मराठवाड्यातील शेत रस्त्यांबाबत काय म्हणाले संदीपान भुमरे?

sandeepan bhumare
sandeepan bhumaretendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून पाणंद रस्त्यांची कामे केली जात आहेत. हे शेतरस्ते, पाणंद रस्ते शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे मार्ग ठरत आहेत. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि जून अखेर पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

sandeepan bhumare
गडकरींची मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे अंतर अवघ्या सव्वा तासात...

जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मराठवाडा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, विभागाच्या उपसचिव श्रीमती खोपडे यांच्यासह आठही जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी (रोहयो), तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उपअभियंत्यांची उपस्थिती होती.

sandeepan bhumare
गडकरी साहेब रस्त्याच्या कामांचा दर्जा तपासा; औरंगाबादकरांची मागणी

या वेळी भूमरे म्हणाले, मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळवून देण्यासाठी रोहयो अंतर्गत शेतरस्ते व मातोश्री पानंद रस्ते हे उपक्रम हाती घेतले आहेत. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला ठरवून दिलेल्या इष्टांकाप्रमाणे जूनअखेर पर्यंत कामे पूर्ण करावीत. शेतीमधून उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी व यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी शेतरस्ते व पाणंद रस्ते हे सहाय्यभूत आहे. ते वेळेत आणि गुणवत्ता ठेवून पूर्ण करावेत.

शेती अंतर्गत येणारे शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे व विहिरी यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची देखील रोहयोच्या माध्यमातून अंमलबजावणी करावी. यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. वेळेची उपलब्धता कमी असल्याने पावसाळ्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याचे निर्देश भुमरे यांनी दिले .

sandeepan bhumare
टेंडर सातारा मेडिकल कॉलेजचे अन् हवे गुजरात, चेन्नई, दिल्लीतील...

बैठकीत अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी रोजगार हमी योजनेच्या झालेल्या कामाचा आढावा तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या. यावर तांत्रिक मार्गदर्शनही केले. गुणवत्तापूर्ण आणि रोहयोची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मदत होण्यासाठी आलेल्या सूचना आणि संबंधित जिल्ह्यांच्या अडचणी ऐकून घेऊन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

विभागाच्या विविध कामांचे प्रमाण पाहता लोकांच्या येणाऱ्या तक्रारी दूर करून पारंपारिक पद्धती प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचे निर्देश नंदकुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. शेत रस्ते व मातोश्री पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतकरी, भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी लखपती होण्याचा हा मार्ग आहे, असे ते म्हणाले.

sandeepan bhumare
क्लस्टर डेव्हलपमेंट फंडसाठी 'सिडबी'चे राज्याला ६०० कोटी

आढावा बैठकीदरम्यान गेल्या वर्षीचे इष्टांक पूर्ण केलेल्या औरंगाबाद व परभणी जिल्ह्याचे रोहयो विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन भुमरे आणि नंदकुमार व उपस्थित मान्यवरांनी केले. त्याच प्रमाणे या वर्षी मंजूर झालेल्या कामास सुरुवात झालेल्यामध्ये गेवराईचे (जि. बीड) गट विकास अधिकारी सचिन सानप, तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका येथील गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांचे अभिनंदनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com