Sambhajinagar : वर्षभरात उखडला सव्वा कोटींचा सव्वा किमीचा रस्ता; रस्त्यात खड्डे की...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : प्रमुख जिल्हा मार्ग-१७ ते शामवाडी मार्गावरील ग्रामस्थांचा प्रवास सुसाट व्हावा याकरिता या १२०० मीटर मार्गाचे वर्षभरापूर्वी काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सव्वा कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा रस्ता वर्षभरातच उखडला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी व कंत्राटदाराच्या पापामुळे या मार्गावर ठिकठिकाणी आरपार तडे पडले असून, डांबरीकरणावर देखील खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळणच झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करताना पडतो. गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने या रस्त्यावरून अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्याचे कंत्राट शहरातील अमन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते.

Sambhajinagar
Sambhajinagar : 5 मंत्र्यांच्या संभाजीनगर जिल्ह्यात प्यायला पाणी मिळेना!

यासंदर्भात टेंडर काढून १६ जून २०१९ रोजी कंत्राटदार अमन कन्स्ट्रक्शनचे जाॅनी शेख यांना काम देण्यात आले होते. १२ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले, परंतु कंत्राटदाराने दिड वर्षे उलटूनही हे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत होत्या. याबाबत नागरिकांनी जाब विचारल्यानंतर रखडलेले हे काम २०२३ मध्ये पूर्ण झाले. मात्र निकृष्ट कामामुळे हा रस्ता उखडला असून, काँक्रिटकामावर तडे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात दोन ठिकाणी सिमेंट पूल असताना एकाच ठिकाणी पाइप टाकून ओबडधोबड पूल बनविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा कोणी केला बट्ट्याबोळ? 'या' रस्त्याचे काम अर्धवट कसे?

यासंदर्भात ग्रामसडक योजनेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी व कंत्राटदार कंपनीच्या साटेलोट्यामुळे सुरुवातीपासूनच या कामाची पुरती वाट लागली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत व पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत त्याच त्या कंत्राटदाराकडून काम केले. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर देखील प्रशासन जाणीवपूर्वक गप्प राहिले आहे. यामुळे सव्वा किलोमीटरचे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, जुनाच रस्ता बरा होता अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com