खडी, डांबर टाकून रस्ता तयार केला होता. दरम्यान या रस्त्याचे काम चालू असतानाच खड्डे पडायला सुरूवात झाल्याने या भागातील नागरिकांनी टेंडरमध्ये नमूद केल्याप्रमाणे या रस्त्याच्या परिसरात कुठेही डांबर प्लांट कंत्राटदाराने उभारलेला नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीसिंग ठाकूर व संबंधित कंत्राटदार हे संगनमताने अतिशय कमी दर्जाचे साहित्य वापरून काम केल्याचा आरोप केला होता.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : Good News! अखेर शेंद्रा - वरूड रस्त्याचे भाग्य उजळले

केवळ जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचेही त्यांचे म्हणणे होते.या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत गंगापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी माजी मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे रस्त्याचे काम चालु असतानाच तक्रार दाखल केली होती. चव्हाण यांच्या आदेशाने बांधकाम विभागाचे दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून २० नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी करण्यात आली होती.‌ तसेच सार्वजनिक बांधकाम मुंबई येथील कार्यासन अधिकारी सु. दि. पास्टे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सा. बां. चे अधीक्षक अभियंता यांना या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. अहवालात काम निकृष्ट असल्याचे नमुद करण्यात आले. मात्र, पुढे कुठल्याही वरिष्ठ कार्यालयाने दोषींवर कारवाई केली नाही. धक्कादायक म्हणजे या मुख्य रस्त्याचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने हे काम स्वतः न करता दुसर्या कंपनीला दिले. दुसर्याने नफेखोरीच्या उद्देशाने तिसऱ्या कंपनीला काम दिले. त्या कंपनीने नफेखोरीपायी थातूरमातूर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला होता. पुढे कंत्राटदारांच्या देवाणघेवाणवरून एकमेकांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात १६ कोटी रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या रस्त्यावरील खाबुगिरीचा नुक्ताच गैरप्रकार समोर आला. यासंदर्भात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आदीत्य बिल्डर्सचे पवन मुगदिया यांनी तक्रार दाखल केली होती.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'त्या' स्मार्ट रस्त्यांमधील भेगा, खड्डयांची कंत्राटदाराकडून‌ लिपापोती

कायगाव -बोरगाव - देवगाव रंगारी - लासुर या ४५ किलोमीटर रस्त्याच्या कामासंदर्भात पुणे येथील रायसोनी व्हेंचर प्रा. लि. चे प्रकल्प व्यवस्थापक गिरीष नागनसुरे यांची मार्च २०१९ मध्ये गंगापूर येथे भेट झाली होती. हे काम प्रमूख कंत्राटदारामार्फत सब कंत्राट पध्दतीने देणार असल्याचे नागनसुरे यांनी सांगितले. त्यामुळे रायसोनी व्हेंचरचे संचालक सावन रायसोनी यांची भेट घेतली.‌सावन यांनी नाशिकच्या एटीआर इन्फ्राप्रोजेक्ट नाशिक तसेच पुण्याच्या रायसोनी व्हेंचर या दोन्ही कंपन्यांची आर्थिक क्षमता नसल्याने हे काम तुमच्या आदीत्य बिल्डर्सला फर्म मार्फत केल्यास रितसर‌ करार करून मुदतीत पैसे देऊ अशी गळ घातली. त्यानुसार आदित्य बिल्डर्सच्या संचालकांनी २७ मार्च २०१९ रोजी पुण्यात जाऊन रायसोनी व्हेचर्सच्या येथील कार्यालयात जाऊन चर्चा करून काम घेण्याचे ठरल्याप्रमाणे मे २०१९ मध्ये रस्त्याचे काम सुरू केले. सदर काम जुलै २०२२ मध्ये पूर्ण केले. परंतू रायसोनी यांनी करारात ठरल्याप्रमाणे ४४ कोटी देणे असताना केवळ ३२ कोटी दिले. १२ कोटी तसेच भाववाढीचे ४ कोटी असे १६ कोटी आजपर्यंत दिले नाहीत. वेळोवळी मागणी करूनही रायसोनी यांनी हातवर केले. यानंतर मुगदिया यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता सदर काम हे १५ टक्के कमिशनवर ४४ कोटीत रुपयांमध्ये दिल्याचे समोर आले. सदर रस्त्याची पार चाळणी झाली होती.‌ सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष कामास  सुरुवात केली परंतू बरेच दिवसानंतरही रस्त्याचे काम पुर्ण केले नव्हते व सदरील रस्त्याचे काम निकृष्ट  दर्जाचे होत असल्याने जागोजागी खड्डे पडले होते.‌त्यामुळे अपघातात वाढ होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही डोळे झाक केल्याने कंत्राटदाराला अभय मिळत आहे.

कायगाव टोका ,गंगापूर ,लासूर, देवगाव रंगारीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी प्रत्यक्ष कामास  सुरुवात केली परंतू बरेच दिवसानंतरही रस्त्याचे पुर्ण झाले नाही व सदरील रस्त्याचे काम निकृष्ट  दर्जाचे होत असल्याने जागोजागी खड्डे पडत आहे.त्यामुळे अपघातात वाढ होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळे झाक केल्याने ठेकेदाराला अभय मिळत आहे.कामाचा दर्जा सुधारुण निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी रा.काँ.पार्टीचे नेते तथा खादी ग्रामोद्योग महामंडळचे अध्यक्ष संतोष माने यांनी गुणनियत्रंण पथकाकडे केली आहे,यावेळी माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अहमद पटेल उपस्थित होते. या रस्त्यावरील सगळा सावळा गोंधळ पाहता रस्ता का खचला याचा संपूर्ण अभ्यास करून आमदार प्रशांत बंब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत यशस्वी पाठपूरावा केला होता. गत वर्षीच शासनामार्फत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे टेंडर निघाले होते. कायगाव ते देवगाव रंगारीपर्यंत रस्त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. यापूर्वी ४३२ कोटींच्या निधीतून वैजापूर, गंगापूरमार्गे करमाड असा दर्जेदार, प्रशस्त रस्ता तयार झाला आहे. त्या गुणवत्तेचाच हा रस्ता होणार असल्याचा दावा आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. तालुक्यातील गंगापूरसह, लासुर स्टेशन गावातून जाताना दोन्ही ठिकाणी पुलाचे देखील काम होणार आहे. विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणुकीसाठी जागतिक बँक पुढाकार घेत असतानाच शहरातील दोन प्रकल्पांसाठी अर्थसहाय्यासाठी जागतिक बँकेनेही रस दर्शवला आहे. जागतिक बँक प्रकल्पामार्फत प्रस्तावित रस्त्यात शहरातून पूल घेण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. संपूर्ण शहरातून पूल गेल्यास बाजारपेठेवर मोठा परिणाम होईल, असे नागरिक व व्यापार्यांचे मत आहे. शहरालगतच असलेला शंभर फूटी रिंगरोड विकसित करण्याची गरज असल्याचे शहरातील नागरिक व व्यापारी म्हणतात. यावर आमदार प्रशांत बंब काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.‌

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com