Sambhajinagar : कोट्यवधींचा खर्च करूनही 'तो' येतो अन् 'ती' जाते

महावितरणची खाबुगिरी कारभार पहिल्याच पावसाने केली उघड
Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पहिल्या पावसाच्या सरी कोसळताच संभाजीनगरकरांना सालाबादप्रमाणे लाईट गुल होण्याची चिंता कायम असते. टपरीवाल्यापासून तर छोट्यामोठ्या उद्योजकांपासून दुकानदारांचा जीव भांड्यात पडतो. पावसाचे वातावरण तयार होताच, वारा येताच लाईट हमखास जाते. त्यामुळे गृहिनींना घरातली कामे आणि मुलांचा अभ्यासात व्यत्यय येतो. लाईट गेल्यावर इंटरनेट गुल होताच वर्क फ्राॅम होम करणाऱ्यांची पंचाईत होते. जरा आभाळ भरुन आलं की छत्रपती संभाजीनगरकरांचे डोळे लाईटकडे फिरतात आणि होतेही तसेच वारं सुटल्यावर लाईट हमखास जाते. परिणामी अंधारात मेणबत्ती शोधण्याची वेळ येते. सालाबादप्रमाणे पावसाळ्यात लाईट जाऊ नये म्हणून महावितरणने मॉन्सूनपूर्व नियोजित तयारी म्हणून वीजसंचाची देखभाल दुरूस्तीसाठी कोट्यावधीचे टेंडर काढते, पण याचा काहीच उपयोग होत नाही.

Sambhajinagar
ठाणे क्लस्टरअंतर्गत 'BMC'सह खासगी भूखंडाबाबत शिंदेंची मोठी घोषणा

चालु वर्षी महावितरण कंपनीच्या शहर क्रमांक-१ व २ साठी तब्बल तीन कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. टेंडर काढले, नेहमीप्रमाणे मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देण्यात आली. ज्यावर लो-टेंशन आणि हायटेंशन वीजतारा टेकलेल्या असतात ते चिनी मातीचे इन्सुलेटर. डीस्क इन्सूलेटर आणि डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर बदलण्याचा दावा केला गेला. पावसाळ्यात अंडरग्राऊंड  विद्युतवाहिन्यांमध्ये पाणी शिरू नये आणि बिघाड होऊ नये म्हणून कुठलेही जाहीर प्रगटन न काढता दुरूस्तीच्या नावाखाली वीजग्राहकांना ऐन उन्हाळ्यात घामाघूम केले. पावसात विद्युत पुरवठा यंत्रणेचं नुकसान होऊ नये, यासाठी झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून यंत्रणेवर किंवा वाहिन्यांवर पडू नये म्हणून झाडांच्या फांद्या काही प्रमाणात तोडण्यात आल्या, एवढं करूनही पाऊस येताच वीजगुल होते. याऊलट तोडलेल्या फांद्या उचलण्याची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदारांनी रस्त्यातच पसारा पांगवून ठेवला, यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी शहरात पावलापावलावर मधोमध जलवाहिनी, ड्रेनेज आणि उखडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांसह फांद्याची भर पडल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भरपडून अपघाताचे सावट पसरलेले आहे.

Sambhajinagar
Mumbai Metro : मेट्रोच्या मास्टर प्लॅनिंगमागील वाघ!

पावसाचं पाणी फिडर पिलर, रिंगमेन युनिट अशा यंत्रणेत शिरू नये व लाईट जाऊ नये म्हणून दुरूस्तीचा व डीपींची तावदाने बदलण्याचा दावा केला गेला, मात्र पहिल्याच पावसाने महावितरणचा दुरूस्तीचा दावा फोल गेला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मॉन्सूनपूर्व कोट्यावधीची कामे ही नागरिकांची गैरसोय आणि अधिकारी-ठेकेदारांच्या सोयीसाठी केली गेली का, हा खरा संशोधनाचा विषय आहे. या संदर्भात प्रतिनिधीने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या तोडल्या, खराब इन्सुलेटर तपासून बदलले, तारांचे झोल सोडले अशी दुरुस्तीची अनेक कामे केल्याचा दावा कंपनी करत आहे. तरीही हलकाश्या पावसाने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने महावितरणच्या केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com