Sambhajinagar : कोट्यावधींचा खर्च तरीही जालनारोड मृत्यूचा सापळा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या जालनारोड ते चिकलठाणा दरम्यान फुटपाथ नसल्याने रस्त्याच्याकडेला चालणाऱ्या एका माॅर्निंग वाॅक ग्रुप मित्रमंडळातील सदस्यांना वाहनांची धडक लागुन चार ठार झाल्याची थरकाप आणणारी घटना घडली होती. त्यानंतर जालनारोड या जीवघेण्या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी आरसीसी गटार आणि पादचाऱ्यांची सोय व्हावी यासाठी त्यावरच फुटपाथ, याशिवाय रस्त्याचे दोन्ही बाजुने रूंदीकरण करून पुन्हा तेथे फुटपाथ तयार करण्यात आला. मात्र इतके करूनही हा रस्ता मृत्युचा सापळा रचत असल्याच्या घटना घडत आहेत.

Sambhajinagar
MHADA : पुण्यात सोडत जाहीर; 'एवढ्या' नागरिकांची स्वप्नपूर्ती

कोट्यावधी रूपये खर्च करूनही याऊलट जालना रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा अवघड झाली आहे. आरसीसी गटाराच्या फुटपाथवरील मॅनहोलवरील ढापे गायब होऊन खिंडार पडलेले आहेत. रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. त्यावर पॅव्हरब्लाॅक टाकून फुटपाथ तयार करण्यात आला. मात्र त्यावर जागोजागी हातगाड्यांनी अतिक्रमण केलेले आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गटाराची उंची वाढल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांच्या रांगा फुटपाथवरच लागलेल्या असतात. त्यात रस्त्याखालुन जाणाऱ्या नाल्यांवरील दोन्ही बाजुंनी पुलाचे तुटलेले कठडे अन् अर्धवट फुटपाथमुळे या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पादचाऱ्यांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: कॉंक्रिटच्या रस्त्यांना का येतेय नद्यांचे स्वरूप?

जालना रस्त्यावरील वाहतुक कोंडीला पर्याय म्हणून तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. अधिकारी, ठेकेदार आणि प्रकल्प सल्लागाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यावधी रूपये खर्च करून देखील या रस्त्यावरील कोंडी फुटली नाही. आधीच रस्त्याचे काम कासवगतीने केले. त्यात कोरोनाच्या दृष्टचक्रात काम थांबले होते. नुकतेच ठेकेदाराने काम पुर्ण केल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे असले, तरी टेंडरनामा प्रतिनिधीच्या पाहणीत हे काम अर्धवट अवस्थेत असल्याने घोड्याला पेंड कसे खाऊ घातले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: सत्तार साहेब, 'या' इमारतीचे करायचे काय?

ठेकेदाराने कॅम्ब्रिजनाका ते नगरनाका दरम्यान आरसीसी गटारीचे काम केले. परंतु मध्येच ते अर्धवट सोडण्यात आले आहे. ढाप्याअभावी गटारावरील मॅनहोल उघडे आहेत. पुलाच्या मधोमध स्लॅब टाकुन फुटपाथचे काम पुर्ण न केल्याने पादचाऱ्यांची फसगत होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या बाजुने केलेल्या अतिक्रमणांनी वाहनधारक अन् पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. यापूर्वी टेंडरनामाने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत तत्कालीन प्रकल्प संचालकांनी ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू झाले हाेते. मात्र त्यांची बदली होताच काम अर्धवट अवस्थेत बंद आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : गडकरीसाहेब, हाच का तुमचा डबकेमुक्त जालनारोड?

जालना रस्त्यावर घेतले होते चार जणांचे बळी

अतिक्रमण, फुटपाथचा अभाव अन् डबके आणि अरुंद रस्त्यामुळे मागील दहा वर्षात शेकडो बळी घेतलेल्या या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी एका वाहनाच्या धडकेत चिकलठाणा गावातील चार जणांचे बळी गेले होते. तेव्हापासून या रस्त्याला पर्याय म्हणून बाजूलाच रूंदीकरण व खड्ड्यांवर उपाय म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजुला आरसीसी गटाराच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, कोट्यावधी उकळुन निकृष्ट आणि अर्धवट काम त्यातच झालेल्या कामावर अतिक्रमण केल्याने  या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com