दौंड-उस्मानाबाद राज्यमार्ग कारवाईचा चेंडू आता सोलापुरातील...

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्याला जोडणारा दौंड-करमाळा-परांडा-बार्शी ते उस्मानाबाद राज्य मार्ग क्रमांक-६८ या रस्त्याच्या निकृष्ट व विलंबाने होत असलेल्या कामाबाबत अकलुज येथील कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या कार्यालयासमोर जनशक्ती संघटनेने बांगडी आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराची देयके थांबवू, उपविभागीय अभियंत्याच्या 'त्या' पत्राबाबत आणि ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत येत्या पंधरा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोलापूर मंडळ कार्यालयात बैठक घेऊ अधिक्षक अभियंता यासंदर्भात जो निर्णय घेतील त्यानुसार कार्यवाही प्रस्तावित करू असे लेखी आश्वासन पुन्हा एकदा जनशक्ती संघटनेला दिल्यानंतर आश्वासन मागे घेण्यात आले. मात्र, प्रतिउत्तरात अधिक्षक अभियंत्यांनी देखील कारवाईबाबत भुलभुलैय्या केल्यास थेट त्यांच्या मंडळ कार्यालयासमोरच रास्ता रोको करू असा इशारा देखील जनशक्ती संघटनेच्या वतीने तेलंग यांना देण्यात आला आहे.

Aurangabad
मंत्रालयात मोठा खांदेपालट; वल्सा नायर सिंह यांच्याकडे हौसिंग, तर..

आठ महिन्यांपूर्वी ठेकेदाराने निकृष्ट आणि तेही विलंबाने काम केल्याबाबत ठेकेदाराला प्रतिदिवस काम संपेपर्यंत साडेआठ लाखाचा दंड लावू आणि निकृष्ट कामातील सरफेसचा खराब भाग नव्याने करून घेऊ असे लेखी पत्र देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दंड आकारला नाही. शिवाय रस्त्याचीही दुरूस्ती केली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षा विनीता बर्फे, माळशिरस तालुका प्रमुख तथा चांडकाईवाडी येथील रहिवाशी रविंद्र भारत गंभीरे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, रा. उपळवटे ता. माढा जि. सोलापूर यांच्या मार्गदर्नाखाली सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेकडो महिलांना सोबत घेउन शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी साडेदहाच्या सुमारास अकलुज सुजयनगर-१ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम भवन हे विभागीय कार्यालय गाठले. तेथील कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या दालनासमोरच बांगडी आंदोलन सुरू केले. जोपर्यत ठेकेदारांकडून दंड वसुल केला जात नाही, त्याला काळ्या यादीत टाकल्याशिवाय तसेच ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे पत्र देऊन दंड वसुल न करता संघटनेला खोटे पत्र देऊन दिशाभुल केली 'त्या' करमाळाच्या उपविभागीय अभियंत्यावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यत इथून उठणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Aurangabad
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर  कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करून कार्यालय परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत आमची मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत जनशक्ती संघटनेसह ग्रामस्थ ठाण मांडून होते. यावेळी शहर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा पाचारण करण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. करमाळ्याचे उप विभागीय अभियंता यांनी संघटनेला १८ फेब्रुवारी २०२२ ला दिलेले ठेकेदारावर दंड आकारणीच्या पत्राच्या अनुषंगाने पुण्याची आर.एस.आय.आय.एनपी इन्फ्रा प्रा.लि.या कंपनीच्था कामाच्या ३० सप्टेंबरपासून पुढील तारखेपर्यंत सर्व देयकांबाबत १४ ऑक्टोबर २०२२ सोलापूर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या मंडळ कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तूर्तास ठेकेदाराची ७० कोटीची देयके  थांबवली असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

कारवाईचा चेंडू अधीक्षक अभियंत्यांच्या कोर्टात

दरम्यान, आता कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी पुढील कारवाईचा चेंडू सोलापूरातील अधीक्षक अभियंत्यांच्या कोर्टात टाकला आहे. याबैठकीत उपविभागीय अभियंता, स्वतः मी कार्यकारी अभियंता व ठेकेदार कंपनीचे अधिकारी अधिक्षक अभियंत्यांसमक्ष हजर राहतील.  या बैठकीत जनशक्ति संघटनेच्या पदाधिकार्यांना देखील बोलाऊ. बैठकीत उपविभागीय अभियंत्याने दिलेल्या पत्रानुसार का कारवाई केली नाही तसेच ठेकेदारावर दंड लावण्याबाबत अधीक्षक अभियंता जो निर्णय घेतील त्यानुसार ठेकेदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करू असे लेखी आश्वासन तेलंग यांनी  दिले.

Aurangabad
धारावी पुनर्विकासासाठी १५ दिवसात ग्लोबल टेंडर; चौथ्यांदा प्रक्रिया

आता सोलापूरात अधीक्षक अभियंता-कार्यालयासमोरच रास्ता रोको 

मात्र आता हेही आश्वासन पुर्ण न केल्यास आंदोलन सुरू राहणार असून येत्या पंधरा दिवसात थेट सोलापूरच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोरच रास्ता रोको करणार असल्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अरुण भोसले, गणेश वायभासे, उपजिल्हा प्रमुख अतुल राऊत, शरद एकाड, दिपाली डिरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वंदना पंत, ज्योती भुजंगे, गणेश ढोबळे, बापू मोहिते, हनुमंत कांतोडे, साहेबराव इटकर, रामराजे डोलारे, किरण भांगे, केशव लोखंडे, दत्ता गोरे, अनिल भोसले, रवी गंभीरे, किशोर शिंदे, अक्षय देवडकर,  विठल कानगुडे, सुदाम आवारे ,सतीश साठे, शिवराम गायकवाड, रफिक सय्यद, महिला कार्यकर्ते आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमची भूमिका ठाम : जनशक्ती संघटना 

रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट आहे. रस्ता एकीकडे आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या पाईपांचे अंतर देखील योग्य नाही. पुढे काम चालु मागे रस्ता उखडत आहे. मागील दोन वर्षापासून कासवगतीने काम सुरू आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही. जनतेला न्याय मिळत नाही तोवर आमची आंदोलनाची ठाम भूमिका असल्याचा संघटनेचा दावा.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com