Sambhajinagar : धरणात वाढणार 934.79 सघमी जलसाठा; काय आहे कारण?

Dam
DamTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्य सरकारच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लहान-मोठ्या ६१ प्रकल्पांमधून गाळ काढण्यासाठी ७ कोटी रुपयांच्या आराखड्यास मृद्‌ व जलसंधारण विभागाने मंजूरी दिली होती.‌ त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १० धरणांमधून १६४६२५ घनमीटर, कन्नड तालुक्यातील १२ धरणांमधून ८९९०५, खुलताबाद तालुक्यातील १० धरणांमधून‌ ९६९७१, फुलंब्री तालुक्यातील ६ धरणांमधून ९५६७० , सिल्लोड तालुक्यातील ४ धरणांमधून ४०२७१, पैठण तालुक्यातील ५ धरणांमधून ९९०३५, वैजापूर तालुक्यातील ६ धरणांमधून ३५७०४ इतका घनमीटर गाळ काढल्यानंतर जिल्ह्याच्या धरणसाठ्यात ९३४.७९ सघमी जलसाठ्यात वाढ होणार आहे.

Dam
Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत धरणातील‌ गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टाकण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रेरणा फाउंडेशन,ज्योती बहुउद्देशीय संस्था , नाथ मेडीकल फाउंडेशन यांना मंजूरी वैजापूर येथील कैलास पाटील बहुउद्देशीय संस्था, जनता फाउंडेशन यांना मंजुरी दिली आहे. नियमानुसार काही अटी व शर्तींसह त्यांना ७ व १४ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मृद व जलसंधारण विभागाच्या मंजुर ५७ कामांना एकुण ६ कोटी २ लाख २२ हजार इतका खर्च लागणार आहे व जिल्हा परिषद सिंचन विभाग अंतर्गत मंजूर ८ कामांना १ कोटी १० लाख १३ हजार रुपये इतका खर्च लागणार आहे.‌ मृद व जलसंधारण विभागाच्या मंजुर ५७ कामांमुळे ८१५.१४ सघमी सदर पाझर तलावांमध्ये साठवन क्षमता वाढणार आहे. गत वर्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवाय या योजनेतून मृद व जलसंधारण विभागाने ३८ कामे केली होती. सदर ३८ पाझर तलावांमध्ये ३२०.७१ सघमी पाणी साठवन क्षमता वाढली होती तसेच २४७४१३.४ घमी गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे तसेच गत वर्षी जिल्हा परिषद अंतर्गत सिंचन विभागामार्फत ९ पाझर तलावांवर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून ९ पाझर तलावात ११९.६५ सघमी पाणी साठवन क्षमता वाढली होती व ६९९१९.६ घमी गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आला होता, अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली. 

Dam
Sambhajinagar : 'या' रस्त्याचे स्मार्ट सिटी प्रशासन काम कधी पूर्ण करणार; वाहनचालकांचे कंबरडे मोडले!

गाळ काढण्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार नसून स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था व वैयक्तिक शेतकरी यांनाही परवानगी दिली जाणारअसल्याचे मृद्‌ व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस पडला असून, अनेक धरणे तळाला गेली आहेत. तसेच बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून मोठ्या धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी ६५ धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग व मृद्‌ व जलसंधारण विभागाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून गाळ काढून तो वाहून नेण्याच्या कामांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडून एकुण ५७ मंजुर कामातील ८१५१४० घमी गाळ काढण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आत्तापर्यंत ३२६८५९ घमी गाळाचा उपसा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३५ कामे प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकुण आठ मंजुर कामांपैकी १८०१३७ घमी गाळ काढायला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.यासाठी १ कोटी १० लाख १३ हजार रुपये खर्च लागणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे कुठल्याही एजंन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. 

Dam
Sambhajinagar : शहरात पाणीबाणी;  मनुष्यबळाअभावी 37 जलकुंभांचे रखडले काम

असा आहे योजनेचा गोषवारा

छत्रपती संभाजीनगर तालुका 

मंजुर कामांची संख्या: १०

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: १६४६२५ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: १३२३०

प्रगती पथावरील कामांची संख्या: ३

कन्नड

मंजुर कामांची संख्या: १२

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: ८९९०५ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: ४९४५३ घमी.

प्रगती पथावरील कामांची संख्या: ६

खुलताबाद

मंजुर कामांची संख्या: १०

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: ९६९७१ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: २७८७० घमी.

प्रगती पथावरील कामांची संख्या:५

असा आहे योजनेचा गोषवारा

फुलंब्री 

मंजुर कामांची संख्या: ६

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: ९५६७० घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: ३०५९६ घमी.

प्रगती पथावरील कामांची संख्या: ३

सिल्लोड 

मंजुर कामांची संख्या: ४

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: ४०२७१ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: ३०५९६ घमी.

प्रगती पथावरील कामांची संख्या: ३

पैठण 

मंजुर कामांची संख्या: ५

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: ९९०३५ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: ५७१५०

प्रगती पथावरील कामांची संख्या:५

असा आहे योजनेचा गोषवारा

वैजापूर 

मंजुर कामांची संख्या: १०

प्रशासकीय मान्यतेनुसार गाळाचे प्रमाण: २२८६६३ घमी.

आतापर्यंत उपसा करण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण: ७३३१० घमी.

प्रगती पथावरील कामांची संख्या: ७

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com