Sambhajinagar : चिकलठाणा 'IT' पार्कचा कुणी केला कचरा?

खाली खड्डे वर अंधार, सायंकाळनंतर उनाडांच्या मैफली...
Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयटी पार्कमधील रस्त्यांची पार वाट लागली असून, रस्त्यांवर कुठेही डांबर शिल्लक नाही. रस्त्यांची पाठ पूर्णपणे ओरबाडून त्यातील खडी बाहेर पडलेली आहे. गेल्या २५ वर्षांपासून पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक, उद्योजक आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे कंबरडे मोडले आहे.

Sambhajinagar
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील IT पार्कची झाली 'खिचडी'

गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची दुरवस्था अशीच भयावह असून देखील याकडे एमआयडीसी अथवा महापालिका  प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेषतः येथील पथदिवे देखील नादुरूस्त असल्याने सायंकाळनंतर अंधार पडतो. याचा फायदा घेत काही गंजाटी, जुगारी आणि दारूड्यांच्या आयटी पार्कमधील झाडाझुडपात मैफली सजतात. परिणामी येथे काम करणाऱ्या महिलांची असुरक्षितता वाढली आहे. भितीदायक वातावरण आहे. सायंकाळी असे गैरप्रकार तर दिवसा येथे काही भाऊ-दादा उद्योजकांच्या कार, उद्यानात वाढदिवस साजरे करत फोटोसेशन करत असल्याने आयटी पार्क क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे खड्डेमय रस्त्यांच्या कडेला आकाशाला गवसनी घालणारे रानटी झाडीझुडपे आणि कचरा आयटी पार्कची शोभा घालवत आहेत.

Sambhajinagar
चिकलठाणा IT पार्कमधून उद्योजकांचा काढता पाय; हे आहे खरे कारण...

आयटी पार्क मधील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत गेली अनेक वर्ष दाद मागितल्यानंतर गेल्या दीड महिन्यापूर्वी भूमिपूजन झाले. मात्र अद्याप कामाला मुहुर्त लागलेला नसल्याने एमआयडीसी अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्कमध्ये साईटेशन बिल्डर प्रो, इन्फिकाॅम सोल्युशन प्रा. लि., इन्फोगिर्ड इन्फोरमॅटिक्स, श्री आयटी ऑनलाईन इन्फाॅरमिशन, इंडियन इंटरनेट सोल्युशन, जिंगल टुन्स, कोअरसाॅफ्ट टेक्नोलोजिस, आरवायटी नाऊ सिस्टीम प्रा. लि., क्रिसस्कॅन डेव्हलपर ट्रान्सक्रिप्शन, गरवारे हायटेक फिल्म आणि इन्फोटेक आणि प्रशिक्षण विभाग, जेएमके इन्फोसाॅफ्ट सोल्युशन लिमिटेड, कनेक्ट इंटरप्रायजेस, एचडीएलसी, पॅनगल्फ, मॅझिक फ्लेअर साॅफ्टवेअर सर्व्हिसेस एलएलपी, एक्सलाईज साॅफ्टवेअर प्रा. लि., इंडोफाॅरजिंग टेक्नोलाॅजी, क्युबेटीक इंजिनिअरींग प्रा.लि., क्लिक ॲन्ड टेक, अन्नामृत फाऊंडेशन, देवगिरी साॅफ्टवेअर, फेब्ज इनफो प्रा. लि., आकांशा इंटीग्रेशन, मीरासा स्कील टीम, प्रिस्टन रिसर्च प्रा.लि., एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. आदी आयटी व इतर कंपन्या आयटी क्षेत्रात आहेत. या कंपन्या एमआयडीसीला अव्वा का सव्वा भाडे देतात, शिवाय महापालिकेला कोट्यावधीचा नियमित कर भरत असून देखील रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल उद्मोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयटी क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पाहून येथे आयटी  उद्योगाला चालना मिळेल की नाही, अशी भीती उद्योजकांना वाटू लागली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : बांधकाम कामगारांना दिले जाते निकृष्ट मध्यान्ह भोजन

एमआयडीसीने येथील उद्योजकांच्या खिशातूनच सेवाकर वसुल करून ७० कोटी रुपये खर्च करुन चिकलठाणासह आयटी पार्क व इतर औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे गेल्या दीड महिन्यांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते  भूमिपूजन केले. त्यानंतर अद्याप एकाही रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली नाही. सद्य:स्थितीत रस्त्यांची अवस्था पाहता एमआयडीसी आणि महापालिकेचा कारभार येत असताना येथील रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. येथील उद्योजकांनी वेळोवेळी एमआयडीसी व महापालिकेकडे याबाबत पाठपुरावा केल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : राज्यातील 'MNP'चा नालेसफाईचा फंडा वापरल्यास...

पाच मंत्री इकडे लक्ष देतील का?

सध्या राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार आहे. याच गटातील दोन केंद्रिय मंत्री, तीन राज्य कॅबिनेट मंत्री मराठवाड्याला लाभले आहेत. योगायोगाने विरोधी पक्षनेते हे पदही मराठवाड्याला लाभले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. याचा पुरेपूर फायदा घेऊन येथील मंत्री महोद्यांनी मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आयटी पार्कला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारला पाठविल्यास अशक्यही शक्य करतील मोदी आणि शिंदे सरकार. मराठवाड्यातील एकमेव चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील  आयटी पार्क विकसित करण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.सोबतच एमआयडीसीने येथील भाडे आणि भुखंड सवलतीच्या दरात देने गरजेचे आहे.

असंख्य सुशिक्षित बेरोजगार आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांच्या तक्रारींच्या  पार्श्वभूमीवर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील टी सेक्टरमधील सुमारे २५ ते ३०  एकर जागेचे सर्वेक्षण केले. आयटी पार्कच्या नावाने भुखंड गिळंकृत करून बड्या राजकीय नेत्यांनी त्याची कशी खिचडी केली, यावर देखील टेंडरनामाने प्रकाश टाकला. 'टेंडरनामाच्या' आयटी पार्क क्षेत्राशी संबंधित वृत्तमालिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजीनगरातील एका औद्योगिक वसाहतीत एक मोठा उद्योग येणार असल्याचे सांगत केविलवाणा प्रयत्न केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अशी अनेक आश्वासनं हवेत विरल्याने आता प्रत्यक्षात उद्योगाची पायाभरणी होऊन चिमणीतून धुर निघाले तरच खरे, अशा लोकांच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. मराठवाड्यातील (IT) माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित युवक देशभरातील अन्य शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. परंतु, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोषक वातावरण असूनही आयटी उद्योगाचा हवा तसा विकास झालेला नाही. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात बोटावर मोजण्या इतक्या लहान- मोठ्या आयटी कंपन्या असून त्यांना सवलती मिळत नाही. येथील मुलांना बंगरूळू, मुंबई, पुण्यात आयटी क्षेत्रातील कामासाठी जावे लागते. परंतु,तेथील  घरभाडे, जेवन आणि प्रवासाचे भाडे परवडत नसल्याची ओरड संभाजीनगरातील सुशिक्षित बेरोजगार कायम करतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com