मंत्री गुलाबराव पाटील कडाडले...'उशीर झाल्यास याद राखा!'

Gulabrao Patil
Gulabrao PatilTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाला गती देऊन ते त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले. संबंधित ठेकेदारांनी प्रकल्पाचे काम कालबद्ध रीतीने पूर्ण करावे, अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले आहेत.

Gulabrao Patil
मुंबईतील डेब्रिज आणि नालेसफाईची डेडलाईन ठरली! 'तुंबई' टळणार?

मंत्रालयात औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संजय शिरसाट, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Gulabrao Patil
'या' जिल्ह्यासाठी 'गुड न्यूज'; विकासाची गाडी आता सुस्साट...

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६८० कोटींची योजना मंजूर आहे. औरंगाबाद शहरासाठी हा पाणीपुरवठा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी या प्रकल्पाचे काम वेगाने करून तो त्वरित पूर्ण करावा. योजनेच्या कामाला सुरवात झाली असली तरी पाइपलाइनचे काम गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

संबंधित यंत्रणांनी औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास आपल्या स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ते सुव्यवस्थितपणे वितरीत करावे. संबंधित ठेकेदारांनी प्रकल्पाचे काम कालबद्ध रीतीने पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले.

Gulabrao Patil
पोलिसांच्या निवासस्थानांबाबत अजित पवार यांची मोठी घोषणा

राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, औरंगाबाद शहरात नागरी सुविधांची अनेक दर्जेदार कामे झाली आहेत. शहरासाठी आवश्यक असणाऱ्या या पाणीपुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा देण्यात यावा.

शहरातील पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या निवृत्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचेही सहकार्य घेण्यात यावे. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com