अखेर छत्रपती संभाजीनगरात 'त्या' ठिकाणी साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील उकिरडा आणि चिखलदरा झालेल्या आमखास मैदानाचे रूपडे लवकरच पालटणार असून, तेथे आता खेळाडूंसाठी सर्व सोयीनियुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी (६ ऑगस्ट) रोजी मुंबईत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विचार विनिमयाने तत्वतः मांन्यता देण्यात आली आहे.

Sambhajinagar
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

सदर मान्यता मिळाल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तातडीने दुरध्वनीवर संपर्क करून राज्याच्या क्रीडा विभागास सविस्तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचा प्रस्ताव विकास आराखड्यासह व अंदाजपत्रकासह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र केवळ सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन ही फसवी घोषणा नको, यासाठी तातडीने अंमलबजावणी करायला हवी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संधीचे सोने करत तातडीने प्रकल्प सल्लागाराची नेमणुक करून तसा प्रस्ताव पाठवल्यास शहराचा विकास होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठवाड्यातील फुटबॉलपटूंना स्टेडियम गाजवता येईल.

मराठवाड्यात विविध खेळ खेळणाऱ्या सामान्य परिवारातील खेळाडूंसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सोयीसुविधायुक्त एकही अद्ययावत मैदान नाही. तत्कालीन सिडको प्रशासनाने सिडको एन-पाच गुलमोहर काॅलनीत दर्शनी भागात गाळे आणि पाठीमागे मैदान, यात गाळेधारकांकडून मिळालेल्या पैशातून मैदानाचा विकास या धर्तीवर व्यापारी गाळे बांधले. ९९ वर्षाच्या कराराने गाळेधारकांकडून करारनामे करत मोठे उत्पन्न देखील मिळवले. मात्र, गेल्या चाळीस वर्षांपासून मैदानाचा खेळखंडोबा तसाच आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : विभागीय आयुक्तांचे आदेश, आस्थापना शाखेचा केवळ टपाली कारभार; यंत्रणेकडून दोषींनाच पाठबळ कसे?

सिडकोच्या धर्तीवर टीव्ही सेंटर चौकातील मैदानाच्या दर्शनी भागात मनपाने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम लगत शेकडो गाळे बांधत गाळेधारकांकडून कोट्यावधींची माया जमवली, परंतु मैदानाचा विकास झालाच नाही. मैदानांच्या जागेवर व्यापारी भुखंड पाडुन केवळ दुकानदारीचा घाट घाटला जात आहे. दुसरीकडे सिडको एन - २ छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हिरवळीसाठी चक्क सिडको व मनपाची ना - हरकत न घेता व जिल्हा प्रशासनांतर्गत भूविज्ञान व भूजल विभागाची परवानगी न घेता ४० ते ५० फुट खोल विहिर खोदण्यात आली. विहिरीतुन उपसा केलेला मुरुम व दगडांचे डोंगर मैदानातच उभे केल्याने नागरिकांनी फिरायचे कसे व खेळाडुंनी खेळायचे कुठे, हा खरा प्रश्न आहे.

दुसरीकडे जुन्या शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळातील मैदानाची धोकादायक सुरक्षाभिंत आणि रानटी झाडाझुडपांचा वेढा त्यात कचर्याचे ढिग पसरल्याने खेळाडूंची गैरसोय होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील आबासाहेब गरवारे स्टेडियमवर जलकुंभाचे काम आणि पाइपांचा राडारोडा पडल्याने तर दुसरीकडे वस्तीगृहासह परिसरातील खुल्या जागेवर पोलिसांनी जप्त केलेली वाहने आणि मनपाने जमा केलेल्या विविध विभागातील भंगाराचे गोडाऊन केल्याने गत तीन वर्षांपासून खेळाडूंना सराव करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : फुलंब्रीतील चितेपिंपळगावात भूमिगत गटारीचे काम खोळंबले; ग्रामस्थांकडून उपोषण

सिडको एन-२ तील क्रीडा मैदान नाममात्र दरात धनदांडग्यांच्या घशात घातले आहे, तिथे केवळ मक्तेदारी सुरु असल्याने सामान्य खेळाडू शुल्क भरू शकत नाहीत, तेच धोरण मनपाने गरवारे स्टेडियमवर बाळगलेले आहे. सिडको एन-२ शिवाजी क्रीडा मैदानात थेट जलकुंभाचे काम सुरू केले, उर्वरित जागेत लग्नसराईच्या दिवसात विवाह समारंभ केले जातात. तत्कालीन सिडको प्रशासनाच्या काळात मैदानी खेळांसाठी आरक्षित असलेले अंतर्गत वसाहतीलगत शेकडो मैदाने सिडकोने बड्या शिक्षण संस्थांच्या हवाली केले आहेत. अटीशर्तीनुसार तेथे मैदान सर्वसामान्यांना दिलेल्या वेळेत खेळण्यासाठी निःशुल्क खुले राहणे बंधनकारक आहे, मैदानात नागरिकांना फिरण्यासाठी जाॅगिंग ट्रॅक, वाॅकिंग प्लाझा, जीम साहित्य, सुशोभीकरण व परिसरात स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा भिंत, खेळाडूंसाठी पायाभुत सुविधा देण्याची संबंधितांना करारनाम्याट अट असताना ही मैदाने बंदिस्त केली गेली. त्यावर संस्थाचालकांनी कब्जा केला आहे.‌पुढे सिडकोचे मनपात हस्तांतर झाले. मनपाने काही शिक्षणसंस्थाचालकांकडून वार्षिक भाडे उकळत कोट्यावधींची माया जमवने सुरू केले आहे. मात्र  मैदाने नागरिकांसाठी असतात याचे भान मनपा विसरली व नफेखोरीमुळे शहरातील मैदानांची वाट लावली.

दरम्यान गत वर्षी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम होणार, असे आश्वासन दिले होते. त्यांचे हे आश्वासन मराठवाड्यातील सामान्य परिवारातील खेळाडूंसाठी आशेचा किरण दाखवणारे होते.‌ मात्र वर्ष झाले तरी " त्या " आश्वासनाची पूर्ती होत नव्हती. त्यात  शिवमल्हार शिवशंक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शहरातील प्रसिद्ध उद्योजक दिलीप आग्रहारकर यांच्यासह शहरातील शेकडो खेळाडूंच्या पालकांनी  टेंडरनामा प्रतिनिधीकडे आमदास मैदानाबाबत सचित्र कैफियत मांडली होती. प्रतिनिधीने तक्रारदारांसह आमखास मैदानाची पाहणी केली होती. त्यावर " कधी होणार आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल दर्जाचे स्टेडियम; अब्दुल सत्तारांच्या नुस्त्याच बाता " या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.‌ या वृत्ताची दखल घेत सत्तार छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री होताच त्यांनी आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल दर्जाचे स्टेडियम व्हावे, यासाठी गत मंगळवारी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे तगादा लावला. बनसोडे यांनी तत्वतः मंजुरी दिल्यानंतर सत्तार यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सोबतच विभागीय क्रीडासंकूलात देखील खेळाडूंना पायाभुत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असेही निर्देश त्यांनी दिले. तिकडे सत्तार यांनी मंजुरी देताच शिवमल्हार शिवशंक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप आग्रहारकर यांच्यासह शेकडो खेळाडू व पालकांनी टेंडरनामाचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com