गडकरी साहेब रस्त्याच्या कामांचा दर्जा तपासा; औरंगाबादकरांची मागणी

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : एक वेळ दुरुस्ती अंतर्गत प्रकल्पातून नगर नाका ते केंब्रिज स्कूल या एकूण १४ किमी लांबी असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामावर 'टेंडरनामा'ने प्रहार केल्यानंतर भाजप आमदार अतुल सावे आणि शिवसेना आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादासराव दानवे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) यासंदर्भात लेखी तक्रार करून या कामाची त्रयस्त समितीमार्फत चौकशी करू, असा खुलासा 'टेंडरनामा'शी बोलताना केला. या संदर्भात राष्ट्रवादी भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पाखरे यांनीही सदर कामाचा लेखाजोका मागवत रस्त्यांचा दर्जा तपासण्याची मागणी केली आहे.

Aurangabad
अर्धवट काम, दर्जा निकृष्ट अन् तरीही गडकरींच्या हस्ते लोकार्पण

या कामाचा लोकार्पन सोहळा आज (ता. २४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. मात्र शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्यावर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे गडकरी यांनी सदर कामाचा आढावा घेऊनच नियोजित कामाचे लोकार्पन करणे अपेक्षित होते, असा संतप्त सूर औरंगाबादकरांनी व्यक्त केला. तर काल लोकार्पन सोहळ्याच्या आढावा बैठकीत देखील भाजप नेत्यांनी टेंडरनामाच्या वृत्ताचे समर्थन करत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे आणि अधिक्षक तथा कार्यकारी अभियंता एम. बी. पाटील यांना धारेवर धरल्याचे सूत्रांकडून समजते.

Aurangabad
महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना आता वीज दरवाढीचा हायव्होल्टेज शॉक?

गडकरींच्या हस्ते त्यांच्या खात्याअंतर्गत विविध विकासकामांचा लोकार्पन आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. 'अर्धवट काम, निकृष्ट दर्जा तरीही गडकरींच्या हस्ते लोकार्पन' या मथळ्याखाली 'टेंडरनामा'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर गडकरी यांनी या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Aurangabad
ठरलं तर मग! समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा 'हा' आहे मुहूर्त

नगर नाका ते केंब्रिज स्कूल दरम्यान झालेल्या साडेचौदा मीटरच्या या कामात आरसीसी गटारीला भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी गट्टू उखडून पडले आहेत. गटारीची उंची वाढल्याने दोन्ही बाजूने रस्त्यावरच वाहनांची पार्किंग होत असल्याने रस्ताच चिंचोळा झाला आहे. ही संपूर्ण कामेच निकृष्ट झाली आहेत, असा आरोप औरंगाबादकर करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा न्यायालय आणि मुकुंदवाडी चौकातील पादचारी ओव्हर ब्रीजचा दिवस-रात्र अवैध कामांसाठी वापर होत आहे.

Aurangabad
नियमांना फाटा, मलिदा खाणाऱ्यांमुळे औरंगाबादेतील रस्ते 'खड्ड्या'त

गडकरी हे कर्तव्य कठोर मंत्री म्हणून ओळखले जातता. ते कामाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड सहन करत नाहीत. गडकरींनी अधिकाऱ्यांबरोबर धुळे-सोलापूर महामार्गासह याही कामाची पाहणी करून रस्त्यांच्या कामाबाबत औरंगाबादकरांच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com