'त्या' सव्वातीन कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप? उपवनसंरक्षक (प्रा) यांची चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ का?

Chhatrapati Sambhajinaga
Chhatrapati SambhajinagaTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : खुलताबाद तालुक्यात कुठलेही अंदाजपत्रक न करता विनाटेंडर मर्जीतल्या कंत्राटदारांशी हातमिळवणी करत सव्वातीन कोटींची ८२ कामे कागदावर दाखवत कोट्यवधींची बोगस बिले काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात सदर कामाचे अंदाजपत्रक, टेंडर कधी निघाले, कोणत्या कंत्राटदाराने कामे केली, त्याची वर्क ऑर्डर देण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करत असल्याचा आरोपही तक्रारदाराकडून केला जात आहे.

या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने देखील संबंधित विभागाला सविस्तर चौकशी अहवाल पाठवा असे बजावले. मात्र स्मरणपत्रांचा मारा करूनही जबाबदार अधिकारी अहवाल देण्यास टाळाटाळ करत आहेत.

Chhatrapati Sambhajinaga
Nashik : सर्वाधिक मागास सुरगाण्याला केवळ 76 लाख; तर मंत्री दादा भुसेंच्या मालेगावला सव्वातीन कोटींची कामे

छत्रपती संभाजीनगर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने वनविभागाकडे उपवनसंरक्षक (प्रा) यांच्या भ्रष्ट कारभाराच्या तक्रारींवर अहवाल देण्यास उपवनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाकडून अहवाल देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयाने दुसरे स्मरणपत्र देऊन अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने नायब तहसिलदारांनी पाठवलेल्या पत्राला देखील उपवनसंरक्षक कार्यालयाने केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. जर या प्रकरणात उपवनसंरक्षक यांनी मंजूर निधीप्रमाणे सर्व कामे केली असल्याचा त्यांचा दावा आहे, मग वरिष्ठांना अहवाल का सादर केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यासंदर्भात वनविभागाकडे प्रश्न उपस्थित करताच त्यांनी जल व मृद संधारण विभागांतर्गत ही कामे होती, विविध मजूर संस्थांकडून ही कामे करण्यात आली आहेत, कामे जागेवर झाली आहेत, असा दावा केला आहे.

Chhatrapati Sambhajinaga
Nashik : नाशिकरांसाठी गुड न्यूज! रविवारपासून Indigo ची देशातील 'या' 11 शहरांसाठी विमानसेवा

भिम - शक्ती असंघटीत रोजंदारी कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष रणजित मनोरे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत ३ कोटी ३० लाख ७१ हजार ९९८ रुपये मंजूर निधीतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वनपरिक्षेत्र व निसर्ग संरक्षण या योजनेंतर्गत कुठलेही अंदाजपत्रक तयार न करता विनाटेंडर मर्जीतल्या कंत्राटदारांशी हात मिळवनी करत  ८२ कामे कागदावर दाखवून निधी लाटल्याची तक्रार केली आहे. मनोरे यांनी महसूल व वन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयाला ४ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदन पाठवून खुलताबाद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व उपवनसंरक्षक यांच्या कारभारातील त्रुटी व गैरव्यवहार मांडले होते. या निवेदनात नमूद ८२ कामांची चौकशीची मागणी केली होती. 

Chhatrapati Sambhajinaga
Nashik : जलयुक्त शिवारच्या 'या' कामांवर नाशिक जिल्हा परिषदेने का मारली फुली?

वनसंरक्षक (प्रादेशिक) विभागाने संबंधित निवेदन उपवनसंरक्षकांना (प्रादेशिक) पाठवून त्यातील मुद्यांनुसार वस्तुस्थितीचा अहवाल पाठवण्यास सांगितले होते. १३ सप्टेंबरला व त्यानंतर १७ ऑक्टोबरला स्मरणपत्रे पाठवून अहवालाची विचारणा केली होती. पण असा अहवालच उपवनसंरक्षक कार्यालयाने वनसंरक्षक कार्यालयाकडे पाठविलेला नाही.

या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने सामान्य प्रशासन विभागाच्या नायब तहसिलदारांनी देखील २५ सप्टेंबर रोजी पत्र दिले आहे. त्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे अखेर तक्रारदार मनोरे यांनी वन विभागाच्या मुख्यालयासमोरच तंबू ठोकत उपोषण सुरू केले. वरिष्ठ कार्यालयाने दुसरे स्मरणपत्र उप वनसंरक्षक कार्यालयाला दिले आहे. मात्र वन विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या दृष्टीने ही नामुष्कीची बाब ठरली आहे. वनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी उपवनसंरक्षक यांच्या नावाने हे दुसरे स्मरणपत्र पाठवले आहे.

मनोरे यांनी उपस्थित केलेल्या ८२ कामातील मुद्यांची माहिती उप वनसंरक्षक कार्यालयाने पाठवली नसल्याने संबंधित कामातील प्रत्येक मुद्यांबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने वनसंरक्षक कार्यालयाला सादर करण्याचे वनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com