Sambhajinagar : निधी अभावी रखडले सामाजिक सभागृहाचे बांधकाम; सरकारला गावकऱ्यांचा मदतीचा हात

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील चिकलठाणा येथील एका धार्मिक स्थळालगत कंत्राटदारामार्फत सामाजिक सभागृहासाठी काॅलम उभे करून स्लॅब टाकण्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे, मात्र इमारतीच्या भिंती, प्लास्टर आणि विद्युत कामासाठी लागणारा निधीच उपलब्ध होत नसल्याने गेल्या वर्षापासून इमारतीचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना उन-वारा-पावसाचा त्रास होत होता. जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ मध्ये येथील सामाजिक सभागृहासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पाठपुराव्याने दहा लाख रुपये खर्चाची तरतूद करून येथे एका कंत्राटदारामार्फत सामाजिक सभागृहाच्या इमारतीचे बांधकाम सुरु केले. हे काम ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण या इमारतीसाठी लागणाऱ्या पुढील बांधकामास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांनी लोकसहभागातून काम करत शिंदे सरकारला हातभार लावत एक नवा आदर्श घडवून दिला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : जिल्ह्यातील 'त्या' 18 कोटींच्या 90 रस्त्यांचे दोन वर्षात कोणामुळे वाटोळे?

चिकलठाणा येथील जुना बीड बायपास येथील खारोळी माता हे ग्रामदैवतचे हेमाडपंथी ग्रामदैवत आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक उत्सव, किर्तन, भजन, प्रसादाचे कार्यक्रम पार पडतात. नवरात्रात देवीसमोर मोठी यात्रा भरते. आसपासच्या पंचक्रोशीतील हजारो भाविकांची येथे मोठी गर्दी होते. मात्र आधीच हेमांडपंथी मंदिराची झालेली पडझड त्यात सामाजिक सभागृह नसल्याने भाविकांचे हाल होत होते. त्यामुळे सर्वसुविधा युक्त सामाजिक सभागृह असावे, अशी चिकलठाणा येथील ग्रामंस्थांनी आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे मागणी केली होती. धार्मिक स्थळाच्या समोरच एक मजला असलेल्या या अद्यावत इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करणारे सामाजिक सभागृह बांधण्यात येईल, असे आश्वासन बागडे यांनी ग्रामंस्थांना दिले. त्यानुसार सामाजीक सभागृहात दानपेटी कक्ष, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, भाविकांची निवार्याची सोय आदी सोयीसुविधांचा या इमारतीमध्ये करण्यात आला आहे.

Sambhajinagar
Mumbai Coastal Road News : मुंबईकरांसाठी Good News! कोस्टल रोडमळे 'हा' प्रवास आता अवघ्या 12 मिनिटांत

या धार्मिक स्थळात चिकलठाणासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात. सणावारात  दररोज सुमारे हजारो भाविक येथे येतात. भंडारे देखील पार पाडले जातात. त्यांची निवार्याची सोय नसल्याने या ठिकाणी जागा अपुरी असल्याने भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तसेच या धार्मिक स्थळात स्वयंपाक घर व भोजनकक्ष नसल्याने पावसाळ्यात भाविकांचे हाल होत आहेत.त्यात जिल्हा नियोजन समितीने मंजुर केलेल्या सामाजिक सभागृहासाठी निधीची आडकाठी घातल्याने आता थेट चिकलठाणा येथील ग्रामंस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासोबतच लोकवर्गणीतून सामाजिक सभागृहाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेत काम देखील सुरू केले आहे...यासर्व कामातून मराठवाड्याला निधी कमी पडू देणार नाही, असे म्हणणारे शिंदे सरकारला मात्र समजदार गावकर्यांनी मदतीचा हात दिला आहे.

आमदार नाना, आचारसंहिता संपली आता रस्त्याकडे पाहाणा

या ग्रामदेवतेकडे जाणाऱ्या रस्त्याची  पावसामुळे चिखलवाट झाली आहे. जुना बीडबायपास ते धार्मिक स्थळापर्यंत जाण्यासाठी हा दिड किलोमीटरचा कच्चा मातीचा रस्ता आहे. त्यावर खड्डे झाले आहेत. यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी चिकलठाणा येथील ग्रामस्थांनी आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली होती. त्यावर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम हाती घेऊ,  असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर देखील अद्याप रस्त्याच्या कामासाठी कुठल्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत.‌ लोक सहभागातून भाविक या रस्त्याची दुरुस्ती करतात. मात्र, पाऊस सुरू होताच रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने भाविकांना आणि शेतकऱ्यांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. खड्डयांमुळे लहान मोठे अपघात देखील झाले आहेत. या मार्गाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने  जात असतात. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंट रस्ता गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com