Sambhajinagar : 'त्या' प्रकल्पांची किती वर्षे प्रतीक्षा करावी?; बिडकीनमध्ये नुसतीच उद्योगांची घोषणा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : यापूर्वी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये कॉस्मो फिल्म प्रा. लि. आणि पिरॅमल फार्मास्युटिकल या दोन कंपन्यांनी दीड हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सरसावल्याची घोषणा करण्यात आली होती. या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे १७८ एकर आणि १३८ एकर जमीन खरेदी केल्याचे नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉरिडॉरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरितलाल मीना यांनी ७ ऑगस्ट २०२२ रोजी जाहिर केले होते. मात्र अद्याप अडीच वर्षांनंतर देखील या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केले नाही. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रीकल दुचाकी निर्मिती करणाऱ्या अथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये १०० एकरावर प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.‌ त्याच घोषणेची पुनरावृत्ती दोन दिवसांपासून शहरात वार्यासारखी पसरत आहे. मात्र याच कंपनीचा मागील दोन वर्षाचा मागोवा पाहता केवळ आता विधानसभा निवडणुका समोर ठेऊन शहरातील औद्योगिक वसाहतीत उद्योग येणार अशी नुस्तीच घोषणाबाजी नको, शेंद्रा व बिडकीन डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग यायलाच हवेत. यासाठी उद्योजकांना पायाभूत सुविधा आधी निर्माण करा, असा टोलाही काही उद्योजकांनी मारला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातील 200 कोटींचा 'हा' महत्वाचा बायपास कधी पूर्ण होणार?

इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित 'अथर एनर्जी' कंपनी बिडकीन डीएमआयसीत १०० एकरांवर प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केली जात आहे. सुमारे २ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक येथे कंपनी करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे २ हजार कुशल व अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही संबंधितांचे म्हणणे आहे. अथरचा डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठा उद्योग यावा, यासाठी छत्रपती संभाजीनगर आतील उद्योगविश्व दोन वर्षांपासून प्रतीक्षेत होते. आता ही प्रतीक्षा संपुष्टात आल्याचा दावा संबंधित प्रशासनाने केला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बिडकीन डीएमआयसीमध्ये कॉस्मो फिल्म प्रा. लिमिटेड आणि पिरॅमल फार्मा प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी बिडकीन औद्योगिक पट्ट्याला भेट दिली होती. त्यांना येथील इन्फ्रास्ट्रक्चर आवडल्याने या दोन्ही कंपन्यांनी येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. कॉस्मो फिल्मकडून येथे १७८ एकर, तर पिरॅमल फार्मा कंपनीने १३८ एकर अशी एकूण ३११ जमीन खरेदी केली होती. कॉस्मो फिल्मने विस्तारीकरण करण्यासाठी येथे टप्प्याटप्प्याने सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पिरॅमल फार्माकडून सुमारे ५०० कोटी रुपयांची येथे गुंतवणूक होणार होती. या दोन्ही कंपन्यांमुळे अनुक्रमे १ हजार ५०० आणि १ हजार २०० असे एकूण २ हजार ७०० लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याची माहिती डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. दोन्ही कंपन्या डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचे उत्पादन सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.‌ मात्र मागील तीन वर्षांपासून केवळ बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळीच या कंपन्यांनी गुंतवणुक केली असती तर बिडकीन औद्योगिक पट्ट्याला प्रतीक्षा असलेले अँकर प्रकल्प मिळाले असते. कुशल आणि अकुशल कामगारांना  रोजगार मिळाला असता.

Sambhajinagar
Mumbai : पावसाळ्यासाठी बीएमसी मिशन मोडवर; विनाविलंब खड्डे बुजवण्यासाठी असा आहे प्लॅन

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठी गुंतवणूक असलेला उद्योग यावा, यासाठी केंद्र आणि राज्यसरकारसोबत सीएमआयएचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.मात्र काहीना काही कारणांनी त्यांच्या प्रयत्नांना अपयश येत आहे. दिड वर्षांपूर्वी काॅस्मो आणि पिरॅमल फार्मा या दोन कंपन्या यांनी मागील तीन वर्षांपूर्वी दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना २५ टक्के सवलतीनुसार २ हजार ४०० रुपये चौरस मीटर दराने जमीन देण्यात आली होती. त्यांनी जमिनीच्या एकूण किमतीच्या ५ टक्के रक्कम डीएमआयसीकडे जमा करून प्लॉटची बुकिंग केली होती. मागील दोन वर्षांपूर्वी अर्थात १ डिसेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रिकल दुचाकी निर्मिती करणाऱ्या अथर एनर्जी या कंपनीने बिडकीन डीएमआयसीत ८०० ते १००० कोटीतून प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली होती. कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सीएमआयएच्या कार्यालयात चर्चा करून येथील सुविधांसह इंडस्ट्री इको सिस्टमचा आढावा घेतला होता. गुजरात, गुडगाव व छत्रपती संभाजीनगर या तीनपैकी कंपनीने छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनमध्ये अथरने गुंतवणूकीसाठी सकारात्मक विचार केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये १५ दिवसात चार वेळा अथरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिडकीन मध्ये येऊन पाहणी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर उद्योगजगताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यावेळी २५ टक्के सवलतीच्या दरात कंपनीने ५० एकर जागा मागितली होती. त्याला डीएमआयसीने होकार दिला होता. छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन डीएमआयसीतून चार लाख इलेक्ट्रिकल व्हेईकल वाहनांचे उत्पादन करण्याचा कंपनीचा उद्देश होता.

दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने छत्रपती संभाजीनगरातील कुशल मनुष्यबळ आणि कंपनीसाठी पोषक वातावरण आहे का? याबाबत स्थानिक उद्योजकांशी चर्चा केली होती. लेबर युनियनचा काही त्रास आहे का? , असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान उद्योजकांनी त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी सर्व परवानगीसाठी पाठपुरावा करू, मंत्रालयापर्यंतच्या अडचणी सोडवू, शासनाच्या सबसिडीसाठी प्रयत्न करू, त्यावेळी छत्रपती संभाजीनगरात मोठे ईको सिस्टम आहे.‌इलेक्ट्रानिक क्लस्टर मिळवून देण्याबाबत अथरच्या वरिष्ठांना आश्वासन दिले होते. मात्र डिसेंबर २०२२ ते जुन २०२४ पर्यंत पुढे काही एक झाले नाही. १५ जून २०२४ नंतर पुन्हा ऑरिकच्या बिडकीन डीएमआयसीत अथर एनर्जी ५० एकर नव्हे, तर १०० एकरात प्रकल्प साकार करण्याची उद्योग जगतात चर्चा सुरू झाली. आता ८०० ते १००० कोटीवरून थेट दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दोन हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.‌यामुळे छत्रपती संभाजीनगरातील उद्योजकांसह कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण जरी निर्माण झाले असले, तरी दुसरीकडे मागील वातावरण निर्मिती पहाता केवळ आता विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन ही वातावरण निर्मिती केली जात असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com